PM Matru Vandana Yojana: या महिलांना सरकार देतंय 6 हजार; असा घ्या लाभ..

0

PM Matru Vandana Yojana: महिला सक्षमीकरणासाठी (Women Empowerment) सरकार (government) अनेक योजना राबवत असते. केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकार देखील महिलांसाठी अनेक योजना राबवते. कुपोषित बालक जन्माला येऊ नये, यासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील राहिले आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकार गरोदर महिलांसाठी पीएम मातृ वंदना (PMMVY) योजना राबवत आहे. जाणून घेऊया या योजनेविषयी सविस्तर..

भारतामध्ये कुपोषित बालकांच्या जन्माचा मोठा आकडा आहे. अलीकडच्या काळामध्ये हा आकडा कमी झाला असला तरी चिंता करणारी बाब मात्र नक्कीच आहे. अजूनही खेडेगावामध्ये महिला गरोदर राहिल्यानंतर, त्यांना पोषक आहार मिळत नाही. साहजिकच यामुळे मुलाच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो. आणि म्हणून या सगळ्यावर उपाय म्हणून पीएम मातृ वंदना योजना सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

म्हणून सुरू झाली योजना..

गरोदरपणात महिलांचे आरोग्य निरोगी राहावे. सोबतच पोषक आहार देखील मिळाला. या सगळ्या गोष्टींना मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकार गरोदर महिलांना पिएम मातृ वंदना योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते. पीएम मातृ वंदना योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपयांची आर्थिक रक्कम ही केवळ महिलांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर केली जाते. कुटुंबातील इतर सदस्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.

योजनेचे स्वरूप

केंद्र सरकारच्या पीएम मातृ वंदना योजनेसाठी काही अटी आणि निकष निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये गरोदर महिलांचे वय 19 वर्षे पूर्ण असायला हवे. 19 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या महिला जर गरोदर असतील, तर अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. केंद्र सरकारने ही योजना एक जानेवारी 2017 पासून देशभरात लागू केली. विशेष म्हणजे योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला केवळ ऑनलाइन अर्ज करावा लागतो.

असे मिळणार चार हप्ते..

केंद्र सरकारच्या पीएम मातृ वंदना योजनेचा लाभ लाभार्थ्यांना चार टप्प्यात दिला जातो. या योजनेच्या माध्यमातून मिळणारे सहा हजार रुपयांचे स्वरूप अशाप्रकारे, गरोदर महिलांना पहिल्या टप्प्यांमध्ये एक हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात 2 हजार, तिसऱ्या टप्प्यात तीन हजार, आणि अखेरचा टप्पा हा मूल जन्माल्यानंतर 1 हजार रुपयांचा. अशा स्वरूपात सहा हजार रुपये केंद्र सरकार गरोदर महिलांच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करते.

असा करा अर्ज

पीएम मातृ वंदना योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. याशिवाय तुम्ही ऑफलाइन पद्धतीने देखील महिला व बालकल्याण विभागात जाऊन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana. असं सर्च करा.

यानंतर तुमच्यासमोर भारत सरकारची महिला आणि बाल विकास कल्याण मंत्रालयाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. फॉर्म विषयी तुम्हाला काहीही समस्या येत असेल, तर तुम्ही 7998799804 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता.

हे देखील वाचा IND vs WI 2nd ODI: या खेळाडूचा पत्ता कट करून अखेर संजूची प्लेइंग इलेव्हन मध्ये एन्ट्री; पाहा दुसऱ्या सामन्याचा संघ..

Politics News: या योजनेतून नागरिकांना छत्री, चपल जोड, महिलांना साडी देणार; मुख्यमंत्र्यांची अजब घोषणा..

Bhuvneshwar Kumar: या कारणामुळे भुवनेश्वर कुमारला नाईलाजाने घ्यावा लागला निवृत्तीचा निर्णय..

SSC JE Recruitment 2023: SSC अंतर्गत या उमेदवारांसाठी तब्बल 1324 रिक्त जागांची भरती; लगेच करा अर्ज..

Google Pixel 7: Google चा हा दमदार स्मार्टफोन केवळ दहा हजारांत विकत घेण्याची संधी; जाणून घ्या ऑफर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.