IND vs WI 1st Odi: अशी आहे पहिल्या वनडेसाठी भारताची अंतिम अकरा; जाणून घ्या सामन्याची वेळ आणि थेट प्रक्षेपण..

0

IND vs WI 1st Odi: सध्या भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर आहे. (India tour of West Indies) या दोन्ही संघामधील दोन कसोटी सामन्याची मालिका नुकतीच पार पडली आहे. ही मालिका भारतीय संघाने 1-0 अशी जिंकत आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात दमदार केली आहे. (India won test series 1-0) कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ आता आगामी विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून तीन एकदिवसीय सामने खेळणार असून, त्या दृष्टीने संघ मैदानात उतरवणार आहे.

भारतीय संघाच्या तुलनेत वेस्टइंडीज संघ कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुबळा आहे. परंतु आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघासाठी ही महत्त्वपूर्ण मालिका मानली जात आहे. तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना भारतीय संघ उद्या वेस्टइंडीज विरुद्ध खेळणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होईल.

भारतीय वेळेनुसार, उद्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील पहिला एकदिवसीय सामना संध्याकाळी सात वाजता केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस (Kensington Oval, Bridgetown, Barbados) या मैदानावर पार पडणार आहे. साहजिकच यामुळे क्रिकेट चाहत्यांना रात्रभर जागून क्रिकेट सामना पाहावा लागणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण क्रिकेट चाहत्यांना डीडी स्पोर्ट, (DD sports) आणि जिओ सिनेमा (JioCinema) या ott platform वर पाहता येईल. याशिवाय क्रिकेट चाहत्यांना (fancode) या वेबसाइटवर देखील सामना पाहता येईल. मात्र यासाठी तुम्हाला चार्ज आकारला जाऊ शकतो.

आगामी विश्वचषक भारतामध्ये होणार असल्याने, भारतीय संघाकडून अनेकांना मोठ्या अपेक्षा आहेत. 2013 पासून भारताने एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. साहजिकच त्यामुळे भारतीय संघावर देखील प्रचंड दबाव आहे. विश्वचषक सुरू व्हायला काही सामने उरले असल्याने, भारतीय संघ आपला सर्वोत्तम संघ काय असेल, या दृष्टीने मैदानात उतरणार आहे.

क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये उत्कृष्ट फलंदाजी केलेल्या, शुभमन गिलला सलामीवीर म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याच्याबरोबर सलामीला येणार आहे. या दोन्हीं सलामीवीरा व्यतिरिक्त भारतीय संघामध्ये ईशान किशन (ishan Kishan) हा देखील उपलब्ध आहे. मात्र अंतिम अकरा मध्ये त्याला संधी मिळणे अवघड आहे. ईशान किशनच्या बदल्यात संजू सॅमसनला (Sanju Samson) विकेटकिपर म्हणून संधी मिळणार असल्याची शक्यता आहे.

असा आहे भारतीय संघ 

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार. ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, जयदेव उनाडकट, 

वेस्ट इंडिज संघ:

शाई होप (कॅप्टन), एलिक एथनेज, रोवमन पॉवेल (उपकर्णधार), कीसी कार्टी, यानिक कॅरिया, शिमरॉन हेटमायर, डॉमिनिक ड्रेक्स, ब्रँडन किंग, अल्जारी जोसफ, जेडन सील्स, रोमारियो शेफर्ड, ओशेन थॉमस, काइल मेयर्स, गुडकेश मोती, केविन सिंक्लेयर

हे देखील वाचा Couple Water Park video: पाण्यातच गडी आला खळीला, अन् वॉटर पार्कलाच केलं Oyo; पाहा तो व्हिडिओ..

Sexual health Tips: संबंधानंतर तो अवयव दुखतो, आग, जळजळ होते? जाणून घ्या कारणे आणि उपाय..

Cake Making Video: तुम्हालाही केक आवडतो? केक बनवतानाचा व्हिडिओ पाहून तुम्ही केकला पुन्हा जन्मात हातही लागणार नाही..

Cake Making Video: तुम्हालाही केक आवडतो? केक बनवतानाचा व्हिडिओ पाहून तुम्ही केकला पुन्हा जन्मात हातही लागणार नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.