Dhanashree Verma With Siraj: श्रेयस अय्यर नंतर धनश्रीचे मोहम्मद सिराज सोबत अफेअर; त्या व्हायरल फोटोमध्ये झाला खुलासा..

0

Dhanashree Verma With Siraj: भारताचा स्टार लेग स्पिनर युझवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) सोशल मीडियावर (social media) कमालीची सक्रिय असते. धनश्री वर्मा प्रोफेशनने डांसर आहे. डान्सच्या माध्यमातून युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा दोघे एकत्र आले. दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर दोघांनी लग्न देखील केलं. चहल आणि त्याची पत्नी धनश्री दोघे अनेक मजेशीर व्हिडिओ इंस्टाग्राम वर टाकत असतात. मात्र आता मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) सोबत धनश्री वर्माचा तो फोटो व्हायरल (Mohammad Siraj Dhanashree Verma Viral photo) झाल्याने, त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या आहेत.

धनश्री वर्मा सोशल मीडियावर कमालीची ॲक्टिव असते. भारतीय टीमच्या अनेक खेळाडूसोबत तिची चांगली मैत्री देखील आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी धनश्री वर्मा आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. फोटो व्हायरल झाल्यानंतर, या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा देखील रंगल्या होत्या.

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर आणि युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा हे दोघे अनेकदा एकत्र आले आहेत. सूर्यकुमार यादवच्या (surykumar Yadav) घरी डिनरसाठी देखील श्रेयस आणि धनश्री वर्मा गेले होते. विशेष म्हणजे, या डिनर पार्टीत चहलची अनुपस्थितीत होती. एवढंच नाही, तर धनश्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून चहल हे आडनाव देखील काढून टाकले होते. आणि त्यानंतर श्रेयस अय्यर आणि धनश्री या दोघांच्या फेअर्सच्या चर्चा रंगल्या.

धनश्री वर्मा आणि श्रेयस अय्यर या दोघांच्या अफेअरच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर धनश्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून या बातमीचे खंडन केल्याने या चर्चा थांबल्या. मात्र आता पुन्हा एकदा धनश्री वर्माच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. यावेळी मोहम्मद सिराज हे नाव समोर येत आहे. सिराज आणि चहलची चांगली मैत्री आहे. साहजिकच त्यामुळे चहलची पत्नी आणि मोहम्मद सिराज यांचे देखील चांगलं जमतं.

चहलची पत्नी धनश्री वर्माने नुकताच मोहम्मद सिराज सोबतचा एक फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवरून पोस्ट केला. धनश्रीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये दोघेही एकाच पोजमध्ये आहेत. आणि दोघांनीही एकाच कलरचे कपडे देखील परिधान केले आहेत. ज्यामध्ये तिने लिहिले आहे, “सेम टू सेम” धनश्री वर्माने ठेवलेल्या स्टोरीचा स्क्रीन शॉट नंतर सिराजने ठेवल्याने, दोघांच्या अफेअरच्या चर्चानी जोर धरला.

 

दोघांच्या या व्हायरल फोटो नंतर, सोशल मीडियावर या दोघांनाही मोठ्या प्रमाणावर ट्रोल देखील करण्यात येत आहे. सिराजला आशिया कपमुळे वेस्टइंडीज विरुद्ध झालेल्या एकदिवसीय आणि टी ट्वेंटी सिरीजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. कसोटी मालिका पार पडल्यानंतर, सिराज भारतामध्ये परतला आहे. धनश्री वर्मा आणि सिराजने यासंदर्भात खुलासा केला नसला तरी दोघांच्या अफर्सच्या चर्चा मात्र सोशल मीडियावर जोर धरू लागल्या आहेत.

 देखील वाचा IND vs WI 2nd T20: या खेळाडूच्या जागी यशस्वीला संधी; असा आहे दुसऱ्या T20 साठी भारतीय संघ..

BoAt Airdopes: BoAt Airdopes 899 रुपयांत खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या कुठे सुरू आहे ऑफर..

Jio Recharge plan: 84 दिवस वैधता आणि दररोज 3GB डेटा; जियोने सादर केले तीन भन्नाट रिचार्ज प्लॅन..

Jio laptop: Jio ने लॉन्च केला जबरदस्त फीचर्स असणारा लॅपटॉप; किंमत केवळ..

Face fat burning: तुमचाही चेहरा सुजलेला दिसतो? फॉलो करा या चार टिप्स चेहऱ्याची चरबी होईल गायब..

Smartphone Under 15k: 15 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या दमदार स्मार्टफोनची पाहा ही यादी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.