MI Cape Town: IPL 2023 पूर्वी नीता अंबानींचा मास्टर स्ट्रोक; मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद राशिद खानकडे..

0

MI Cape Town: जगभरात सर्वात मोठी आणि पॉप्युलर क्रिकेट स्पर्धा म्हणून आयपीएलकडे (IPL) पाहिले जाते. अनेक देश T-20 लीगचे आयोजन करतात. मात्र आयपीएल इतकी लोकप्रियता अजून कोणत्याही T20 लीगला मिळाली नाही. भारतामध्ये आयपीएल सुरू झाल्यानंतर, अनेक देशांनी टी-ट्वेंटी (T20 league) लीगचे आयोजन करायला सुरुवात केली. मात्र आयपीएल इतकी यशस्वी आणि लोकप्रियता कोणत्याही देशालामधील टी-ट्वेण्टी लीगला मिळाली नाही.

भारतामध्ये आयपीएलचं आयोजन करण्यात आल्यानंतर, अनेक उद्योगपतींनी आपापल्या आवडीचा संघ विकत घेतला. यामध्ये श्रीमंत उद्योगपती मुकेश (Mukesh Ambani) अंबानी यांच्या पत्नी निता अंबानी (Nita Ambani) यांनी देखील मुंबई इंडियन्स हा संघ विकत घेतला. सुरुवातीच्या काही सीझनमध्ये मुंबई इंडियन संघाला फारसी चमकदार कामगिरी करता आली नाही. मात्र रोहित शर्मा कर्णधार (Rohit Sharma captain) झाल्यानंतर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) तब्बल पाच वेळा आयपीएलची टी-ट्वेंटी स्पर्धा जिंकली. (IPL trophy)

आता आयपीएलच्याच पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेमध्ये जानेवारीमध्ये SA 20 League चे आयोजन करण्यात आले असून, मुंबई इंडियन संघाची मालकीण नीता अंबानी यांनी आपल्या ‘मुंबई इंडियन्स केपटाऊन’ या संघाचा कर्णधार राशिद खानला निवडले आहे. (MI Cape Town captain Rashid Khan) अफगाणिस्ताचा लेग स्पिनर राशीद खानला कॅप्टन केल्यानंतर, मुंबई इंडियन्सची मालकीण नीता अंबानी हिला तो आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देईल, असा विश्वास वाटत आहे. SA 20 League ही स्पर्धा जानेवारीत दक्षिण आफ्रिकेमध्ये पार पडणार आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये जानेवारीत पार पडणाऱ्या एसटी ट्वेन्टी लिंक (SA 20 League) स्पर्धेमध्ये एकूण सहा संघ असणार असून, हे सहा संघ आयपीएलच्या संघ मालकांनी खरेदी केले आहेत. या स्पर्धेसाठी नीता अंबानी यांनी देखील ‘एमआय केपटाउन’ (MI Cape Town) हा संघ खरेदी केला आहे. मुंबई इंडियन्स केपटाऊन असं या संघाचे नाव असून, आता या संघाचा कर्णधार राशीद खान याला केलं आहे. ही स्पर्धा पहिल्यांदाच खेळवण्यात येणार असून, या स्पर्धेचे एकूण सहा संघ भाग घेणार आहेत. सहा संघ इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) संघाच्या मालकांनी खरेदी केले आहेत.

मुंबई इंडियन्सच्या मालकांनी खरेदी केलेल्या ‘एमआय केपटाउन’ संघाचा कर्णधार राशिद खानला केलं आहे, तर दुसरीकडे मुंबई इंडियन संघाला अनेक आयपीएलच्या स्पर्धा जिंकवण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या आणि वेस्ट इंडिजचा खेळाडू कायरन पोलार्ड याला देखील नीता अंबानी यांनी ‘एमआय इमिरेट्स’ या संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. हे दोन्हीं संघ नीता अंबानी यांनी खरेदी केले आहेत. साहजिकच यामुळे येणाऱ्या आयपीएल सीझनमध्ये राशीद खानला याचा मोठा फायदा होऊ शकतो.

या संघांच्या मालकांनी खरेदी केले संघ

दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या या टी-ट्वेंटी स्पर्धेसाठी एकूण सहा संघांचा सहभाग आहे. SA 20 League या स्पर्धेत खेळणारे सहा संघ हे इंडियन प्रीमियर लीग मधील खेळणाऱ्या संघांच्या मालकांनीच खरेदी केले आहेत. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल, सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स लखनऊ सुपर जायंट्स, या संघाच्या मालकांनीच खरेदी केले आहेत.

असे असेल स्पर्धेचे स्वरूप

दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या SA 20 League या स्पर्धेत स्वरूप जाणून घ्यायचे झाल्यास, ही स्पर्धा 10 जानेवारी 2023 पासून सुरू होणार असून, 11 फेब्रुवारीला या स्पर्धेचा शेवटचा सामना खेळण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये एकूण 33 सामने खेळण्यात येणार असून, आयपीएल प्रमाणेच या स्पर्धेचे नियम असणार आहेत.

हे देखील वाचा BCCI T20 Plan: रोहितमुळे विराटचा गेला बळी! विराट कोहलीलाही वगळले T20 संघातून; अखेर T-20 कर्णधारपदी हार्दिकच्या नावावर शिक्कामोर्तब..

KL Rahul Athiya Shetty Wedding: अथिया शेट्टी नव्हे, या तरूणी सोबत होणार राहुलच लग्न; जाणून घ्या तारीख आणि ठिकाण..

Rohit Sharma Expulsion: टी-२० कर्णधार पदाच्या हकालपट्टीवर रोहित शर्माचा BCCI ला करारा जवाब; रोहितच्या उत्तराने राहूल द्राविडही अडचणीत..

Electric Scooter: मोबाईलच्या किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; दहा रुपयांत धावणार दीडशे किलोमीटर..

Golden Guys Bigg Boss: कुठून आलं एवढं सोनं, सोन्याच्या गाड्या मोबाईल; जाणून जाल कोमात..

Bigg Boss 16: पत्नीच्या जीवावर मोठा झालेल्या गोल्डन मॅनला सिझन संपत आल्यानंतर बिग बॉसमध्ये कशी मिळाली एंट्री? वाचा सविस्तर..

Samsung Offer: कंपनीचा मोठा निर्णय, आता Samsung प्रॉडक्टवर मिळेल 20 वर्षाची वॉरंटी, ग्राहकांची होणार चांदी

Udayanraje Bhosale: उदयनराजे यांनी देवेंद्र फडणवीसांची काढली लाज; म्हणाले, असला कसला..; पाहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.