Diwali Package: रेशनकार्ड धारकांची दिवाळी राज्य सरकारकडून साजरी; साखर, डाळ, तेलासह या वस्तू मिळणार केवळ शंभर रुपयांत..

0

Diwali Package: राज्यसह देशभरात दिवाळी (Diwali) मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दिवाळीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी अनेक सरकारी कर्मचारी, एवढेच नाही तर खाजगी कर्मचाऱ्यांना देखील दिवाळीत अनेक दिवस सुट्टी मिळते. दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी व्हावी, यासाठी अनेक कर्मचाऱ्यांना सरकार त्याचबरोबर खाजगी कंपन्या देखील दिवाळीचा बोनस देत असतात. सर्वसामान्यांमध्ये खूप मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी होत असली तरी, अनेक गरीब कुटुंबामध्ये मात्र अनेकांना दिवाळी साजरा करता येत नसल्याचे देखील पाहायला मिळते. (Diwali package announced for Maharashtra ration card holders)

अनेक गरीब कुटुंबांसाठी दिवाळी, दसरा, असून नसल्यासारखे असतात. हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र आता राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील गरीब कुटुंबांची दिवाळी गोड होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी या संदर्भात घोषणा केली असून, रेशन कार्ड (ration card) धारकांना आता शंभर रुपयासाठी दिवाळीचे पदार्थ बनवण्यासाठी लागणारे साहित्य मिळणार आहे. होय तुम्ही बरोबर वाचलं आहे. राज्य सरकारने (state government) आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील 1 लाख 62 हजार रेशन कार्डधारकांना या पॅकेजचा लाभ मिळणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. एकूण सात कोटी लोकांना या पॅकेजचा लाभ मिळणार असल्याची माहिती देखील फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्य सरकारने घोषित केलेल्या पॅकेजमध्ये रेशन कार्ड धारकांना केवळ शंभर रुपयांमध्ये तेल, (oil) साखर (sugar) हरभरा डाळ (Gram dal) गरा या पाच वस्तू मिळणार आहे. या पाच वस्तूंच्या वाटपाचे मानसी किती प्रमाण असेल, हे मात्र अधिकृतरित्या समजू शकलेलं नाही.

कसे होणार वाटप

राज्य सरकारने गरिबांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी रेशन कार्ड धारकांना शंभर रुपयात साखर, हरभरा डाळ, गरा, तेल या वस्तू देण्याचा जाहीर केला. विशेष म्हणजे, या वस्तूंचं एकत्रित पॅकेज केलं जाणार आहे. यामुळे वाटपत तफावत पाहायला मिळणार नसल्याने, ही आनंदाची बाब असल्याचं बोलले जात आहे. मात्र दुसरीकडे या पॅकेजच्या वाटपाचे स्वरूप मात्र मानसी काय असेल, हे ठरलं नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे. रेशन कार्डवर किती सदस्य आहेत याचा वाटपाशी संबंध नसून, प्रत्येकाला या पाचही वस्तू सारख्याच प्रमाणात दिल्या जाणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

राज्य सरकारच्या या पॅकेजवर होतेय टीका

राज्य सरकारने रेशन कार्डधारकांना शंभर रुपयांमध्ये साखर, तेल, हरभरा डाळ, गरा या पाच वस्तू एकत्रित देण्याचा निर्णय घेतला असला तरी, याचं प्रमाण मात्र निश्चित करण्यात आलं नसल्याने, खूप मोठी संभ्रमता असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पाचही वस्तू एकत्रित पॅकेज केल्याने, रेशन कार्डवर जितके सदस्य असतील, त्याप्रमाणे याचे वाटप होणार नसल्याने, राज्य सरकार फक्त गरिबांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम करत आहे. दुसरीकडे मात्र राज्य सरकार प्रति सदस्य एक किलो प्रमाणे, हे दिवाळी पॅकेज देणार असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती समजू शकली नाही.

हे देखील वाचाThe Best Couple Combo: उंच मुलांकडेच मुली आकर्षित का होतात? धक्कादायक माहिती आली समोर; उंचीचा वैवाहिक जीवनावरही आहे प्रभाव..

INDvSA: बॅटिंग करत असताना के एल राहुलच्या पायातच निघाला साप; पुढे काय झालं पाहा व्हिडिओ..

INDvSA: युवराज प्रमाणे रोहितलाही आहे कॅन्सर; सामन्यांत रोहितच्या नाकातून अचानक येऊ लागले रक्त, पाहा व्हिडिओ..

Flipkart Big Dussehra Sale 2022: या सेलमध्ये Samsung, Vivo सह अनेक कस्मार्टफोनवर तब्बल 80 टक्के डिस्काउंट; ऑफर फक्त तीन दिवस..

Second hand car: टू-व्हीलर पेक्षाही कमी किंमतीत मिळतेय Maruti Suzuki Wagon R; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

Women rights: सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! महिलांना गर्भपात करण्याचा दिला पूर्ण अधिकार..

Relationship Tips: लग्नापूर्वीच्या संबंधामुळे सासूपेक्षा सासऱ्यासोबत सूनेचं जूळतं अधिक; या मागची कारणे जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.