Sharad Pawar: असा घडवला गेला पहाटेचा शपथविधी; शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने एकच खळबळ..

0

Sharad Pawar: महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात शरद पवार इतका मोठा नेता आज तरी नाही. साहजिकच यामुळे शरद पवारांविषयी बातमी क्षणात देशभर पसरते. “लोक माझे सांगाती” या त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आज यशवंतराव चव्हाण सेंटर (yashvantrao Chauhan center) या ठिकाणी करण्यात आले. या पुस्तकातून त्यांनी आपली राजकीय आत्मकथा लिहिली आहे. या राजकीय आत्मकथेच्या सुधारित दुसऱ्याआवृत्तीमध्ये 2015 नंतर घडलेल्या राजकीय घडामोडी शरद पवार यांनी लिहिल्या आहेत.

शरद पवार यांच्या “लोक माझे सांगाती” या राजकीय आत्मकथेच्या 2015 नंतरच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये 2019 मध्ये अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या पहाटेच्या शपथविधी विषयी देखील भाष्य केलं आहे. 2019 मध्ये पहाटेचा शपथविधी संदर्भात शरद पवारांनी या पुस्तकामध्ये संपूर्ण घटनाक्रम लिहिला आहे. आपल्या आत्मकथेमध्ये शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीवर खळबळजनक गौप्यस्फोट केल्याने, आता पुन्हा एकदा राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन, महाविकास आघाडी सरकार (mahavikas aaghadi government) स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. या हालचाली सुरू असतानाच अचानक अजित पवार यांनी भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत शपथविधी केल्याने एकच खळबळ उडाली. आता हा संपूर्ण घटनाक्रम सांगताना, शरद पवारांनी माझ्यासाठी हा धक्का होता असं म्हटलं आहे.

आपल्या आत्मकथेमध्ये शरद पवार लिहितात, नोव्हेंबर 2019 ला सकाळी साडेसहाच्या सुमारास माझ्या घरी एक फोन वाजला. मी फोन घेतल्यानंतर, सांगण्यात आलं राष्ट्रवादीचे अनेक आमदार अजित पवारांसह राजभवनात दाखल झाले आहेत. सोबतच अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा असल्याचे एक पत्र देखील सादर केलं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती मला देण्यात आली. हा माझ्यासाठी मोठा धक्का होता, असा खुलासा शरद पवार यांनी आपल्या आत्मकथेत केला आहे.

शरद पवार आपल्या आत्मकथेमध्ये पुढे लिहितात, महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीने अर्थात पुढाकार घेतला होता. अशातच अजित पवार यांनी घेतलेला हा निर्णय म्हणजे, आमच्या सर्वांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे पाऊल होते. अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीची कल्पना राष्ट्रवादीला किंचितही नव्हती. पहाटेच्या शपथविधीला राष्ट्रवादीची अर्थात माझी परवानगी नसल्याचा दावा या आत्मकथेच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये शरद पवार यांनी केल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

पहाटेच्या शपथविधीवर बोलताना शरद पवार आत्मकथेमध्ये लिहितात, पहाटेच्या शपथविधी विषयी मी आणखी माहिती घेतली. मला समजलं, राजभवनात दहा आमदार पोहोचले आहेत. त्यांच्यापैकी दोघांसोबत मी फोनवर संवाद साधला. तेव्हा मला समजलं, या शपथविधीला माझा पाठिंबा असल्याचं राष्ट्रवादीच्या आमदारांना सांगण्यात आलं आहे. त्यामुळे घडलेला प्रकार हा धक्कादायक तर होताच, मात्र दिशाभूल देखील करणारा होता, त्यामुळे मी लगेच सावरलो.

उद्धव ठाकरेंना लगेच फोन केला..

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊ नये, म्हणून केंद्र सरकार, राज्यातील भाजप आणि राज भवन या तिघांनी मिळून केलेला हा रडीचा होता. असं शरद पवार यांनी आपल्या आत्मकथेमध्ये लिहिलं आहे. या प्रकारानंतर मी लगेच उद्धव ठाकरे यांना फोन केला. आणि राजभवनामध्ये पहाटेच्या शपथविधी विषयी सविस्तर माहिती दिली. त्यावेळी मी त्यांना फोनवर म्हणालो, अजित पवारांनी उचललेल्या पाऊलाला राष्ट्रवादी अजिबात पाठिंबा देत नाही. असा खुलासा “लोक माझे सांगती “या राजकीय आत्मकथेत शरद पवार यांनी केला आहे.

शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीवर केलेल्या गौप्यस्फोटानंतर, अजित पवार आता काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. यापूर्वी अजित पवार यांनी योग्यवेळी मी यासंदर्भात बोलेन, मला जेव्हा बोलू वाटेल, तेव्हाच मी बोलणार असल्याचं या घटनेवर अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पहाटेची शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? असा सवाल उपस्थित केला होतो.

हे देखील वाचा  Virat Kohli Gautam Gambhir fight: भांडण नवीन उल हकशी झालं मग माज गंभीरने का दाखवला? हे आहे त्यामागचं मूळ कारण, पाहा तो व्हिडिओ..

RCB vs LSG: विराट कोहलीच्या त्या कृत्यामुळे नवीन उल हलने कोहलीला ढकलले; पाहा दोन्ही व्हिडिओ..

New Sand Policy: महसूल विभागाचा ऐतिहासिक निर्णय! 7000 ब्रासची वाळू आता मिळणार केवळ 600 रुपयांत; जाणून घ्या सविस्तर..

Dream11 Prediction Tips: Dream11 वर जिंकायचं असेल, तर या पद्धतीने बनवाव्या लागतील 3 टिम्स..

Best Mileage Bike: या चार टू व्हीलरला आहे सर्वात जास्त मायलेज; किंमतही आहे कमी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.