Hardik Pandya: अखेर हार्दिक पांड्याची व्हाईट बॉल क्रिकेटच्या कर्णधारपदी अधिकृत निवड; जारी झाला व्हिडिओ..
Hardik Pandya: टी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये (T20 World Cup) भारतीय संघाने केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर बीसीसीआयने (BCCI)भारतीय क्रिकेट संघात (Indian cricket team) आता मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी टी-20 विश्वचषकासाठी आतापासूनच संघ बांधणी सुरू केली असून, टी-ट्वेंटी क्रिकेटचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नावासाठी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांचं एकमत झालं आहे. (Hardik Pandya announced T20 captain) मात्र अद्याप हार्दिक पांड्याची भारतीय टी-ट्वेंटी संघाच्या कर्णधारपदी अधिकृत निवड झाली नसली नाही. परंतु आता स्टार स्पोर्टने BCCI च्या अगोदरच हार्दिक पांड्याची आगामी टी-ट्वेंटी संघाच्या कर्णधार पदी निवड केल्याने खळबळ उडाली आहे.
पुढच्या महिन्यांत श्रीलंके विरुद्ध होणाऱ्या तीन टी20 (IND vs SL) सामन्याच्या मालिकेसाठी स्टार स्पोर्टने एक प्रोमो बनवला आहे. (Star Sport launches new promo) ज्यात स्टार स्पोर्टने (Star sports) हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) आणि श्रीलंकेचा कर्णधारला एका फ्रेममध्ये दाखवलं आहे. तीन जानेवारीला होणाऱ्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यासाठी हार्दिक पांड्या बरोबर स्टार पोर्टने एक जाहिरात प्रसारित केली आहे. या जाहिरातीमध्ये हार्दिक पांड्याला एकप्रकारे टी ट्वेण्टी मालिकेचा कर्णधारच घोषित केलं आहे.
वास्तविक कुठल्याही मालिकेची सुरुवात करताना मालिकेची जाहिरात मालिकेचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिन्या करत असतात. यासाठी दोन्ही संघाचे कर्णधार प्रोमोमध्ये दाखवले जातात. भारतीय क्रिकेट बोर्डने आगामी टी-ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघाच्या कर्णधाराची अधिकृत निवड अद्याप केली नाही. भारतीय टी-ट्वेंटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याची निवड केली जाणार हे निश्चित मानला जात असलं, तरी अद्याप त्याची निवड का केली गेली नाही. असे असंख्य प्रश्न देखील उपस्थित होत होते. मात्र आता स्टार पोर्टने प्रसारित केलेल्या प्रोमोमुळे या प्रश्नांना पूर्णविराम मिळाला आहे.
.@hardikpandya7 is ready to kick-start the New Year with a bang against the Asian T20I Champions, 🇱🇰!#BelieveInBlue & get ready to witness some 🔥 action from this new #TeamIndia
Mastercard #INDvSL series | Starts Jan 3 | Star Sports & Disney+Hotstar pic.twitter.com/tgAOc2zAQf
— Star Sports (@StarSportsIndia) December 25, 2022
हार्दिक पांड्या सोबत स्टार पोर्टने प्रसारित केलेल्या प्रोमोमुळे हार्दिक पांड्याच आगामी टी ट्वेण्टी क्रिकेटचा कर्णधार असल्याचं निश्चित झालं आहे. भारतीय निवड समिती चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज टी-ट्वेंटी संघासाठी श्रीलंके विरुद्धच्या तीन टी-20 सामन्याच्या मालिकेसाठी संघ निवडणार असल्याची माहिती आहे. रोहित शर्माला या मालिकेत खेळण्यासाठी इच्छुक असून देखील त्याला या मालिकेतून वगळण्यात येणार आहे. आगामी टी-20 क्रिकेट मधून कायमस्वरूपी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असल्याची माहिती आहे.
केएल राहुल (KL Rahul) ऋषभ (Rishabh pant) पंत या दोन खेळाडूंना देखील टी-ट्वेंटी संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असून त्यांच्या जागी इशान किशन (Ishan Kishan) आणि समजू सॅमसन (Sanju Samson) यांना पूर्ण वेळ संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 66 सामन्यांमधून पंतला केवळ दोनच अर्धशतके करता आली आहेत.
यात त्याने २२ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट केवळ १२६ आहे. दुसरीकडे केएल राहुला देखील क्रिकेटच्या कोणत्याच प्रकारात आपली छाप पाडता आली नाही. गुणवत्ता असून देखील त्याच्या अप्रोचमुळे टीम इंडिया चिंतेत आहे. या दोघांच्या जागी इशान किशन आणि संजू सॅमसनला संधी दिली जाणार आहे.
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने नाकारली कॅप्टन पदाची ऑफर; कारणही आले समोर..
Ration Card: रेशनकार्ड मिळणार आता एका आठवड्यात; जाणून घ्या सर्व डिटेल्स अर्जासहित..
Yamaha RX100: बुलेटला टक्कर देण्यासाठी Yamaha RX100 झाली सज्ज; जाणून घ्या किंमत लूक आणि फिचर्स..
PMGKAY: मोफत रेशनच्या नियमात सरकारने केला मोठा बदल; आता रेशन मिळणार इतके..
Kiara Advani: पायावर पाय टाकताना कियारा अडवाणीचं सगळंच दिसलं; पाहा व्हिडिओ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम