Dream11 Prediction Tips: Dream11 वर जिंकायचं असेल, तर या पद्धतीने बनवाव्या लागतील 3 टिम्स..

0

Dream11 Prediction Tips: सध्या आयपीएलचा (IPL2023) रणसंग्राम सुरू आहे. आयपीएलमुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. आयपीएलमुळे फक्त खेळाडूच मालामाल होत नाहीत, तर अंपायर, समालोचक, ब्रॉडकास्टर्स, एवढंच नाही तर क्रिकेट चाहत्यांना देखील मालामाल होण्याची संधी आयपीएलमुळे मिळाली आहे. माय इलेव्हन सर्कल (my11 circle) ड्रीम इलेव्हन (dream11) या ॲपच्या माध्यमातून क्रिकेटच्या चाहत्यांना लखपती, करोडपती होण्याची संधी मिळाली आहे. (Dream11 Prediction tips)

ड्रीम इलेव्हनवर टीम लावणे, म्हणजे हा जुगार असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. मात्र तुमच्याकडे क्रिकेट नॉलेज आणि अभ्यास या सगळ्याच्या माध्यमातून तुम्ही बक्षीस जिंकू शकता. हे वास्तव नाकारता येणार नाही. कॉम्पिटिशन जास्त असल्याने, जिंकण्याची संधी कमी आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र तुम्ही जर तुमचं क्रिकेट नॉलेज, योग्य अभ्यास करून जर तीन संघ तयार केले, तर जिंकण्याची नक्कीच संधी आहे. आज आपण कोणत्या गोष्टी लक्षात, घेऊन कशाप्रकारे तीन संघ बनवायचे? याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

जर तुम्हाला क्रिकेटचं नॉलेज असेल, खेळाडूंच्या खेळाविषयी माहिती असेल, तर तुम्हाला या खेळात जिंकण्याची संधी आहे. खेळाडूंचा सध्याचा फॉर्म, संघाची कामगिरी, खेळपट्टीचा अभ्यास, आणि टॉस या गोष्टी लक्षात घेऊनच तुम्ही टीम बनवत असाल, यात शंका नाही. मात्र याव्यतिरीक्त देखील काही गोष्टी लक्षात घेऊनच टीम बनवणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला जिंकण्याची अधिक संधी आहे.

खेळाडूंचा फॉर्म, संघाची कामगिरी, खेळपट्टी

ड्रीम इलेव्हनवर टीम निवडताना अनेकजण सध्याचा खेळाडूचा फॉर्म कसा आहे? या गोष्टी विचारात घेतात. शिवाय संघाची सध्याची कामगिरी कशी राहिली आहे, याचा देखील विचार करतात. संघाची कामगिरी जर चांगली राहिली नसेल, तर त्या संघातील खेळाडू दबावात खेळत असतात. साहजिकच यामुळे परफॉर्मन्स व्यवस्थित होत नाही. म्हणून आपल्या संघात संघर्ष करणाऱ्या संघाचे कमी खेळाडू निवडणे गरजेचे असते.

जर तुम्ही ड्रीम इलेव्हनवर (dream11) टीम बनवत असाल, तर तुम्ही खेळपट्टीचा विचार करूनच संघ निवडत असाल, याविषयी देखील शंका नाही. जर खेळपट्टी स्पिनरला साथ देणारी असेल, तर अर्थात तुम्ही शक्यतो ऑलराऊंडर खेळाडूंना तुमचा कर्णधार किंवा उपकर्णधार निवडत असाल. एखाद्या खेळाडूचे फलंदाज स्पिनर्सला व्यवस्थित खेळत नाहीत, या गोष्टी देखील लक्षात घेऊन तुम्ही संघ निवड करणे गरजेचे असते. मात्र याशिवाय आणखीही काही डावपेच आहेत, वाचा सविस्तर.

असे निवडा तीन संघ

ड्रीम इलेव्हनवर जर तुम्हाला जिंकायचं असेल, तर तुम्ही एक टीम तयार करून कधीही जिंकू शकणार नाही. तुम्हाला तीन टीम तयार कराव्या लागतील. पहिला संघ तयार करताना तुम्ही, फॉर्ममध्ये असणाऱ्या खेळाडूंना संधी द्या. जो संघ स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत आहे, अशा संघातील जास्त खेळाडूंना तुमच्या संघात समाविष्ट करा. आणि जे खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत अशाच खेळाडूंना तुम्ही कॅप्टन आणि उपकर्णधार म्हणून निवडा. पहिल्या टीममध्ये तुम्ही उपकर्णधार फॉर्ममध्ये असणारा अष्टपैलू खेळाडू निवडा. तर कॅप्टन हा स्पर्धेतला उत्तम फलंदाज करा.

दुसरा संघ

दुसरा संघ निवडताना देखील तुम्ही पहिल्या संघाचा विचार करूनच दुसऱ्या संघ निवडणे आवश्यक आहे. एकाच संघातील दोन खेळाडूंना तुम्ही कॅप्टन आणि उपकॅप्टन म्हणून निवडू नका. दुसरा संघ निवडताना तुम्ही विरोधी संघाचा उत्कृष्ट गोलंदाज कर्णधार किंवा उपकर्णधार म्हणून निवडा. आणि प्रतिस्पर्धी संघाचा उत्कृष्ट फलंदाज कर्णधार किंवा उपकर्णधार म्हणून निवडा.

तिसरा संघ

तिसरा संघ निवडताना तुम्ही सर्व समावेशक संघ निवडायचा आहे. यामध्ये तुम्ही कोणत्या संघाची प्रथम फलंदाजी आली आहे, याचा विचार करणे आवश्यक आहे. जर एखादा संघ धावा चेस करताना कोलमडत असेल तर अशा संघातील फलंदाजांना तुम्ही तुमचा कॅप्टन किंवा उपकॅप्टन म्हणून निवडू नका. एखादा संघ जर धावांचा व्यवस्थित पाठलाग करत नसेल, तर त्या संघातील अधिक गोलंदाज निवडा.

एखादा संघ धावांचा व्यवस्थित पाठलाग करत असेल, तर अशा संघातील फलंदाजाला कर्णधार बनवा. एखादा संघ प्रथम फलंदाजी करत असताना, चांगली फलंदाजी करत नसेल, आणि त्याच संघाची प्रथम फलंदाजी आली असेल, तर त्या संघातील मधल्या फळीतला फलंदाज किंवा ऑलराऊंडर असणाऱ्या खेळाडूला तुम्ही कॅप्टन म्हणून निवडू शकता. अशा पद्धतीने तीन संघ बनवले, तर तुम्हाला जिंकण्याची अधिक संधी आहे.

हे देखील वाचाBest Mileage Bike: या चार टू व्हीलरला आहे सर्वात जास्त मायलेज; किंमतही आहे कमी..

IPL 2023: आयपीएलला गालबोट! दिल्लीच्या खेळाडूने पार्टीत महिलेसोबत केले ते विचित्र अश्लील कृत्य; ..तर करार होणार रद्द.. 

Mango eating tips: 80 टक्के लोकांना आंबा खाण्याची ही योग्य पद्धत माहितीच नाही; लगेच जाणून घ्या अन्यथा..

TATA electric bicycle: टाटाची सगळ्यात स्वस्त आणि दमदार सायकल बाजारात दाखल; किंमत आहे केवळ..

IRCTC Tatkal Ticket Booking: रेल्वेचे तत्काळ तिकीट या ठिकाणी करा बूक, अन्यथा होईल मोठी अडचण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.