lizard benefits: घरात पाल नसेल तर तुम्हाला होऊ शकतो हा गंभीर आजार; जाणून घ्या पालीचा आणि माणसाच्या आरोग्याचा थेट संबंध..
lizard benefits: पृथ्वीवर (the earth) असणाऱ्या प्रत्येक जीवसृष्टीचं (life form) निसर्ग व्यवस्थित ठेवण्यासाठी महत्त्वाचं योगदान आहे. पृथ्वीतलावर प्रत्येक प्राण्यांचं (animals) विशेष महत्व आहे. अनेकजण प्राण्यांच्या अन्न साखळीवर (food chain) टीका करत असतात, मात्र निसर्गाचा समतोल साधण्यासाठी प्राण्याची अन्नसाखळी म्हत्वाची आहे. काही प्राणी पाहताच आपल्याला प्रचंड संताप येतो. पाल (lizard) ही देखील त्यातलाच प्रकार आहे. अनेकजण पालीला प्रचंड घाबरतात. मात्र घरामध्ये पाल असेल, तर त्याचे आश्चर्यकारक फायदे आहेत. होय तुम्ही बरोबरच वाचलं आहे, घरात पाल असण्याचा थेट आरोग्याशी (health) संबंध आहे.
आपल्या आजूबाजूला असणाऱ्या बऱ्याच गोष्टी आयुष्यात कळत न कळत आपल्या जीवनाशी निगडित असतात. बऱ्याच गोष्टींचे आपल्याला महत्व वाटत नसले, तरी त्या आपल्यासाठी फायदेशीर असतात. किंवा बऱ्याच वेळा आपण काही ऐकीव गोष्टींमुळे बरेच गैरसमज मनात ठेऊन असतो. बऱ्याच वेळा त्यात काहीच तथ्य नसले, तरी आपण पहिल्या पासून ऐकत आलेल्या गोष्टींना सत्य मानून टाकतो. किंबहुना आपले मन वास्तव मान्य करायला तयार नसते. पाल ही देखील त्यापैकीच एक आहे. आपल्याकडे पाली विषयी अनेक गैरसमज आहेत.
आपण बऱ्याचदा पालीबद्दल विविध गैरसमज घेऊन असतो. बऱ्याच लोकांना घरात पाल दिसली की खूप किळसवाणे वाटते. काही लोकांना तर घरात पाल अजिबातच नको असते. घरात पाल चुकचुकली तरी देखील त्याबाबत वेगवेगळे समज गैरसमज आहेत. पालीचा घरातील रहिवास हा पूर्वीच्या काळापासून चालत आला आहे. त्यामुळे पालीबाबत असणारे समज गैरसमज हे पूर्वीपासून हयात आहेत. कधीतरी योगायोगाने घडलेल्या गोष्टींमुळे पालीबाबत गैरसमज पसरत आले आहेत. मात्र घरात पाल असण्याचा आणि आरोग्याचा थेट संबंध आहे. घरात पाल नसेल, तर तुम्ही स्वतःचा जीव देखील गमावू शकता. काय आहेत पाळीचे फायदे जाणून घेऊया सविस्तर.
पालींमुळे होणारे फायदे
तुम्ही कधी असा विचार केला आहे का, आपल्या घरात जर भिंतीवर दिसणाऱ्या पालीच नसतील, तर काय झालं असतं? आपल्या आजूबाजूला असणाऱ्या जैवविविधतेचा आणि त्यांच्यापासून मानवाला होत असलेला फायदा याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. पालींचा देखील त्यामध्ये समावेश आहे. पाली व्यतिरीक्त आपल्या घरात आपण वेगवेगळे कीटक आपण नेहमी पहात असतो. विशेषतः पावसाळ्यात कीटकांचे प्रमाण अधिक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्यातील बऱ्याच कीटकांचा पाल फडशा पाडत असते. त्यामुळे घरातील कीटकांची संख्या आटोक्यात राहते.
काही किडे घरातील विजेच्या बल्बजवळ पाहायला मिळतात. साहजिकच हे कीटक पालीचे भक्ष आहे. एवढच नाही, तर पाल डास, माश्या खाण्याचे देखील काम करते. साहजिकच डास, माश्यामुळे पसरणारा रोग आपल्या पर्यंत येऊ न देण्याचे काम पाल करत असते. डास चावल्याने आपल्याला अनेक आजार होण्याची शक्यता असते, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. माश्या घरातील अन्न पदार्थावर बसल्याने देखील आपण आजारी पडण्याची शक्यता असते. मात्र पाल माश्या खाऊन आपल्याला आजारी पडण्यापासून वाचवण्याचे काम करते.
घरात पाली नसत्या तर..
घरात जर पालीचे वास्तव्य नसते, तर यामुळे आपल्या घरातील कीटकांची संख्या आटोक्यात राहिली नसती. विचार करा पालीने कीटकांचा फडशा पाडला नसता. तर आपल्या घरात कीटकांचे प्रमाण किती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले असते. माश्या, डास याचे देखील प्रमाण घरात वाढले असते. साहजिक यामुळे खूप मोठे परिणाम आपल्या आरोग्यावर झाले असते. डासामुळे डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांना आपल्याला अधिक प्रमाणात सामोरे लागले असते.
जगात कीटकांची संख्या एवढी प्रचंड आहे की, तुम्ही त्याची कल्पना देखील करू शकत नाही. या पृथ्वीवर जेवढी जैवविविधता आहे, त्यातील सर्वात मोठा वाटा कीटकांचा आहे. कीटकांची खूप मोठी संख्या आहे. पृथ्वीवरील प्रत्येक जीवाचे विशेष असे महत्व आहे. परंतु प्रत्येक जीवांची संख्या नियंत्रणात असणे गरजेचे असते. पाल देखील तेच काम करतात. साहजिकच या सगळ्या गोष्टींमुळे पाल घरात असल्याचा किती महत्व आहे. हे आपल्या लक्षात आले असेल.
खरंच पालीच्या लाळेमुळे माणसाचा मृत्यू होतो का?
बऱ्याचदा पहिल्या पासून पालीची लाळ ही विषारी असल्याचे बोलले जाते. एवढंच नव्हे तर पालीची लाळ जेवणात पडली तर मानवाचा मृत्यू होतो, त्याच्या दंतकथा गावागावात सांगितल्या जातात. त्यामुळे साहजिकच पाल दिसली की मग थोडी भीती वाटतेच. परंतु पाल जेवणात पडली किंवा तिची लाळ जेवणात पडली तर ते जेवण विषारी होऊन जाते असे अनेकदा बोलले जाते. पण असे काहीही नाही. माणसाचा मृत्यू होईल, एवढ्या पाली विषारी नसतात. परंतु असे नसले तरी त्या किंवा पालीची लाळ जेवणात पडल्यामुळे मळमळ होण्याची शक्यता असते. उलट्या देखील होऊ शकतात. चक्कर देखील येण्याची शक्यता असते. परंतु हे सर्व ॲलर्जिक रिॲक्शनमुळे होत असते. हे फार गंभीर नसून, यावर उपचार केला जाऊ शकतो.
Viral video: सिंहाच्या जबड्यातून लेकराला सोडवण्यासाठी म्हशीला द्यावा लागला जीव; लेकरू तर वाचलं पण..
INDvSA: बॅटिंग करत असताना के एल राहुलच्या पायातच निघाला साप; पुढे काय झालं पाहा व्हिडिओ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम