Vastushastra: आरसा लावण्याचे ‘हे’ आहे योग्य ठिकाण; चुकूनही लावू नका या ठिकाणी आरसा अन्यथा होईल सत्यानाश..
Vastushastra: हिंदू संस्कृतीत वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. अनेकजण वास्तुशास्त्राच्या नियमानुसारच अनेक महत्त्वाची कामं करतात. अनेक जण वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवत नाहीत, मात्र बहुतेक जण कोणताही नवीन काम सुरू करायचं असलं तरी देखील वास्तुशास्त्रात पाहूनच करतात. महत्त्वाची कामे सुरू करताना वास्तुशास्त्रात पाहून सुरू केली, तर ती कामं उत्तम रित्या पूर्ण होतात, असा अनेकांचा समज आहे. जर नवीन घर बांधायचं असला तरी देखील वास्तुशास्त्राच्या नियमानुसारच बांधलं जातं. अगदी याच पद्धतीने घरामध्ये कोणकोणत्या वस्तू कुठे कुठे असाव्यात? या बाबत देखील वास्तुशास्त्राचा सहारा घेतला जातो. आज आपण या संदर्भात सविस्तर जाणून घेणार आहोत.
जर तुमच्या घराततील अनेक वस्तू वास्तुशास्त्रानुसार नसल्या, तर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं, याविषयी तुम्हाला कल्पना आहे का? फुटलेला आरसा घरत ठेवू नये, असं घरातील जेष्ठ मंडळी अनेकदा म्हणाल्याचे तुम्ही देखील ऐकलं असेल. ज्याप्रमाणे फुटलेला आरसा घरामध्ये ठेवू नका, असं तुमचे वडीलधारी मंडळी म्हणतात. त्याचप्रमाणे घरामध्ये आरसा कुठे ठेवावा? आणि कुठे ठेवू नये? याविषयी देखील वास्तुशास्त्रात नमूद करण्यात आले आहे. तुमच्या घरात तुम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे आरसा लावला नसेल, तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
आज आपण घरातील कोणत्या भागात आरसा लावू नये? त्याचबरोबर चुकीच्या ठिकाणी आरसा लावल्यानंतर काय परिणाम होतात? सोबतच आरसा कोणत्या भागात लावावा? याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. अनेकांना वास्तुशास्त्रावर विश्वास नसतो. मात्र अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याचा विज्ञानाशी देखील संबंध आहे. चुकीच्या ठिकाणी आरसा का लावू नये, यासंदर्भात वास्तुशास्त्रात नमूद करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे त्याचा विज्ञानाशी देखील संबंध जोडला गेला आहे. सर्व प्रथम आपण घरातील कोणत्या भागात आरसा लावू नये, हे जाणून घेऊया.
या ठिकाणी लावू नये आरसा
तुम्ही झोपत असलेल्या जागेवर किंवा बेडजवळ चुकूनही आरसा लावू नये. असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे. जर तुम्ही झोपत असलेला जागेवर किंवा बेडजवळ आरसा लावला, तर त्याचे तुमच्या आयुष्यावर गंभीर परिणाम देखील होतात. आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो, म्हणजेच आपण बाहेर कामानिमित्त जात असताना सर्व तयारी केल्यानंतर, घरातून बाहेर पडताना तुमचं प्रतिबिंब दिसणे आवश्यक आहे.
घरातून बाहेर पडताना तुमचा चेहरा दिसणारी जागा म्हणजे, अर्थात तुमचा हॉल असू शकतो. तुम्ही ज्या ठिकाणी दरवाज्यातून बाहेर पडत आहात, त्या ठिकाणी आरसा लावणं आवश्यक आहे. याव्यतिरिक्त घरातील कुठल्याही भागात तुम्ही आरसा लावणं योग्य नाही. तुम्ही घरात कुठेही आरसा लावल्याने तुमच्या घरात नकारात्मकता पसरत असल्याचे वास्तुशास्त्रात नमूद करण्यात आले आहे. जेव्हा-जेव्हा तुम्ही आनंदी आणि तुमचा मूड फ्रेश असतो, तेव्हाच आरशात पाहावं असं देखील वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
या ठिकाणी लावा आरसा
आरसा लावण्याचं योग्य ठिकाण म्हणजे तुम्ही उठल्यानंतर तुमचा चेहरा आरशासमोर येणार नाही, अशी जागा शोधणे आवश्यक आहे. याबरोबरच तुम्ही आरसा पूर्व आणि उत्तर दिशेला लावणे आवश्यक आहे. साधारण जेव्हा तुमचा मूड फ्रेश असतो, तेव्हाच तुमचा चेहरा पाहणे उत्तम ठरतं. अनेकदा आपण आंघोळ केल्यानंतर, एकदम फ्रेश होतो. साहजिकच यावेळी तुम्ही तुमचा चेहरा आरशात पाहणे योग्य राहतं. म्हणजेच तुम्ही बाथरूमच्या बाजूला देखील आरसा लावू शकता.
वैवाहिक जीवनात येतो अडथळा
तुम्ही घरामध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे आरसा लावला नाही, तर तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागत असल्याचं देखील वास्तुशास्त्रात नमूद करण्यात आलं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी झोपता, किंवा बेडच्या समोर आरसा लावला, तेव्हा झोपेतून उठल्यानंतर तुमचा विचित्र चेहरा, तुम्ही पाहिल्यास तुम्ही स्वतःचाच तिरस्कार करू शकता. याबरोबरच झोपेतून उठल्यानंतर, आपला मूड फ्रेश असतोच असं नाही. जर तुम्ही बेडरूममध्ये आरसा लावला, तर तुम्ही उठल्याउठल्या तुमचेच प्रतिबिंब पाहू शकता. जर असं झालं तर तुमचा संपूर्ण दिवस खराब जातो. असं देखील वास्तूशास्त्र सांगण्यात आले आहे.
हे देखील वाचा Why do couples go for a honeymoon: लग्नानंतर हनीमूनसाठी बाहेरच का जातात? ही पाच कारणे जाणून तुम्ही देखील जाल चक्रावून..
Viral video: सिंहाच्या कळपावर मगर पडली भारी, अचानक हल्ला करूनही मगरीनेच अखेर तिघांचाही काढला काटा..
Video Viral: म्हशीची शिकार करण्यासाठी सात सिंह एकवटले; शेवटी झाला चमत्कार आणि घडलं भलतंच..
Second hand car: ४८ हजार पळालेली Maruti Suzuki Alto केवळ ७८ हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.