Heart attack symptoms: हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी जाणवतात ही लक्षणे; त्वरित सावध व्हा अन्यथा..
Heart attack symptoms: हृदयविकाराचा झटका (heart attack) येऊन मृत्यु होणे हे आता सामान्य झाले आहे. भारतामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु होणार्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. मोठ मोठाले सेलीब्रिटी असोत अथवा सर्वसामान्य माणुस अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यु होत असल्याच्या घटना रोजच आपल्या कानावर येतात. चालता-बोलता माणुस अचानक निघुन जाणे, त्यांच्या नातलगांसाठी फार आश्चर्यकारक असते. याचे दु:ख सुद्धा सहन करण्याजोगे नसते. विशेष म्हणजे आता वृद्धांसोबतच तरुणांमध्ये सुद्धा हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. (Heart attack symptoms)
आजकालच्या धावपळीच्या युगात आरोग्याकडे किंवा शरीराकडे विशेष लक्ष देणे होत नाही. शरीराची योग्य काळजी न घेतल्यामुळे वाढत्या वयानुसार त्याचे परिणाम दिसायला लागतात. विविध व्याधी शरीराला जखडुन घेतात. वृद्धांच्या बाबतीत या गोष्टी होणे एकदा साहजिक सुद्धा मानले जाऊ शकते. परंतू आता तरुणांना सुद्धा या गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. बदलेल्या लाईफस्टाईलमुळे अनेक तरुणांना देखील हृदयविकाराच्या झटक्याने आपले प्राण गमवावे लागत आहे. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे नेमकी काय आहेत? काय लक्षणे आहेत याची प्राथमिक माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. जेणेकरुन काही लक्षणे जाणवताच आपण त्याच्यावर काही प्राथमिक ऊपचार करु शकतो. अथवा तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधून ऊपचार सुरु करु शकतो. प्रथम आपण हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे पाहू.
हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे
हृदयविकाराचा झटका आता अचानक कोणालाही येऊ शकतो. कॉलेस्ट्रॉल वाढलेले असल्यास, बीपीची समस्या असणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. अशी धारणा या अगोदर समाजात होती. मात्र आता या धारणेस पुर्णत: तडा गेलाय. कुठलिही व्याधी किंवा आजार नसणार्यांना देखील अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतू झटका येण्याची नेमकी कारणे काय असु शकतात? हे जाणुन घेणे गरजेचे आहे. हृदयाला होणार्या रक्तपुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यास तुम्हाला हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. हृदयाला रक्तपुरवठा करणार्या वाहिन्यांना कोरोनरी धमन्या म्हणतात. या धमन्यांमध्ये बर्याचदा ब्लॉकेज किंवा चरबी वाढत जाते. त्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुरळीत होत नाही. परिणामी तीव्र झटका येऊन हृदय काम करणे थांबवते. ज्यामुळे मृत्यु होतो.
हार्ट अटॅकची लक्षणे
बर्याचदा कधी कधी छातीत कळ आल्यासारखे वाटते. छाती जोरात दुखु लागते. सामान्य अवस्थेत असतांना या दुखण्याकडे दुर्लक्ष केलं जातं. गॅसची समस्या असेन असा मनोमन अंदाज लाऊन अनेकदा हे दुखणे फार हलक्यात घेतले जाते. गॅसमुळे एखाद्यावेळेला छाती दुखते सुद्धा, परंतू काही जणांच्या बाबतीत ही केवळ गॅसची समस्या नसते. आपले शरीर आपल्याला सुचना देत असते. त्यामुळे जास्त दुखत असल्यास किंवा वारंवर दुखत असल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. कारण हे हार्ट अटॅक येण्याचे लक्षण असु शकते.
जबडा किंवा दातांमध्ये दुखायला लागतं
आता तुम्ही म्हणाल की जबडा किंवा दाताचा आणि छातीचा काय संबंध? जबडा आणि दातांचा बाहेरुन छातीशी थेट संबंध येत नसला, तर वाहिन्यांद्वारे तो संबंध येतो. त्यामुळे जर हार्ट अटॅक येण्याची शक्यता असेल तर काही जणांमध्ये जबडा किंवा दात दुखण्याची लक्षणं बघायला मिळतात. सहसा दात आणि जबडा दुखल्यास आपण त्याला सामान्यतेने घेतो. परंतु यामध्ये सुद्धा वारंवारता असेल आणि तुमचे वय अधिक असेल, तर या दुखण्यास गांभीर्यने घेतले पाहिजे. कधी कधी साधारण अटॅक येण्याअगोदर ही लक्षणे रुग्णांमध्ये दिसुन येतात.
श्वास घेण्यास त्रास होणे
हृदयविकाराचा झटका येण्याची विविध कारणे असु शकतात. त्यापैकीच हृदयाला सुरळीत रक्तपुरवठा न होणे हे एक महत्वाचे कारण आहे. कोरोनरी धमन्यांमध्ये चरबीचे प्रमाण वाढल्यास किंवा ब्लॉकेजेस वाढल्यास हृदयाला रक्तपुरवठा होण्यात अडचणी येतात. यामुळे हृदयावर त्याचा दाब निर्माण होतो. परिणामी श्वास घ्यायला त्रास होतो. तसेच वारंवार दम लागतो. त्यामुळे श्वास घेण्यास खुपच त्रास जाणवत असल्यास अटॅक येण्याची शक्यता सर्वाधिक असते. हा अंदाज बांधूनच तुम्ही डॉक्टरांना जवळ केले पाहिजे. श्वास घेण्यास त्रास होत असतांना सुद्धा त्यावर त्वरीत ऊपाय न केल्यास हे तुमच्या जिवावर बेतु शकते. अशावेळी तीव्र झटका येण्याची शक्यता अधिक असते. ज्यामुळे प्राण सुद्धा जाऊ शकतो.
चक्कर येणे, डोके फिरल्यासारखे वाटणे
नेमकेच एखाद्या मोठ्या आजारातून ऊठल्यास किंवा शारीरीक कमजोरी जाणवत असल्यास चक्कर आल्यासारखे वाटत असते. अशावेळी तुमच्या शरीराला सक्त आरामाची आवश्यकता असते. हृदयाशी संबंधीत आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी तर याची विशेष काळजी घेण्याची गरज असते. हृदय कमजोर झाले असल्यामुळे ते निरोगी माणसाप्रमाणे काम करत नाही. बर्याचदा हृदयावर दाब निर्माण झाल्यास त्याचा परिणाम मेंदुवर सुद्धा जाणवतो. त्यामुळे चक्कर येणे किंवा जोरात डोके फिरल्यासारखे वाटते. असे वाटल्यास हे सुद्धा हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. त्यामुळे हार्टच्या रुग्णांनी शरीरास भार होईल असे काम टाळले पाहिजे. तसेच चक्कर आल्यासारखे वाटल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
अस्वस्थ वाटणे, घाम येणे
हृदयाला होणारा रक्तपुरवठा विस्कळीत झाल्यास श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे जाणवते. श्वासोश्वासावर त्याचा परिणाम होत असल्यामुळे गुदमरल्यासारखे जाणवते. हृदयाला रक्ताप्रमाणचे ऑक्सीजनची सुद्धा गरज असते. परंतू धमन्यांमध्ये ब्लॉकेज झाल्यास श्वासा संबंधीत समस्या येऊ शकते. अशावेळी श्वास न घेऊ शकल्यामुळे एकमद अस्वस्थ झाल्यासारखे जाणवायला लागते. अचानक प्रचंड घाम यायला लागतो. सुचेनासे होऊन जाते. त्यामुळे असे काहीही जाणवल्यास हार्ट अटॅकचे हे पुर्व लक्षण ठरु शकते. अशावेळी त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधणेच फायदेशीर ठरते.
कोणत्या वयात येऊ शकतो अटॅक
वाढत्या वयानुसार शरीरात कमजोरी येऊ लागते. स्नायु आणि हाडांची झीज झाल्यामुळे जास्त ताकद शरीरात राहत नाही. एका ठराविक वयानंतर रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेली असते. ४० वर्षे पार केल्यानंतर डोळ्यांना चष्मा लागणे, गुडघेदुखी, सांधे दुखीसारखे त्रास व्हायला सुरुवात होते. त्यामुळे यादरम्यान प्राथमिक स्वरुपातील विविध आजार सुद्धा होतात. पुरुषांमध्ये ४५ वर्षांवरील तर महिलांमध्ये ५५ वर्षांवरील महिलांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतू आजकाल वयाचे कुठलेही बंधन राहिलेले नसून तरुण वयात सुद्धा हृदविकाराच्या झटक्याने मृत्यु होणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.
हे देखील वाचाPM kisan: शेतकऱ्यांनो फक्त या नंबरवर कॉल करा, आणि 12 वा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार याची माहिती मिळवा..
NABARD Recruitment 2022: नाबार्डमध्ये निघालीय बंपर भरती; पदवीधरांसाठी आहे सुवर्णसंधी..
Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..
Marriage Tips: या ६ पदार्थांचा आहारात करा समाविष्ट; लैंगिक क्षमता वाढून मिळेल भरपूर आनंद..
PMMVY: या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना मिळतात पाच हजार रुपये; जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ..
Google pay loan: आता Google pay देणार एक लाखापर्यंतचे लोन; जाणुन घ्या कसा करायचा अर्ज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम