Men’s Bad Habits: आयुष्यात चुकूनही करू नका या पाच गोष्टी, अन्यथा वैवाहिक जीवनाचा होईल सत्यानाश..

0

Men’s Bad Habits: निरोगी आरोग्य (healthy lifestyle) हे माणसाच्या यशस्वी जीवनाचे (successful life) गमक आहे. माणसाचे आरोग्य निरोगी असेल, तर माणूस कशावरही मात करू शकतो. निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी विशेष असं काही करावं लागतं, असंही काही नाही. काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही निरोगी आरोग्य ठेवू शकता. लहानपणापासून आपल्याला ज्या सवयी लागल्या आहेत, त्याच कायमस्वरूपी तुमच्या सोबत राहतात. आणि मग त्याचे परिणाम तुमच्या यशस्वी किंवा अपयशी आयुष्यात परिवर्तित होतात.

अलीकडच्या काळात वैवाहिक जीवनामध्ये (marriage life) पुरुषांना (Men) काही समस्या उद्भवत असल्याचं समोर आलं आहे. वैवाहिक जीवन आनंद ठेवायचं (happy marriage life) असेल, तर तुम्हाला लहानपणापासूनच चांगल्या सवयी आत्मसात करणं आवश्यक आहे. लग्नापूर्वी तुमच्या काही गोष्टी तुमच्या जीवनावर परिणाम करतात. आणि मग सुंदर आयुष्याची क्षणात वाट लागते. कोणत्या आहेत त्या गोष्टी? ज्याची काळजी तुम्ही लग्नापूर्वी घेण आवश्यक आहे. कोणत्या गोष्टीपासून तुम्ही दूर राहणे आवश्यक आहे? जाणून घेऊया सविस्तर.

अंडकोषांकडे दुर्लक्ष

माणसाला कोणत्याही प्रकारची समस्या कधीही उद्भवू शकते. मात्र त्या समस्येपासून पळ काढणे हा त्यावरचा उपाय नाही. आपल्याला असणाऱ्या समस्यांचा वेळीच निदान झालं, तर आपण भविष्यात निर्माण होणाऱ्या धोक्यापासून स्वतःला वाचू शकतो. अनेकांना अंडकोशाची समस्या असल्याचे जाणवतं. अंडकोशाला येणारी सूज, दोन्ही अंडकोशाची पातळी खाली वर होणे, अशा काही समस्या तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळा निर्माण होऊ शकतात. मात्र याकडे दुर्लक्ष करून तुम्हाला अजिबात चालत नाही. ही समस्या खूप किरकोळ आहे. यावर उपचार करून या समस्या वेळीच दूर करता येऊ शकतात.

समस्या शेअर करणे आवश्यक

पुरुष आपल्याला असणाऱ्या समस्या, दुःख हे इतरांना शेअर करणं किंवा त्याची माहिती देणं नेहमी टाळतो. त्याला ते आवडत नसतं. ही गोष्ट जरी सत्य असली, तरी ही भावना अत्यंत चुकीची आहे. पुरुषांना जर काही लैंगिक समस्या असतील, तर तुम्ही इतर पुरुषांसोबत याविषयी चर्चा करणे यात काहीही गैर नाही. अनेकांचा असा समज असतो, अशा विषयांवर आपण बोललो तर आपल्या पुरुषत्वावर शंका उपस्थित केली जाईल. मात्र असं अजिबात नसतं. तुम्ही या विषयाच्या तज्ञांचा देखील सल्ला घेऊन लैंगिक समस्येविषयी चर्चा करणे योग्य उपाय ठरू शकतो. याविषयी आपण कोणालाही बोलत नसल्याने, आपण नैराश्यात जातो. आणि या गोष्टी करण्यासाठी आपल्याला आत्मविश्वास मिळत नाही.

वेळेवर निरोगी आहार

सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, लैंगिक समस्या का उद्भवतात? याची अनेक कारणे असली, तरीदेखील वेळेवर निरोगी आहार न करणे हे एक महत्त्वाचं आणि प्रमुख कारण आहे. जर तुमचा आहार निरोगी आणि वेळेवर होत नसेल, तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यामध्ये लैंगिक समस्येचा देखील समावेश आहे. धावपळीच्या जीवनामध्ये अनेकदा तुम्हाला वेळेवर निरोगी आहार मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र तुम्हाला या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ही गोष्ट किरकोळ वाटत असली तरी, याचे दूरगामी परिणाम तुमच्या आयुष्यावर होतात. निरोगी आहार हे निरोगी आयुष्याची चावी आहे. साहजिकच यामुळे तुम्हाला याकडे कधीही दुर्लक्ष करता येणार नाही.

मद्यपान

अलीकडच्या काळामध्ये अनेक तरुणांना मद्यपान, सिगारेट यासारख्या गोष्टींचे व्यसन मोठ्या प्रमाणात जडल्याचे पाहायला मिळतं. अनेकजण सिगारेट, दारू या गोष्टीला आपल्या लाईफस्टाईलचा एक महत्त्वाचा भाग मानतात. मात्र मद्यपान आपल्या आयुष्यासाठी खूप हानिकारक आहे. सिगारेट आणि मद्यपान केल्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होतात. या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला लैंगिक समस्येला देखील सामोरे जावे लागू शकते. सिगारेट, दारू याचे सेवन केल्यामुळे तुम्हाला तणावाला सामोरे जावे लागते. याबरोबरच रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल यासारख्या आजारांना देखील तुम्ही निमंत्रण देता.

व्यायाम

आहाराबरोबरच नियमित व्यायाम करणे, हे देखील फार आवश्यक आहे. नियमित व्यायाम केल्याने तुमचे स्नायू मजबूत राहतात. याबरोबरच शरीरामधील ऑक्सिजनची पातळी देखील नियंत्रणात राहते. जर तुम्हाला ऑक्सिजनची कमतरता असेल, तर तुमच्यात लैंगिक आयुष्यातील स्टॅमिना कमी होण्याची समस्या जाणवते. नियमित व्यायाम केल्याने, तुमची लैंगिक ताकद नेहमी वाढत असते. तुम्हाला जडणाऱ्या अनेक रोगांपासून तुम्ही दोन हात दूर राहता. तसं पाहायला गेलं, तर व्यायाम करण्याचे फायदे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही.

हे देखील वाचा Sex During Periods: मासिक पाळीत सेक्स केल्यास पुरुषांना होऊ शकतो हा जीवघेणा रोग; महिलांसाठी मात्र आहेत फायदेच फायदे..

Google India Recruitment: पदवीधर उमेदवारांसाठी गूगल इंडियामध्ये निघाली मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

Women views on sex: लैंगिक संबंधाचा आनंद घेताना महिलांचं देखील असतं हे मत; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Second Hand Car: जबरदस्त कंडिशन असणारी Maruti Suzuki Alto मिळतेय केवळ 65 हजारांत; जाणून घ्या ऑफर विषयी सविस्तर..

Electricity bill: लाईट बिलाने त्रस्त आहात? चिंता करू नका; ही स्ट्रिक वापरा लाईट बिल येईल निम्म्याहून कमी..

Electric Bike: केवळ ९९९ रुपयांमध्ये घरी आणा ही इलेक्ट्रिक साईकल; एका चार्जमध्ये १२० किमी जाणाऱ्या या साईकल विषयी जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.