Mango eating tips: 80 टक्के लोकांना आंबा खाण्याची ही योग्य पद्धत माहितीच नाही; लगेच जाणून घ्या अन्यथा..

0

Mango eating tips: सध्या आंब्याचा सिझन सुरू आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आंबा आवडीने खाल्ला जातो. एवढेच नाही, तर या सीजनमध्ये प्रत्येक घरात आठवड्यातून किमान एकदा तरी आमरस चपाती हा पदार्थ आवडीने केला जातो. प्रत्येकजण आंबा खात असला तरी आंबा खाण्याची योग्य पद्धत प्रत्येकाला माहित असतेच असं नाही. आंबा खाण्याची योग्य पद्धत माहिती नसेल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण चुकीच्या पद्धतीने आंबा खाल्ल्याने आरोग्याची समस्या उद्भते.

बाजारातून आंबे विकत आणल्यानंतर घरातली मंडळी आंबा धुवून, पिळून किंवा कापून खात असतात. मात्र आंबा खाण्याची ही योग्य पद्धत नाही. आंबा बाजारातून घरी आणल्यानंतर, किमान दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवणे आवश्यक असते. आंबा पाण्यात भिजत ठेवून नंतर कापून खाण्याची ही पद्धत फार जुनी आहे. मात्र अलीकडे असं होताना पाहायला मिळत नाही.

आता अनेकांना प्रश्न पडला असेल, आंबा पाण्यात दोन तास भिजत ठेवल्याने काय फरक पडणार आहे. मात्र खूप फरक पडतो, याला अनेक शास्त्रीय कारणे आहेत. आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता असते. आंबा जर पाण्यात दोन तास भिजत ठेवला तर उष्णता बाहेर फेकली जाते. तुम्हाला माहिती आहे, आंब्यामध्ये अनेक प्रकारचे विटामिन्स आहेत.

आंब्यामध्ये आहेत हे घटक

आंब्यामध्ये उष्णता असली तरी देखील आंब्यामधील उष्णता कमी करता येऊ शकते. उष्णताव्यतिरिक्त आंब्यामध्ये विटामिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात आहेत. आंब्यामध्ये A C B6 फायबर, कॉपर, फोलेट, अँटिऑक्सिडंट, कार्बोहाइड्रेट मुबलक प्रमाणात असते. याशिवाय आंबा फॅट, कोलेस्ट्रॉल, सोडियम शून्य मात्रा इतक्या प्रमाणात असते.

..म्हणून आंबा पाण्यात भिजत ठेवावा

आंब्यामध्ये प्रचंड उष्णता असते. पाण्यामध्ये अंबा भिजत ठेवल्याने आंब्यामधील असणारी उष्णता बाहेर काढण्यास मदत होते. शिवाय आंबा पाण्यात भिजत ठेवल्याने आंब्यामधील अतिरिक्त असणारे फायटिग ऍसिड देखील बाहेर टाकले जाते. उन्हाळ्यामध्ये नेहमी उष्णता विरहित पदार्थ फळे खाण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातो. आंब्यामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात असल्याने, त्वचेचा संसर्ग देखील जडण्याची शक्यता असते.

आंब्याच्या माध्यमातून उन्हाळ्यामध्ये जर शरीरात उष्णता अधिक प्रमाणात गेली, तर डायरिया आणि स्किन इन्फेक्शनची शक्यता अधिक असते. अधिक उष्णतेचे पदार्थ खाल्ल्याने पचन संस्थेवर त्याचा परिणाम होतो. जर तुम्ही आंबा पाण्यामध्ये भिजत ठेवला तर आंब्यामधील उष्णता नैसर्गिकरीत्या कमी होते. दीड ते दोन तास आंबा पाण्यामध्ये भिजत ठेवून नंतर कापून खाणे आवश्यक आहे.

आंबा खाण्याची योग्य पद्धत

बाजारातून आंबा घरी आणल्यानंतर दोन तास पाण्यात भिजत ठेवून नंतर खाणे आवश्यक आहे. ही झाली आरोग्यासंबंधीची महत्त्वाची बाब. याशिवाय आंबा खाण्याची योग्य पद्धत देखील आहे. आंबा कधीही इतर फळांसोबत खाऊ नये. आंबा शक्यतो, दुधाबरोबर खाणे पसंत करा. कारण दुधाबरोबर आंबा खाल्ल्यामुळे पित्ताची समस्या उद्भवत नाही. दूध आणि आंब्याचे कॉम्बिनेशन पित्त आणि वात शांत करण्यासचे काम करते.

हे देखील वाचा PM Kisan Samman Nidhi: १४ व्या हप्त्याची तारीख निश्चित! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार ४ हजाराचा हप्ता; तुम्हाला मिळणार का? जाणून घ्या या पध्दतीने..

Simple Energy EV: ताशी 105 किमी प्रवास, एका चार्जमध्ये 236 किमी रेंज, किंमत फक्त इतकी..; जाणून घ्या या दमदार इलेक्ट्रिक स्कूटर विषयी..

SBI e-mudra loan: स्टेट बँकेत अकाऊंट आहे? लगेच करा अर्ज घर-बसल्या मिळेल दोन लाख कर्ज..

Mangoes Buying Tips: या तीन गोष्टी तपासून ओळखता येतो आंबा गोड आहे की आंबट; जाणून घ्या या तीन सोप्या ट्रिक्स..

TATA electric bicycle: टाटाची सगळ्यात स्वस्त आणि दमदार सायकल बाजारात दाखल; किंमत आहे केवळ..

IRCTC Tatkal Ticket Booking: रेल्वेचे तत्काळ तिकीट या ठिकाणी करा बूक, अन्यथा होईल मोठी अडचण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.