Asia Cup 2023: सूर्या, संजूसह या खेळाडूची आशिया कपमधून हकालपट्टी; असा असेल asia cup स्पर्धेचा संघ..

0

Asia Cup 2023: वेस्टइंडीज विरुद्धची एकदिवसीय मालिका पार पडल्यानंतर, भारतीय क्रिकेट संघाला आता आशिया चषक स्पर्धा खेळायची आहे. यावर्षी होणाऱ्या वर्ल्डकपच्या दृष्टीने आशिया चषक स्पर्धा खूप महत्त्वाची असून, भारतीय संघापुढे असंख्य प्रश्न आहेत. भारतीय क्रिकेट संघाला असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधून संघ बांधणी करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. दुखापतीतून अनेक खेळाडू भारतीय संघात परतणार असल्याने आता संघ निवडीत आणखीन पेच निर्माण झाला आहे. (Sanju Samson, KL Rahul, shreyas Iyer, suryakumar yadav, ishan Kishan)

गेली दोन वर्ष भारतीय क्रिकेटसाठी फारशी चांगली राहिली नाहीत. टी ट्वेंटी विश्वचषक, आशिया चषक, आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये देखील भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. एकीकडे भारतीय संघाकडून खराब कामगिरी झालीच, मात्र दुसरीकडे संघ निवडीत देखील अनेक चुका झाल्या. साहजिक त्यामुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. आता पुन्हा एकदा आशिया चषक आणि वर्ल्डकप स्पर्धेची प्लेइंग११ निवडणे हे मोठे आव्हान असणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाला चौथा आणि पाचव्या क्रमांकाचा फलंदाज अद्यापही सेट करता आला नाही. भारताकडे सलामी जोडी आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज वगळता इतर क्रमांकाची मोठी डोकेदुखी आहे. गेल्या दोन वर्षात अनेकांनी चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली. मात्र कोणालाही आपलं स्थान निश्चित करता आलं नाही. पाचव्या क्रमांकासाठी केएल राहुलकडे (KL Rahul) पाहिलं जात होतं. मात्र अचानक त्याला झालेल्या दुखापतीमुळे पाचव्या क्रमांकाचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.

दुखापतीनंतर आपण सावरलो असल्याचं अप्रत्यक्षपणे त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून जाहीर केल आहे. असं असलं तरी त्याच्या फॉर्म विषयी मोठी चिंता भारतीय क्रिकेटला आहे. दुसरीकडे श्रेयस अय्यर (shreyas Iyer) देखील दुखापतीमुळे गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. आता या दोघांचंही आशिया चषक स्पर्धेत कमबॅक होणार असल्याचे समोर आलं आहे.

दोघांच्या दुखापती नंतर भारतीय संघात चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केलेल्या खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या दोन्ही फलंदाजाकडे भारतीय संघाला जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. या दोन्ही फलंदाजाला अंतिम 11 मध्ये संधी देण्यात येणार असल्याने, आता सूर्यकुमार यादव (suryakumar yadav) संजू सॅमसन (Sanju Samson) आणि ईशान किशनवर (ishan Kishan) बाहेर बसण्याची वेळ आली आहे.

संजू सॅमसनला गेल्या आठ वर्षांमध्ये केवळ 30 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली. आता पुन्हा एकदा त्याला भारताच्या एकदिवसीय संघामधून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची दाट शक्यता आहे. संजू सॅमसनला भारताच्या पंधरा सदस्यांच्या संघात देखील स्थान मिळणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. दुसरा बॅकअप विकेट किपर फलंदाज म्हणून भारतीय संघात ईशान किशनची वर्णी लागू शकते. मात्र त्याला देखील अंतिम अकराच्या संघात संधी मिळणार नाही.

दुसरीकडे श्रेयस अय्यर देखील दुखापतीतून सावरल्याने त्याची देखील भारतीय संघात चौथ्या क्रमांकासाठी निवड केली जाणार आहे. साहजिकच त्यामुळे सूर्यकुमार यादवचे प्लेइंग इलेव्हन मधील स्थान देखील आता धोक्यात आलं आहे. पंधरा सदस्य खेळाडूच्या यादीमध्ये सूर्यकुमार यादवचे नाव असेल, मात्र भारताच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये त्याला देखील संधी मिळणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. म्हणजेच ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन या तिन्ही खेळाडूंना भारतीय संघात खेळण्याची संधी मिळणार नाही.

असा असेल Asia Cup साठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कॅप्टन) शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

हे देखील वाचा India vs West Indies 1st T20I: यशस्वी, टिलक वर्माचा संघात समावेश; असा आहे पहिल्या टी-20 साठी भारतीय संघ..

Ajinkya Rahane: चाहत्यांना झटका..! ..म्हणून अजिंक्य रहाणेने क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला..

Chanakya Niti: म्हणून या पुरुषांसाठी महिला काहीही करायला असतात तयार..

successful Life tips: यश तर मिळणार नाहीच, पण या चार गोष्टींना चुकूनही शिवलात तरी जीवनातून उठाल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.