IPL 2023: जहीर खानचं वाढलेलं पोट विराटने जोरजोरात चोळलं; झहीर म्हणाला.., व्हिडिओ होतोय व्हायरल..

0

IPL 2023: सध्या आयपीएलचा (IPL 2023) रणसंग्राम सुरू आहे. आयपीएलमुळे अनेक निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंना नवीन खेळाडूंसोबत संवाद साधण्याची संधी मिळते. सामना संपल्यानंतर, समालोचकाची भूमिका बजावणारे अनेक माजी खेळाडू स्टार खेळाडूंबरोबर मजा मस्ती करताना पाहायला मिळतात. आयपीएलमुळे हा मजेशीर संवाद आता चाहत्यांना देखील सोशल मीडियावर पाहायला मिळतो. विराट कोहली (Virat Kohli) आणि झहीर खान (Zahir Khan Virat Kohli video) मधला देखील एक मजेशीर संवाद सोशल मीडियावर (social media) चांगलाच वायरल (Viral) झाला आहे.

विराट कोहली आपल्या फिटनेसला घेऊन किती जागृत आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. विराट कोहलीमुळे भारतीय क्रिकेटचंं फिटनेस स्टॅंडर्ड अक्षरशः बदलून गेलं. पूर्वी फॅट असणारे अनेक खेळाडू भारतीय क्रिकेटमध्ये खेळत होते. मात्र आता भारतीय क्रिकेटमध्ये पूर्णपणे बदल झाला असून, याचं सगळं श्रेय विराट कोहलीला जाते.

कोलकत्ता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स (RCB vs KKR) बंगलोर यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर, विराट कोहली, जहीर खान आणि रॉबिन उथप्पा या तिघांनी मैदानावर संवाद साधला. संवाद साधत असताना विराट कोहलीने जहीर खानला मिठी मारली. मात्र जहीर खानचे पोट पुढे आल्याचे लक्षात केल्यानंतर, कोहलीने त्याची चांगलीच खिल्ली उडवली.

जहीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. साहजिक कोणत्याही प्रकारचे क्रिकेट जहीर खान खेळत नसल्याने, त्याचा फिटनेस पूर्वीसारखा राहिला नाही. विराट कोहलीने जहीर खानला मिठी मारताना त्याच्या पोटावरून हात फिरवत किल्ली उडवली. हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. विराट कोहलीने जहीर खानची खिल्ली उडवल्यानंतर, जवळ असणारा रॉबीन उत्तप्पा देखील जोरजोरात हसत आहे.

या तिघांच्या संवादाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, नेटकऱ्यांनी झहीर खानला ट्रोल केलं. काहींनी जहीर खानला ट्रोल केलं, तर काहींनी त्याला साथ देत विराट कोहलीला ट्रोल केलं. आता तो निवृत्त झाला आहे. वय देखील वाढलं आहे. साहजिकच अशा वयात फिटनेस राखणं प्रत्येकाला शक्य होत नाही. सिनियर खेळाडूंची रिस्पेक्ट केली पाहिजे. असं म्हणत काहींनी विराटला सुनावलं. मात्र हा व्हिडिओ मजेशीर आहे. हा सगळा संवाद मजेशीर आहे. शिवाय दोघे चांगले मित्र देखील आहेत.

हे देखील वाचा IPL 2023: नाकातून मेकुड काढून अर्जुन तेंडुलकरने टाकला तोंडात; व्हिडिओ झाला कॅमेऱ्यात कैद..

RCB vs KKR: हे चार खेळाडू खेळतात गल्ली क्रिकेट, आमची जिंकण्याची लायकी नाही; विराटच्या विधानाने खळबळ..

TATA electric bicycle: टाटाची सगळ्यात स्वस्त आणि दमदार सायकल बाजारात दाखल; किंमत आहे केवळ..

PM Kisan Samman Nidhi: १४ व्या हप्त्याची तारीख निश्चित! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार ४ हजाराचा हप्ता; तुम्हाला मिळणार का? जाणून घ्या या पध्दतीने..

Simple Energy EV: ताशी 105 किमी प्रवास, एका चार्जमध्ये 236 किमी रेंज, किंमत फक्त इतकी..; जाणून घ्या या दमदार इलेक्ट्रिक स्कूटर विषयी..

IRCTC Tatkal Ticket Booking: रेल्वेचे तत्काळ तिकीट या ठिकाणी करा बूक, अन्यथा होईल मोठी अडचण

SBI e-mudra loan: स्टेट बँकेत अकाऊंट आहे? लगेच करा अर्ज घर-बसल्या मिळेल दोन लाख कर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.