IRCTC Tatkal Ticket Booking: रेल्वेचे तत्काळ तिकीट या ठिकाणी करा बूक, अन्यथा होईल मोठी अडचण

IRCTC Tatkal Ticket Booking: या लेखात आपण रेल्वे तिकीट बुक करण्या संदर्भातील अत्यंत महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तुमची एक चूक तुम्हाला मोठी अडचण निर्माण करू शकते. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा. बऱ्याचदा कुठे बाहेर जायचे असेल त्यावेळी अचानक रेल्वे तिकीट मिळत नाही. मग रेल्वेने प्रवास करण्यासाठी जनरलने प्रवास करावा लागतो. परंतु लांब पल्ल्याचा प्रवास जनरल डब्यात बसून करणे अवघड होऊन जाते. बऱ्याचदा एवढी गर्दी पाहायला मिळते की उभे राहून प्रवास करणे देखील अवघड होते. याच गर्दीचा फायदा घेत, चोरी होण्याची देखील शक्यता असते. शिवाय हा प्रवास रात्रीचा असेल तर मग अजूनच अवघड होऊन बसते. त्यामुळे मग बरेच लोक बसने किंवा मग खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करण्यात समाधान मानतात. परंतु हा प्रवास रेल्वेच्या तिकिटाच्या तुलनेत अधिक खर्चिक असतो.

 

मग अशावेळी अचानक प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने एक सुविधा दिलेली आहे. ती सुविधा म्हणजे तत्काळ तिकीट बुकिंग सुविधा (IRCTC Tatkal Ticket Booking). रेल्वेने तत्काळ प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी काही जागा राखीव ठेवलेल्या असतात. या राखीव तिकिटांचा वापर करून तुम्ही तुमचा प्रवास करू शकता. परंतु तत्काळ तिकिटाचे दर साधारण तिकीट दरापेक्षा अधिक असतात. त्यामुळे तुम्हाला तत्काळ तिकीट सेवेसाठी अधिकचे पैसे द्यावे लागतात. ही रक्कम १०० पेक्षा अधिक असू शकते. त्यामुळे जर तुम्हाला अगोदरच प्रवासाची तारीख माहिती असेल तर सामान्य तिकीटे बूक करणे फायदेशीर राहील. जेणेकरून आपल्याला तत्काळ तिकीट बूक (IRCTC Tatkal Ticket Booking) करण्याचे अधिकचे चार्जेस द्यावे लागणार नाहीत.

 

आपल्याला तिकीट बुकिंग करणाऱ्या वेगवेगळ्या ॲप्स पाहायला मिळतात. ह्या ॲप्स रेल्वेच्या तिकीट बुकिंग एजंटचे काम करतात. ह्या ॲपचा वापर करून आपण आपले तिकीट बूक करू शकता. परंतु ह्या ॲपच्या सहाय्याने बूक केलेल्या तिकिटावर तुम्हाला ३० ते ४० रुपये अधिक द्यावे लागतात. त्यामुळे जर तुम्हाला अधिकचे ३० ते ४० रुपये वाचवायचे असतील तर तुम्ही तुमच्या मोबाईलमधील प्लेस्टोरला भेट देऊन IRCTC Rail Connect हे ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर करू शकता. हे भारतीय रेल्वेचे अधिकृत ॲप आहे. प्ले स्टोअरवर हे ॲप आपल्याला मिळेल. तसेच त्या ठिकाणी या ॲपचा आयआरसीटीसी (IRCTC) अधिकृत ॲप असा देखील उल्लेख केलेला आहे.

 

या ॲपचा वापर केला तरच मिळेल तत्काळ तिकीट अन्यथा करावा लागेल अडचणीचा सामना (IRCTC Tatkal Ticket Booking): बऱ्याचदा आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात. आपल्याला त्या गोष्टी अडचणीचा सामना करावा लागल्यावरच समजतात. त्यामुळे आपण आता एक अत्यंत महत्वाची बाब जाणून घेणार आहोत. रेल्वेच्या वेगेवेगळ्या तिकिट बुकिंग एजंट ॲपवर आपल्याला तत्काळ तिकीट कोटा पाहायला मिळतो. परंतु या ठिकाणी एक गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे, ती म्हणजे या ठिकाणी जरी आपल्याला तत्काळ तिकीट कोटा पाहायला मिळत असला तरीदेखील तुमची अडचण होऊ शकते.

 

याचे कारण असे की रेल्वेचे तत्काळ तिकीट बुकिंग करण्याची वेळ ट्रेन सुटण्याच्या अगोदरच्या दिवशी सकाळी १० वाजता सुरू होते. परंतु हे तिकीट AC क्लास म्हणजे 2A/3A/CC/EC/3E यासाठी असते. तर सकाळी 11 वाजता Non- AC क्लास अर्थात SL/FC/2S तिकीट बुक करता येऊ शकते. परंतु ही तिकीटे IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवरून अर्थात irctc.co.in या वेबसाइटचा किंवा वरील उल्लेख केलेल्या IRCTC Rail Connect या या ॲपवरून तिकीट बुक करता येतील. त्यानंतर इतर एजंट ॲपवर Ac क्लास तिकीटे 10:15 मिनिटांनी जर तिकीटे शिल्लक असतील तर उपलब्ध होतात आणि Non AC साठी 11 वाजून 15 मिनिटांनी तिकीटे बूक करता येतात. परंतु या ठिकाणी तिकीटे शिल्लक असतील तरच बूक करता येईल.

 

याचा अर्थ असा की तत्काळ तिकीट बूक करण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट आणि ॲपला पहिल्यांदा प्राधान्य दिले जाते. त्या ठिकाणी तिकीटे शिल्लक राहिली तरच ती एजंट ॲप वरून बूक करता येतील. त्यामुळे आपली मोठी अडचण होऊ शकते. कारण बऱ्याचदा तत्काळ तिकिटे 5 ते 10 मिनिटात बूक होतात. त्यामुळे जर तुम्हाला तत्काळ तिकीटे बूक करायची असतील तर रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट irctc.co.in किंवा वरील उल्लेख केलेल्या IRCTC Rail Connect या ॲपचा वापर करा जेणेकरून तुम्हाला तिकीट मिळू शकेल आणि अधिकृत वेबसाईट आणि ॲपचा वापर केल्याने तुमचे अधिकचे पैसे देखील वाचवता येतील. अशाच माहितीसाठी आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून अशीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल.

हेही वाचा: TATA electric bicycle: टाटाची सगळ्यात स्वस्त आणि दमदार सायकल बाजारात दाखल; किंमत आहे केवळ..

Mangoes Buying Tips: या तीन गोष्टी तपासून ओळखता येतो आंबा गोड आहे की आंबट; जाणून घ्या या तीन सोप्या ट्रिक्स..

PM Kisan Samman Nidhi: १४ व्या हप्त्याची तारीख निश्चित! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार ४ हजाराचा हप्ता; तुम्हाला मिळणार का? जाणून घ्या या पध्दतीने..

MahaDBT Scheme: आता मागेल त्या शेतकऱ्यांना मिळणार शेततळे, ठिबक सिंचन, फळबाग; जाणून घ्या सविस्तर..

IPL 2023: नाकातून मेकुड काढून अर्जुन तेंडुलकरने टाकला तोंडात; व्हिडिओ झाला कॅमेऱ्यात कैद..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.