Sushant Singh Rajput: सुशांत सिंगच्या शरीरावर होत्या विचित्र खुणा, सुशांतची हत्या होऊनही डॉक्टरांनी मला..; पोस्टमार्टम करणाऱ्याने सांगितले त्या रात्री काय घडलं..
Sushant Singh Rajput: अडीच वर्षानंतर आता पुन्हा एकदा सुशांत सिंग राजपूत प्रकरण (Sushant Singh Rajput Case) चर्चेत आलं आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये (hospital) सुशांत सिंग राजपूतचे पोस्टमार्टम (Sushant Singh Rajput postmortem) करण्यात आले, त्याच हॉस्पिटलच्या पोस्टमार्टम करणाऱ्या कर्मचाऱ्यांने केल्याने दाव्यामुळे आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतलं आहे. 14 जून 2020 ला सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील राहत्या फ्लॅटवर आढळला. आता या रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम कूपर हॉस्पिटलच्या पोस्टमार्टम करणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगितल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Cooper Hospital coroner)
खासदार राहुल शेवाळे (Rahul shewale) यांनी लोकसभेतच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली. सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला (rhea chakraborty) ‘AU’ या नावाने 44 फोन कॉल केल्याचे बिहार पोलिसांनी म्हटल आहे. हा ‘AU’ नक्की कोण आहे. याची देखील सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली. सुशांत सिंग राजपूतच्या मृतदेहावर विविध खुणा होत्या. अशी चर्चा आहे. याची देखील चौकशी व्हावी, अशी मागणी केली.
लोकांमध्ये अजूनही सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या आहे की हत्या, याविषयी संभ्रम आहे. या प्रकरणाची पुन्हा एकदा नव्याने चौकशी व्हावी, अशी मागणी लोकसभेत खासदार राहुल शेवाळे यांनी केल्यानंतर, याचे पडसाद महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात देखील उमटले. महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात सुशांत सिंग राजपूत प्रकरणामुळे गदारोळ झाला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी या प्रकरणाची चौकशी एसआयटी (SIT) मार्फत होईल असं स्पष्ट केले.
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकीकडे आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच, आता ज्या हॉस्पिटलमध्ये सुशांत सिंग राजपूतचे पोस्टमार्टम करण्यात आलं, आणि ज्या कर्मचाऱ्याने सुशांत सिंग राजपूतचे पोस्टमार्टम केले त्या कूपर हॉस्पिटलच्या (Cooper hospital) कर्मचाऱ्यांने मोठा दावा केला आहे. माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत रूप कुमार शहा (Roopkumar Shah) या कर्मचाऱ्यांनी सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या नसून, हत्या असल्याचा दावा केल्याने खळबळ माजली आहे. (An employee Roop Kumar Shah claimed that Sushant Singh Rajput was not a suicide but a murder)
माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत रूपकुमार शहा म्हणाले, ज्यावेळी सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी आला. तेव्हा आम्ही त्याच्या अंगावरचे कपडे काढले. कपडे काढल्यानंतर, त्याच्या अंगावर विचित्र खून होत्या. त्याच्या मानेवर हातापायांवर खुणा असल्यामुळे ही आत्महत्या नसून, हत्या होती हे स्पष्ट होत होतं. आम्ही डॉक्टरांच्या लक्षात देखील आणून दिलं. मात्र डॉक्टरांनी तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. असं स्पष्ट सांगितलं. पोस्टमार्टम कर्मचारी रूपकुमार शहा यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता या प्रकरणाने वेगळंच वळण घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणांमध्ये त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यावर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. सुशांत सिंग राजपूतला रिया चक्रवर्ती ड्रग्स पुरवत होती. असे देखील तपासानंतर समोर आलं होतं. या प्रकारात काही दिवस तिला तुरुंगामध्ये देखील राहावं लागलं. मात्र आता या प्रकरणाने एक नवीन वळण घेतलं आहे.
सुशांतची हत्या रूपकुमार शाह यांचा दावा
एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना रूप कुमार शहा यांनी सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह कूपर हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमसाठी ज्या दिवशी आणण्यात आला, त्या रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. शाह म्हणाले, 14 आणि 15 जून 2020 ला मी पोस्टमार्टम विभागामध्ये ड्यूटीसाठी होतो. एक व्हीआयपी बॉडी पोस्टमार्टमसाठी येणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आलं. कपडे काढल्यानंतर, सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह असल्याचं दिसलं. आणि म्हणून आम्ही त्याचा मृतदेह व्यवस्थितरित्या पाहिला.
अकरा साडे अकराच्या दरम्यान सुशांत सिंग राजपूतचा पोस्टमार्टम करण्यासाठी नंबर आला. त्याच्या अंगावरचे कपडे काढल्यानंतर, आम्हाला त्याच्या मानेवर हातापायावर विचित्र खुणा दिसल्या. यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये ही आत्महत्या नसून हत्या आहे. अशी चर्चा देखील झाली. आम्ही आमच्या सीनियरकडे यासंबंधी माहिती देखील दिली. मात्र त्यांनी आम्हाला तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. असं स्पष्ट सांगितलं.
गेली अनेक दशके मी हे काम करतो. मी आत्तापर्यंत 50 ते 60 मृतदेहांचे पोस्टमार्टम केले आहे. कोणती आत्महत्या आणि कोणती हत्या याचा आम्हाला पुरेपूर अंदाज आलेला असतो. सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह पाहिल्यानंतर आम्ही 101% खात्रीने सांगू शकतो, त्याची आत्महत्या नसून हत्या होती. त्याच्या मानेवर ज्या खुणा होत्या, त्या आत्महत्या केल्याच्या खूण या नक्कीच नव्हत्या. असा देखील गौप्यस्फोट पोस्टमार्टम करणारे कर्मचारी रूपकुमार शहा यांनी माध्यमांशी बोलताना केला.
#WATCH | "When I saw Sushant Singh Rajput's body it didn't appear to be a case of suicide. Injuries marks were there on his body. I went to my senior but he said we will discuss it later," says Roopkumar Shah, Mortuary Servant, Cooper Hospital, Mumbai pic.twitter.com/NOXAsaI8uH
— ANI (@ANI) December 26, 2022
चौकशीसाठी जाणार
सुशांत सिंग राजपूतला कोणी मारले, हे मला सांगता येणार नाही. मी मात्र त्याची आत्महत्या नाही, तर हत्या होती, हे खात्रीने सांगू शकतो. त्याच्या हाता-पायाकडे पाहिलं, तर त्याला झालेल्या जखमा ह्या फॅक्चर सारख्या होत्या. आत्महत्या करणाऱ्या माणसाच्या वेगवेगळ्या भागावर खुणा कशा असू शकतात? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. अडीच वर्षानंतर तुम्ही हे आता बोलताय. या प्रश्नावर रूप कुमार शहा म्हणाले, मला देखील जीवाची भीती होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी आता हे प्रकरण बाहेर काढलं असल्याने, मी कुठेही चौकशीसाठी जायला तयार आहे. त्याला न्याय मिळाला पाहिजे, हीच आमची भावना आहे. असं देखील ते म्हणाले.
हे देखील वाचा IND vs SL: मोठा निर्णय! ऋषभ पंत, केएल राहुलला टी-20 संघातून डच्चू; इशान किशन संजू सॅमसनला पूर्व वेळ संधी..
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने नाकारली कॅप्टन पदाची ऑफर; कारणही आले समोर..
FIFA world cup final: अर्जेंटिना जिंकताच तरुणी झाली पूर्णपणे उघडी; पाहा व्हिडिओ..
PMGKAY: मोफत रेशनच्या नियमात सरकारने केला मोठा बदल; आता रेशन मिळणार इतके..
Ration Card: रेशनकार्ड मिळणार आता एका आठवड्यात; जाणून घ्या सर्व डिटेल्स अर्जासहित..
Yamaha RX100: बुलेटला टक्कर देण्यासाठी Yamaha RX100 झाली सज्ज; जाणून घ्या किंमत लूक आणि फिचर्स..
Kiara Advani: पायावर पाय टाकताना कियारा अडवाणीचं सगळंच दिसलं; पाहा व्हिडिओ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम