Deer Viral video: ..म्हणून हरणांचा कळप थेट जाऊन बसला माणसांजवळ; पाहा हा भन्नाट व्हिडिओ..

0

Deer Viral video: सध्या पावसाचा सीजन (monsoon season) सुरू असून जगभरात जोरदार पाऊस बरसत आहे. पावसाळा ऋतू प्रत्येकाला हवासा वाटत असला तरी पावसाळ्यात अनेक समस्या देखील निर्माण होतात. कामावर जाण्यासाठी देखील अनेकांची धावपळ होते. पावसाळ्यात फक्त मनुष्याची धावपळ होते असं नाही, प्राण्यांना देखील या समस्येतून जावं लागतं.

अचानक पाऊस यायला सुरुवात झाल्यानंतर, प्रत्येकजण पावसापासून स्वतःचं संरक्षण व्हावं यासाठी आडोसा पाहतो. यात प्राणीदेखील पाठीमागे राहत नाहीत. सोशल मीडियावर याच संदर्भातला एक व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. पाऊस सुरू झाल्यामुळे हरणांचा कळप पावसापासून स्वतःचा संरक्षण होण्यासाठी माणसांमध्ये घुसला.

हरीण हे प्रचंड भित्रा प्राणी आहे. हरीण जरी भित्र असले तरी देखील जेव्हा संकट येते, तेव्हा मात्र आपला मूळ गुणधर्म विसरून संघर्ष करावा लागतो. आणि स्वतःचा बचाव करावा लागतो. याची हरणाला देखील वेळीच जाणीव झाली. माणूस असो की इतर कोणताही प्राणी असो, हरीण सगळ्यांना घाबरून वाऱ्याचा वेग धारण करून धावत सुटते. मात्र सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओत हरणाने चक्क कमालच केली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ जपान मधील असून, बाहेर जोरदार पाऊस पडत असल्याने, नाईलाजाने हरणांना पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी माणसांमध्ये जावं लागलं. आपल्यासारखीच माणसं देखील पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी आडोशाला उभी आहेत, कदाचित हा विचार त्यांच्या मनामध्ये आला असावा, आणि म्हणून त्यांना भीती वाटली नसावी. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ फारच प्रेमळ आणि हृदयाला स्पर्श करणारा आहे.

हरणाचा कळप आणि माणसे एकाच छताखाली पावसापासून स्वतःला वाचवत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी हरणांजवळ बसून सेल्फी देखील काढल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ @TansuYegen या नावाच्या अकाउंट वरून पोस्ट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत हा व्हिडिओ तब्बल 250 लाख लोकांनी पाहिला आहे.

हे देखील वाचा Electric Scooter: कमी किंमतीत दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; एका चार्जवर 200 किमी रेंज, किंमत केवळ..

Smrita Mandhana Palash Muchhal: 27 वर्षाच्या या तरुणासोबत स्मृती मानधनाचं सूत जुळलं; लग्नाची तारीखही ठरली..

Maharashtra Jalsampada Recruitment 2023: जलसंपदा विभागात 16,185 जागांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.