Simple Energy EV: ताशी 105 किमी प्रवास, एका चार्जमध्ये 236 किमी रेंज, किंमत फक्त इतकी..; जाणून घ्या या दमदार इलेक्ट्रिक स्कूटर विषयी..

0

Simple Energy EV: इंधनाच्या किंमती दिवसेंदिवस वाढत चालल्या असल्याने अनेक जण इलेक्ट्रिक वाहन खरेदी करत आहे. ग्राहकांचे मागणी लक्षात घेऊन, आता अनेक बड्या कंपन्या देखील इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करत आहेत. अनेक बड्या कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटरची निर्मिती केली आहे. मात्र आता बाजारात अशी एक इलेक्ट्रिक स्कूटर आली आहे, जीने अनेक बड्या कंपन्यांचा बाजार उठवला आहे. कारण कमी किंमती बरोबरच एकदा चार्ज केल्यानंतर, ही इलेक्ट्रिक स्कूटर तब्बल 236 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते.

तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याच्या विचारात असाल, तर तुम्हाला एक महिना वाट पाहावी लागणार आहे. Simple Energy EV ही इलेक्ट्रिक स्कूटर मे च्या शेवटच्या आठवड्यात बाजारामध्ये दाखल होणार आहे. ही एक भारतीय टू व्हीलर स्टार्टअप कंपनी असून, आता या कंपनीने आपल्या आगामी इलेक्ट्रिक टू व्हीलरची निर्मिती केली आहे. ही देशातली सर्वात दमदार इलेक्ट्रिक स्कूटर असणार आहे. एका चार्जला ही इलेक्ट्रिक स्कूटर तब्बल 236 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते.

सिम्पल वन कंपनीने गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये आपली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल होईल असं सांगितलं होतं. आता सिम्पल एनर्जी या कंपनीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे, आगामी सिंपल वन ही इलेक्ट्रिक स्कूटर 23 मे ला बेंगलोर या ठिकाणी लॉन्च होणार आहे. बाजारामध्येही ही इलेक्ट्रिक स्कूटर दाखल झाल्यानंतर बजाज (Bajaj) टाटा (tata) ओला (ola) अशा अनेक इलेक्ट्रिक स्कूटरचा बाजार उठणार आहे. कारण एका चार्जमध्ये 236 किलोमीटरचा प्रवास करणारी पहिलीच इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

रेंज आणि वैशिष्ट्ये

Simple One electric scooter एकदा चार्ज केल्यानंतर, तब्बल 236 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करते. या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खूपच दमदार आहे. कंपनीने 4.8 ४.८KWH पॉवरची बॅटरी या इलेक्ट्रिक स्कूटरला दिली आहे. जी ७२ न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या गाडीला जबरदस्त स्पीड आणि पिकअप देण्यात आला आहे.

40 किलोमीटरचा वेग धारण करण्यासाठी या गाडीला केवळ अडीच सेकंद लागतात. ताशी 105 किलोमीटरने ही गाडी प्रवास करू शकते. 40 किलोमीटरचा वेग धारण करण्यासाठी केवळ अडीच मिनिटे, त्याचबरोबर ताशी 105 किलोमीटरचे अंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर कापत असल्याने, ग्राहकांना या स्कूटर विषयी कमालीची उत्सुकता आहे.

किंमत

प्रत्येकाला कमी किमतीमध्ये चांगली वैशिष्ट्ये असणारी दमदार स्कूटर खरेदी करायची असते. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतात. विशेष म्हणजे, या गाडी खरेदीवर तुम्हाला फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध आहेत. गाडीच्या किमती विषयी बोलायचं झाल्यास, या गाडीची किंमत एक लाख ते दीड लाख रुपयांच्या दरम्यान असणार आहे.

महत्त्वाचं म्हणजे, आतापर्यंत या गाडीने एक लाखाहून अधिक बुकिंग मिळवले आहेत. तुम्ही देखील या गाडीचे बुकिंग करू इच्छित असाल, तर तुम्हाला १,९४७ रुपयांमध्ये बुक करता येणार आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही या इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग करू शकता. TATA electric bicycle: टाटाची सगळ्यात स्वस्त आणि दमदार सायकल बाजारात दाखल; किंमत आहे केवळ..

हे देखील वाचा PM Kisan Samman Nidhi: १४ व्या हप्त्याची तारीख निश्चित! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार ४ हजाराचा हप्ता; तुम्हाला मिळणार का? जाणून घ्या या पध्दतीने..

MahaDBT Scheme: आता मागेल त्या शेतकऱ्यांना मिळणार शेततळे, ठिबक सिंचन, फळबाग; जाणून घ्या सविस्तर..

Mangoes Buying Tips: या तीन गोष्टी तपासून ओळखता येतो आंबा गोड आहे की आंबट; जाणून घ्या या तीन सोप्या ट्रिक्स..

IPL 2023: नाकातून मेकुड काढून अर्जुन तेंडुलकरने टाकला तोंडात; व्हिडिओ झाला कॅमेऱ्यात कैद..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.