PM Yojna: ‘या’ योजनेअंतर्गत मिळतेय मोफत शिलाई मशीन; कसा करायचा ऑनलाइन अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

0

PM Free Silai Machine Yojana: केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेक योजनांचा लाभ सर्वसामान्यांना होण्यासाठी धडपड करत असतं. अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी आता ऑनलाईन अर्ज करावा लागत असल्याने सर्वसामान्य देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतो. मात्र ही परिस्थिती पूर्वी नव्हती. पूर्वी अधिकारी आपल्या जवळच्या लोकांना योजनांचा लाभ देत असल्याचं पाहायला मिळत होतं. आणि यामुळे अनेक योजनांचा मुख्य लाभार्थी नेहमी वंचित राहत असल्याचे पाहायला मिळत होते. मात्र आता सरकारच्या कुठल्याही योजनेचा लाभ कोणीही घेऊ शकतो. आज आपण अशाच एका योजनेविषयी बोलणार आहोत जी मिळण्यासाठी तुम्हाला फक्त एक ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

खेडेगावात शिलाई मशीन (Silai Machine) हा व्यवसाय अनेक महिलांसाठी वरदान ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळतं. आपल्या शेतातलं काम करत करत शिलाई मशीन हा व्यवसाय देखील अनेक स्त्रिया उत्तमरीत्या सांभाळत असल्याचं जाणवतं. केंद्र सरकारने देखील महिलांचे सशक्तीकरण होण्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत. ‘पीएम मोफत शिलाई मशीन’  ही एक त्यातलीच योजना असून, या योजनेचा प्रत्यक्ष लाभ खेडेगावातील अनेक महिलांना होणार असून, महिला आपल्या पायावर भक्कमपणे उभा देखील राहणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जर तुम्ही अजूनही या योजनेचा लाभ घेतला नसेल, तर आज आम्ही तुम्हाला मोफत शिलाई मशीनचा लाभ घेण्यासाठी काय आवश्यक आहे, तसेच ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयी माहिती देणार आहोत.

केंद्र सरकारने महिलांना स्वतःच्या पायावर स्वतःच्या उभं राहता यावं, यासाठी प्रत्येक राज्यातील तब्बल पन्नास हजार महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करण्याची योजना सुरू केली. पीएम मोफत शिलाई मशीनचा लाभ घेण्यासाठी २०२२ या योजनेअंतर्गत महिलांना फक्त अर्ज करयचा आहे. पीएम मोफत सिलाई मशीन योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. पीएम मोफत शिलाई मशीन या योजनेचा लाभ 20 ते 40 वयोगटातील महिलांना मिळणार आहे, शिवाय शिलाई मशीन मिळवण्यासाठी एक रुपया देखील खर्च महिलांना येणार नाही.

लागणारी कागदपत्रे

केंद्र सरकारने पीएम मोफत शिलाई मशीन ही योजना शहरातील आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी सुरू केली आहे. प्रत्येक महिला स्वावलंबी व्हावी, हा या योजनेचा मूळ उद्देश असून, या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने मोठं पाऊल टाकलं आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रं लागणार आहेत. कागदपत्राची पुर्तता केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधारकार्ड असणं बंधनकारक आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या जन्म तारखेचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचे फोटो, इत्यादी कागदपत्रे तुम्हाला आवश्यक आहेत.

जर तुम्ही दिव्यांग असाल किंवा विधवा असाल तर या योजनेतून तुम्हाला विशेष लाभ देखील मिळणार आहे. राज्यातून ज्या पन्नास हजार महिला या योजनेसाठी पात्र होणार आहेत, त्या सर्वात अगोदर तुमचा विचार करण्यात येणार आहे. आणि म्हणून तुमच्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची असणार आहेत. मात्र जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुमच्याकडे दिव्यांग अद्वितीय अपंगत्वाचे ओळखपत्र असणं आवश्यक आहे. तसेच जर तुम्ही विधवां असाल, तर तुमच्याकडे विधवा प्रमाणपत्र आवश्यक असणं आवश्यक असणार आहे.

असा करा अर्ज

अनेक योजनांप्रमाणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरून त्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम, केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घेऊया, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलधल्या क्रोमवर जा क्रोमवर गेल्यानंतर तुम्हाला http://www.india.gov.in असं सर्च करायचं आहे. असं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईट ओपन झालेली दिसेल. त्यानंतर तुम्हाला शिवणकामाच्या मोफत पुरवठ्याच्या अर्जाची एक लिंक दिसेल, या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्जाच्या PDF ची प्रिंट काढायची आहे. त्यानंतर त्यात तुमचा तपशील टाकायचा आहे. आणि शेवटी तुम्ही तुमची कागदपत्रे जोडून अर्ज सबमिट करायचा आहे.

 अशी होईल छाननी

ही योजना मिळवण्यासाठी तुम्ही अर्ज सबमिट केल्यानंतर या योजनेचे संबंधित अधिकारी तुमच्या अर्जाची तपासणी करणार आहेत. तुम्ही जमा केलेल्या अर्जाची तपासणी केल्यानंतर अधिकारी तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहात की नाहीत, याची खात्री करून तुम्हाला मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहे.

हे देखील वाचा Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत...

Viral Video: चार वाघांना एकटं माकड पुरून उरलं; व्हायरल व्हिडिओ पाहून…

Viral video: रस्त्याने जात असताना म्हताऱ्याचा किडा वळवळला; विनाकारण बैलाला मारली काठी अन्.. पहा व्हायरल व्हिडिओ..

सेक्स विषयी मॅच्युअर्ड असणाऱ्या पुरुषांकडेच मुली जास्त आकर्षित होतात, आणि संबंधही ठेवतात; पण का? वाचा सविस्तर…

‘या’ दोन वेबसाइट्सनी Amazon आणि Flipkart चा उठवलाय बाजार; निम्म्यापेक्षा कमी किमतीत विकतायत वस्तू..

डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ; माकडाच्या तोंडात तोंड घालून टॅक्सी चालकानं वाचवला जिव, डोळे उघडताच माकडाने मारली मीठी…

IPL 2022: आयपीएल पाहण्यासाठी आता Disney+ Hotstar ला रिचार्ज करण्याची गरज नाही; ‘असा’ घ्या लाभ…

‘हे’ आसन केल्याने पुरुषांच्या जोषाबरोबर शुक्राणूंचीही संख्या वाढते; जाणून घ्या सविस्तर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.