New Sand Policy: महसूल विभागाचा ऐतिहासिक निर्णय! 7000 ब्रासची वाळू आता मिळणार केवळ 600 रुपयांत; जाणून घ्या सविस्तर..

0

New Sand Policy: घर बांधायला काढल्यानंतर, घराला लागणारं साहित्य कसं मिळवायचं हे सर्वसामान्यांपुढे मोठी आव्हानं असतात. खासकरून वाळू सहजासहजी उपलब्ध होत नाही. वाळू माफीयांमुळे वाळूचे दर प्रचंड वाढले आहेत. जवळपास सात ते आठ हजार रुपये ब्रासने वाळू विक्री केली जाते. मात्र आता या सगळ्यांना आळा बसणार आहे. सर्वसामान्यांना आता 7000 रुपये फ्रांसने मिळणारी वाळू केवळ सहाशे रुपयांत मिळणार आहे. राज्य महसूल विभागाने या संदर्भात नविन धोरण जारी केलं आहे.

सर्वसामान्यांना आता घर बांधण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी महसूल विभागाकडून नवीन धोरण तयार करण्यात आलं आहे. एक मे पासून हे धोरण संपूर्ण राज्यभर लागू करण्यात येणार असून, आता घर बांधण्यासाठी वाळू हवी असणाऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करून केवळ सहाशे रुपये ब्रासने वाळू उपलब्ध होणार आहे. काय आहे राज्य महसूल विभागाचे धोरण? जाणून घेऊया सविस्तर. (New Sand Policy)

राज्य सरकारने वाळू खरेदीसाठी एक धोरण तयार केले आहे. हे धोरण एक मे पासून संपूर्ण राज्यात लागू होणार आहे. ज्या ग्राहकांना वाळू हवी आहे, अशा ग्राहकांनी आता ऑनलाईन नोंदणी करायची आहे. अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radha Krishna vikhe Patil) यांनी केली आहे. याशिवाय जे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील घरकुल लाभार्थीची आहेत, अशा लाभार्थींची यादी घरकुल अधिकारी सादर करणार आहेत.

त्यांनतर ही यादी तपासून, तहसीलदार घरकुल लाभार्थ्यांना लेखी परवानगी देणार आहेत. नंतर वाळू डेपोमधून लाभार्थ्यांना अगदी मोफत वाळू दिली जाणार आहे. वाहतुकीसाठी जो खर्च येईल, तो मात्र लाभार्थ्यांना करावा लागणार आहे. राज्य महसूल विभागाने प्रायोगिक तत्त्वावर एका वर्षाकरिता हे धोरण स्वीकारले आहे. (The policy has been adopted on a state-qualified pilot basis for one year)

वाळूचे डेपो असे होणार निश्चित

यापूर्वी राज्यामध्ये वाळू घाटाचे लिलाव होत होते. हे लिलाव होत नसल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात वाळूचा तुटवडा निर्माण होत होता. त्यामुळे बांधकामासाठी लागणारी वाळू वेळेवर उपलब्ध होत नसल्याने, बांधकामाला उशीर लागायचा. वेळेत वाळू मिळत नसल्याने, मग अतिरिक्त किंमत मोजून वाळू विकत घ्यावी लागायची. मात्र आता महाराष्ट्र राज्य महसूल विभागाच्या (Maharashtra State Revenue Department) या धोरणामुळे आता वाळू घाटाचे लिलाव बंद होऊन सरकारच नदीपात्रामधील वाळूचे गट निश्चित करणार आहे.

नदीपात्रामधील वाळूचे गट निश्चित केल्यानंतर, या वाळूचे उत्खनन होईल. उत्खनन झाल्यानंतर, ही वाळू राज्य शासनाच्या तालुकास्तरावरील वाळू डेपोमध्ये साठवली जाणार आहे. आणि याच ठिकाणाहून वाळूची विक्री नागरिकांना केली जाणार आहे. नदीपात्रामध्ये निश्चित केलेले वाळूचे गट, त्याचबरोबर तालुकास्तरीय डेपोची निर्मिती करण्याची जबाबदारी, वाहतुकीचे नियोजन राज्य सरकारकडे असणार आहेत. या संदर्भात सरकार निविदा प्रक्रिया राबवणार आहे.

अशी असेल वाळू मागणीची प्रक्रिया

ज्यांना वाळू पाहिजे, अशांनी महाखनिज (Mahakhanij) या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच या https://mahakhanij.maharashtra.gov.in/ जाऊन वाळू खरेदी मागणीची नोंद करायची आहे. याशिवाय तुम्ही तहसील मधील सेतू केंद्रांमध्ये देखील वाळू खरेदीची मागणी करू शकता. याबरोबरच मोबाईल ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही वाळूची मागणी करू शकता. राज्य सरकार या विषयी तांत्रिक बाबींवर काम करत आहे.

एका वेळी मिळणार इतकी वाळू

राज्य सरकारने वाळू खरेदी संदर्भात धोरण जारी करताना म्हटले आहे, एका कुटुंबास एकावेळी जास्तीत जास्त 50 मेट्रिक टन इतकीच वाळू खरेदी करता येणार आहे. जास्त वाळू हवी असेल, तर तुम्हाला ज्या दिवशी वाळू मिळाली आहे. त्या दिवसांपासून एका महिन्यानंतर तुम्ही वाळू मागणी करू शकता. तुम्ही वाळूची नोंदणी ऑनलाइन केल्यानंतर, पंधरा दिवसानंतर डेपो मधून तुम्हाला वाळू घेऊन जाणे आवश्यक आहे. वाळू सहाशे रुपये ब्रास प्रमाणे तुम्हाला मिळणार आहे. मात्र तालुकास्तरीय डेपो पासून वाहतुकीचा खर्च तुम्हालाच करावा लागणार आहे.

वाळूची एक ट्रिप पडणार तीन हजाराला

सरकारच्या नवीन धोरणानुसार, एक ब्रास वाळू तुम्हाला सहाशे रुपयांमध्येच खरेदी करता येणार आहे. मात्र वाहतुकीचा संपूर्ण खर्च हा तुम्हाला करावा लागणार आहे. ट्रॅक्टरची एक ट्रिप करायची म्हटलं, तर साधारण 30 किलोमीटरला तीन हजार रुपये खर्च येणार आहे. तुम्ही तालुक्याच्या जवळ राहत असाल, तर तुम्हाला हा खर्च कमी येईल. तीस किलोमीटर तुम्हाला वाळू घेऊन जायची असेल, तर 2700 ते 3000 रुपये खर्च एका ट्रिपला येऊ शकतो.

हे देखील वाचा Dream11 Prediction Tips: Dream11 वर जिंकायचं असेल, तर या पद्धतीने बनवाव्या लागतील 3 टिम्स..

Mango eating tips: 80 टक्के लोकांना आंबा खाण्याची ही योग्य पद्धत माहितीच नाही; लगेच जाणून घ्या अन्यथा..

Best Mileage Bike: या चार टू व्हीलरला आहे सर्वात जास्त मायलेज; किंमतही आहे कमी..

SBI e-mudra loan: स्टेट बँकेत अकाऊंट आहे? लगेच करा अर्ज घर-बसल्या मिळेल दोन लाख कर्ज..

Simple Energy EV: ताशी 105 किमी प्रवास, एका चार्जमध्ये 236 किमी रेंज, किंमत फक्त इतकी..; जाणून घ्या या दमदार इलेक्ट्रिक स्कूटर विषयी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.