successful Life tips: यश तर मिळणार नाहीच, पण या चार गोष्टींना चुकूनही शिवलात तरी जीवनातून उठाल..

0

successful Life tips: जीवनामध्ये (Life) प्रत्येकाला यशवंत (success) व्हायचं असतं. मात्र अफाट कष्ट करून देखील अनेकांना यश मिळत नाही. परंतु यश आणि अपयश या सगळ्या गोष्टींना माणूस स्वतः जबाबदार असतो. तुमचे प्रयत्न आणि तुमच्या चुका यावर तुमचे यश आणि अपयश अवलंबून असते. काही गोष्टींकडे नकळत तुमच्याकडून दुर्लक्ष होते, आणि मग तुम्हाला वाटत राहत आपण खूप कष्ट करूनही यश मिळत नाही. परंतु या सर्वांना तुम्ही स्वतःचा अगोदर असता.

माणसाच्या जीवनामध्ये त्याग आणि मोह या दोन गोष्टी खूप महत्वपूर्ण आहेत. आचार्य चाणक्य यांनी देखील यशस्वी जीवनाचा मार्गक्रम करत असताना काही गोष्टींचा त्याग मानवाला करावाच लागतो. अन्यथा माणूस जीवनातून उठतो. असं सांगितले आहे. तुम्हाला माहिती आहे, आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) हे थोर विद्वान होते. आपल्या चाणक्य नीतिच्या (Chanakya Niti) अनेकांना विद्वान बनवलं होतं. जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर मानवाने चार गोष्टींचा त्याग करायलाच हवा. असं त्यांनी आपल्या चाणक्य नीति या ग्रंथामधून सांगितलं आहे.

जीवनात यश मिळत असेल तर आचार्य चाणक्य सांगतात, मानवाने कधीच अभिमान बाळगू नये. जीवनात यश अपयश येत असतात. मात्र यश मिळाल्यानंतर त्या गोष्टींचा अभिमान बिलकुल बाळगू नये. मानवाला यश मिळाल्यानंतर तो आपल्या ध्येयापासून विचलित होतो.

मिळालेले यश कायम तसेच टिकवून ठेवणं खूप मोठं आव्हान असतं. हे ज्याला जमतं, तो जीवनात यशस्वी होतो. आणि म्हणून कमी जास्त जास्त प्रमाणात यश मिळाल्यानंतर, बिलकुलही अभिमान बाळगता कामा नये. असं चाणक्य सांगतात.

जीवनामध्ये संगत फार महत्त्वाची असते. जर तुम्हाला चांगली संगत लाभली असेल, तर तुमचे जीवन हिऱ्यासारखे चमकू शकते. मात्र वाईटांच्या संगतीमध्ये तुम्ही कायम कोळसाच राहून मराल. असं चाणक्य म्हणतात. तुम्ही करत असलेले काम, किंवा व्यवसायामध्ये तुम्ही तुमचे व्यवसायिक नेटवर्क तयार करणे आवश्यक असते. ज्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळवायचं आहे, अशा क्षेत्रातील लोकांसोबत तुमचा संपर्क असणे आवश्यक असते. ज्याच्यामुळे तुम्हाला संबंधित कामाविषयी ज्ञान प्राप्त होते. असे चाणक्य सांगतात.

माणूस मरेपर्यंत विद्यार्थी असतो, हे वाक्य तुम्ही अनेकदा वाचले ऐकले असेल. मनुष्य कधीच सर्वगुण संपन्न होत नाही. जीवन जगत असताना रोज त्याला काही ना काही नवीन शिकायला मिळत असते. मात्र त्याने त्याकडे विद्यार्थी म्हणून पाहणं आवश्यक असतं. आपल्या ज्ञानात रोज कशी भर पडेल, नवीन कौशल्य कसे अवगत करता येईल, या गोष्टींकडे मनुष्याने भर देणं आवश्यक असते. तरच तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये यश मिळवू शकता. ज्ञानाशिवाय तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकत नाही, असं चाणक्य सांगतात.

जीवनामध्ये प्रत्येक पावलावर माणसांकडून चुका होत असतात. मात्र त्या चुका कशा सुधारता येतील, त्याकडे फार गांभीर्याने पाहणे आवश्यक असते. कोणी विद्वान तुमच्या चुका दाखवत असेल, तर त्या तुम्ही मान्य देखील करणे गरजेचे असतं. अनेकदा आपण पाहतो, मनुष्याला इतरांनी चूक किंवा दोष सांगितले तर ते आवडत नाही, पटत नाही. परंतु जीवनात यशस्वी व्हायचं असेल, तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करून कधीही यश मिळवता येत नाही, असं चाणक्य सांगतात.

हे देखील वाचा PM Kisan: अजूनही 14 वा हप्ता जमा झाला नाही? मग करा या हेल्पलाईन नंबरवर कॉल..

Partner cheating Tips: तुमचीही गर्लफ्रेंड दुसऱ्यासोबत चॅट करतेय? ही एक ट्रिक पकडुन देईल रंगेहाथ..

PM Matru Vandana Yojana: या महिलांना सरकार देतंय 6 हजार; असा घ्या लाभ..

Bhuvneshwar Kumar: या कारणामुळे भुवनेश्वर कुमारला नाईलाजाने घ्यावा लागला निवृत्तीचा निर्णय..

Astrology: ..म्हणून लग्नाच्या अगोदरच हे लोक बनतात प्रचंड श्रीमंत..

Google Pixel 7: Google चा हा दमदार स्मार्टफोन केवळ दहा हजारांत विकत घेण्याची संधी; जाणून घ्या ऑफर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.