IPL 2023: आयपीएलला गालबोट! दिल्लीच्या खेळाडूने पार्टीत महिलेसोबत केले ते विचित्र अश्लील कृत्य; ..तर करार होणार रद्द.. 

0

IPL 2023: आयपीएलच्या 16 व्या हंगामात (IPL season16) दिल्ली कॅपिटल (Delhi capitals) संघ फारस निराशाजनक कामगिरी करत आहे. एकीकडे या हंगामात दिल्ली कॅपिटल संघ सुमार कामगिरी करत असतानाच, दुसरीकडे शरमेने मान झुकण्यासारखे घाणेरडं कृत्य खेळाडूने केले आहे. दुखापतीमुळे ऋषभ पंत (Rishabh pant) या हंगामात खेळत नाही. त्याच्या जागी कर्णधार पदाची भूमिका डेविड वॉर्नर (David Warner) बजावत आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्त्वात दिल्ली संघाने सात सामन्यात केवळ दोन विजय संपादन केले आहेत. अशातच दिल्ली कॅपिटल्स संघाच्या गोटात खळबळजनक घटना घडली आहे.

आयपीएलचा 16 व्या हंगामातील अर्ध्याहून अधिक सामने पार पडले आहेत. स्पर्धा मध्यावर आल्यानंतर, आता या स्पर्धेला गालबोट लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. हैदराबाद संघावर दिल्ली कॅपिटल संघाने विजय मिळवल्यानंतर दिल्लीचे काही खेळाडू पार्टीमध्ये सहभागी झाले. 24 एप्रिल रोजी पार्टीत सहभागी झाल्यानंतर, दिल्ली संघाच्या खेळाडूने अश्लील वर्तन केल्याची घटना उघड झाली आहे. यासंदर्भात संघ व्यवस्थापकाने कठोर पावली उचलली असून, आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

विजयानंतर 24 एप्रिलला दिल्ली संघाचे काही खेळाडू पार्टीमध्ये सहभागी झाले. पार्टीमध्ये सहभागी झाल्यानंतर, खेळाडूंच्या डोक्यात नशा गेली. भर पार्टीमध्ये खेळाडूने महिलेशी अश्लील वर्तन केले. यासंदर्भात संघ व्यवस्थापक टीमने गुप्तता ठेवली असून, या खेळाडूचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही. घटनेनंतर आता संघ व्यवस्थापकाने कठोर पावले उचलली असून, खेळाडूंना कडक नियम केले आहेत.

१० वाजल्या नंतर…

दिल्ली कॅपिटल संघाचे सर्व खेळाडूंना आता त्यांच्या ओळखीच्या लोकांना आपल्या हॉटेलमध्ये रात्री दहाच्या पुढे घेऊन जाण्याची परवानगी रद्द करण्यात आली आहे. दहानंतर जर खेळाडूंना आपल्या ओळखीच्या लोकांना भेटायचं असेल तर रूममध्ये न भेटता हॉटेलमधील किंवा रेस्टॉरंट मधील सार्वजनिक ठिकाणीच भेटता येणार आहे.

एवढंच नाही तर खेळाडूंना हॉटेल सोडून बाहेर जायचं असेल, तरीदेखील न सांगता खेळाडूंना जाता येणार नाही. बाहेर जायचं असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांना सांगूनच बाहेर जावं लागणार आहे. हैदराबाद संघाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर ही घटना घडली. आणि म्हणून 24 एप्रिल नंतर संघ व्यवस्थापकाने हे कठोर नियम दिली कॅपिटल संघाच्या खेळाडूंसाठी केले आहेत.

करार होणार रद्द..

जर आणीबाणी सारखी परिस्थिती असेल, तरी देखील खेळाडूंना संघ व्यवस्थापकांना न सांगता हॉटेल सोडता येणार नाही. अशावेळी खेळाडूंनी इंटिग्रिटी ऑफिसला या संदर्भात माहिती देऊनच रूम सोडावी लागणार आहे. सोबतच व्यवस्थापक या संदर्भात खेळाडूंसाठी एक ओळखपत्र देखील जारी करणार आहे. खेळाडूंनी या नियमाचे उल्लंघन केल्यास, मोठा दंड ठोठावला जाणार आहे. प्रकरण फारच गंभीर असेल, तर मात्र खेळाडूंचा थेट करार देखील रद्द केला जाणार आहे.

नवीन नियमानुसार खेळाडू आपली पत्नी किंवा गर्लफ्रेंडला सोबत आणू शकतात. मात्र आपल्या पार्टनरचा खर्च त्यांना स्वतः करावा लागणार आहे. याशिवाय आपल्या सोबत कोण राहणार? याची माहिती देखील संघ व्यवस्थापकाला देणं खेळाडूंना बंधनकारक आहे. सात सामन्यात पाच पराभव आणि दोन विजयासह दिल्लीचा संघ तळाशी आहे. दिल्ली संघाला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा IPL 2023: जहीर खानचं वाढलेलं पोट विराटने जोरजोरात चोळलं; झहीर म्हणाला.., व्हिडिओ होतोय व्हायरल..

IPL 2023: नाकातून मेकुड काढून अर्जुन तेंडुलकरने टाकला तोंडात; व्हिडिओ झाला कॅमेऱ्यात कैद..

TATA electric bicycle: टाटाची सगळ्यात स्वस्त आणि दमदार सायकल बाजारात दाखल; किंमत आहे केवळ..

SBI e-mudra loan: स्टेट बँकेत अकाऊंट आहे? लगेच करा अर्ज घर-बसल्या मिळेल दोन लाख कर्ज..

IRCTC Tatkal Ticket Booking: रेल्वेचे तत्काळ तिकीट या ठिकाणी करा बूक, अन्यथा होईल मोठी अडचण

Mango eating tips: 80 टक्के लोकांना आंबा खाण्याची ही योग्य पद्धत माहितीच नाही; लगेच जाणून घ्या अन्यथा..

PM Kisan Samman Nidhi: १४ व्या हप्त्याची तारीख निश्चित! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार ४ हजाराचा हप्ता; तुम्हाला मिळणार का? जाणून घ्या या पध्दतीने..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.