Virat Kohli Gautam Gambhir fight: भांडण ‘नवीन उल हक’शी झालं मग माज गंभीरने का दाखवला? हे आहे त्यामागचं मूळ कारण, पाहा तो व्हिडिओ..

0

Virat Kohli Gautam Gambhir fight: काल आयपीएल सीझन 16चा (IPL 2023) 43वा सामना RCB आणि LSG या दोन संघात लखनऊच्या मैदानावर पार पडला. (RCB vs LSG) रोमहर्षक सामन्यात आरसीबी संघाने 18 धावांनी लखनऊ संघावर विजय मिळवला. मात्र हा सामना एका वेगळ्याच कारणाने हा सामना चर्चेत राहिला, किंबहुना गालबोट लागले. या दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात लखनऊ संघाने आरसीबी संघावर विजय मिळवला होता. या विजयानंतर गंभीर गौतम गंभीरने चांगलंच अग्रेशन दाखवलं होतं.

RCB vs LSG: विराट कोहलीच्या त्या कृत्यामुळे नवीन उल हलने कोहलीला ढकलले; पाहा दोन्ही व्हिडिओ..

साहजिकच यामुळे या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सामन्याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. लो स्कोरिंग ग्राउंडवर झालेल्या सामन्यात आरसीबीने विजय मिळवल्यानंतर, हा पराभव लखनऊ संघाच्या पचनी पडला नाही. खासकरून गौतम गंभीरच्या. मैदानामध्ये अफगाणिस्तान खेळाडू नवीन उल हक (Naveen-ul-haq) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दोघांमध्ये कमालीची बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे भांडणात रूपांतर होईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. (Virat Kohli and Naveen-ul-haq fight)

मात्र सामना संपल्यानंतर, गौतम गंभीर आणि विराट कोहली (Gautam Gambhir and Virat Kohli) एकमेकांशी चांगलेच भिडले. मैदानावर अफगाणिस्तान खेळाडू नवीन उल हक आणि विराट कोहली या दोघांचे भांडण झाले. सामना संपल्यानंतर देखील याचे पडसाद उमटले. हात मिळवणी करताना विराट कोहलीचा हात नवीनने झटकला. यापूर्वी देखील अनेक खेळाडूंसोबत नवीनची बाचाबाची झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट लिगमध्ये देखील नवीन आणि शाहिद आफ्रिदी सोबत वाद झाले होते.

विराट कोहली आणि नवीन या दोघांचे वाद झाल्यानंतर, गौतम गंभीरने या भांडणात पडायला नको होतं, असं आता सोशल मीडियावर बोलत जात आहे. एका अफगाणिस्तान खेळाडूसाठी गौतम गंभीर विराट कोहलीशी का भांडत आहे? साहजिकच हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र अफगाणिस्तान खेळाडूसाठी नाही तर गंभीरने विराट कोहलीशी वेगळ्याच कारणामुळे भांडला आहे.

विराट कोहलीने सामना सुरू असताना मैदानावर दाखवलेल्या अग्रेसरमुळे गौतम गंभीर संतापला. पहिल्या सामन्यात तोंडावर बोट ठेवत शांत बसण्याचा सल्ला प्रेक्षकांना गौतम गंभीरणे दिला होता. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात याचीच पुनरावृत्ती विराट कोहलीने केली. विराट कोहली यावेळी तोंडावर बोट ठेवून गप्प बसण्याची काहीही गरज नाही. असं प्रेक्षकांना उद्देशून हातवारे करत म्हणाल्याचे दिसत आहे. एक प्रकारे विराट कोहलीने गौतम गंभीरला डिवचले.

गौतम गंभीरला याच गोष्टीचा राग आला. दुसऱ्या सामन्यात विराट कोहली असं काही करेल, असं गौतम गंभीरने एक्सेप्ट केलं नव्हतं. मात्र विराट कोहलीने देखील जशास तसे उत्तर देत, एक प्रकारे गौतम गंभीरला इशारा दिला. गौतम गंभीरला हीच गोष्ट सहन झाली नाही. आणि म्हणून सामना संपल्यानंतर, त्याला विराट कोहलीशी भांडण्यासाठी कारण मिळालं. दोघांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून अनेकांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हे देखील वाचा New Sand Policy: महसूल विभागाचा ऐतिहासिक निर्णय! 7000 ब्रासची वाळू आता मिळणार केवळ 600 रुपयांत; जाणून घ्या सविस्तर..

Dream11 Prediction Tips: Dream11 वर जिंकायचं असेल, तर या पद्धतीने बनवाव्या लागतील 3 टिम्स..

Best Mileage Bike: या चार टू व्हीलरला आहे सर्वात जास्त मायलेज; किंमतही आहे कमी..

RCB vs LSG: विराट कोहलीच्या त्या कृत्यामुळे नवीन उल हलने कोहलीला ढकलले; पाहा दोन्ही व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.