Rohit Sharma: ..म्हणून भारत वर्ल्डकप जिंकण्यास लायक नाही; पहिल्याच सामन्यात झाल्या कधीही भरून न निघणाऱ्या ‘या’ चुका..

0

Rohit Sharma: भारत आणि वेस्टइंडीज (IND vs WI) संघामध्ये काल पहिला एकदिवसीय सामना पार पडला. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी सात वाजता खेळवण्यात आला. आगामी विश्वचषक भारतात होणार असल्याने, हा दौरा खूप महत्वाचा आहे. मात्र पहिल्याच सामन्यात पुन्हा त्याच चुका करत रोहित शर्माने (Rohit Sharma) आपल्या संघाला अडचणीत टाकले आहे.

भारताच्या कर्णधाराकडे फलंदाजी करण्याची संधी असताना गोलंदाजीचा निर्णय का घेतला? हा सगळ्यात मोठा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. भारतीय संघाच्या स्पिनर्सने (Indian spinner) वेस्टइंडीज संघाच्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवले. वेस्टइंडीज संघाने भारतासमोर केवळ 115 धावांचे आव्हान ठेवले. मात्र हे आव्हान देखील गाठताना भारतीय फलंदाजांच्या नाकी नऊ आले.

वेस्टइंडीज संघाने ठेवलेले 115 धावांचे आव्हान पूर्ण करताना भारतीय संघाला तब्बल 23 षटके खेळावी लागली. विशेष म्हणजे 115 धावांचे आव्हान पार करताना पाच विकेटही गमवाव्या लागल्या. पहिल्याच एकदिवसीय सामन्यात भारताच्या कर्णधाराने अनेक प्रश्न निर्माण केले असून वर्ल्ड कपपूर्वी त्या चुका सुधारणे अवघड देखील आहे.

सलामी जोडीसोबत छेडछाड का? 

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला केवळ दहा ते बारा एकदिसिय सामने खेळायचे आहेत. साहजिकच यामुळे आता येणार प्रत्येक सामना हा वर्ल्ड कपची तयारी म्हणूनच खेळणे आवश्यक आहे. असं असताना ईशान किशनला (ishan Kishan) रोहित शर्माने सलामीला का पाठवले? हा प्रश्न कोणालाही समाजला नाही. त्याचे कारण म्हणजे, वर्ल्ड कपमध्ये कोण सलामीला येणार, हे जवळपास निश्चित आहे. मग ईशान किशनला सलामीला का पाठवण्यात आले. सलामीला जरी त्याने धावा केल्या असल्या तरी भारतीय संघात त्याला मधल्या फळीशिवाय खेळण्याची संधी मिळणारच नाही.

चार आणि पाच क्रमांकाचं काय?

भारतीय संघाकडे एक, दोन, आणि तीन क्रमांकाचे फलंदाज सेट आहेत. चिंता केवळ चार आणि पाच क्रमांकाची आहे. वर्ल्ड कप सुरू व्हायला केवळ काही सामनेच शिल्लक आहेत. असं असताना चार किंवा पाच क्रमांकाच्या फलंदाजांना सलामीला पाठवून काय फायदा होणार आहे? चार आणि पाच क्रमांकाच्या खेळाडूंनी सलामीला येऊन चांगली कामगिरी केली तर पुन्हा त्याला चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर खेळवल जाणार, हे कितपत योग्य आहे? चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचा फलंदाज तयार करण्याऐवजी आपण आणखीनच खोलात जातो आहोत? याचा विचार टीम मॅनेजमेंट करत नाही ही धोक्याची घंटा आहे.

त्या खेळाडूला मधल्या फळीत खेळवणं धोक्याचे..

वेस्टइंडीज विरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने पाच विकेटने सामना जिंकला. केवळ 115 धावांचे आव्हान असल्यामुळे भारतीय संघाने फलंदाजी क्रमात बदल केले. मात्र ही चूक भारतीय टी मॅनेजमेंट पुन्हा पुन्हा करत आहे. ज्या खेळाडूने सलामीला येऊन चांगला खेळ केला आहे, अशा खेळाडूला मधल्या फळीत खेळवणं धोक्याचे ठरू शकतं.

चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंवर मोठी जबाबदारी असते. सुरुवातीला जर संघाला धक्के बसले, तर या धक्क्यामधून सावरत डावाला आकार देण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असते. साहजिकच त्यामुळे प्रेशर हँडल करण्याची क्षमता चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूंकडे असावी लागते.

सलामीला उत्कृष्ट खेळ करणारा खेळाडू मिडल ऑर्डरमध्ये प्रेशर हँडल करून चांगला खेळ करेलच असं नाही. 2019 मध्ये झालेल्या विश्वचषकामध्ये देखील सेमी फायनलच्या सामन्यात मिडल ऑर्डरची समस्या अधोरेखित झाली होती. आता पुन्हा एकदा याच समस्येची पुनरावृत्ती होऊ नये, असं वाटत असेल तर टीम मॅनेजमेंटने चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर जो खेळाडू खेळणार खेळणार आहे, त्याला त्याच क्रमांकावर मानसिकदृष्ट्या तयार करणे, आणि त्याच क्रमांकावर गेम टाईम देणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा WI vs IND 1St ODI: ..म्हणून संजू सॅमसन ऐवजी ईशान किशनला दिली संधी; हे धक्कादायक कारण आले समोर.

Maharashtra Jalsampada Recruitment 2023: जलसंपदा विभागात 16,185 जागांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

Electric Scooter: कमी किंमतीत दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; एका चार्जवर 200 किमी रेंज, किंमत केवळ..

Smrita Mandhana Palash Muchhal: 27 वर्षाच्या या तरुणासोबत स्मृती मानधनाचं सूत जुळलं; लग्नाची तारीखही ठरली..

Deer Viral video: ..म्हणून हरणांचा कळप थेट जाऊन बसला माणसांजवळ; पाहा हा भन्नाट व्हिडिओ.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.