Flipkart Big Dussehra Sale 2022: या सेलमध्ये Samsung, Vivo सह अनेक कस्मार्टफोनवर तब्बल 80 टक्के डिस्काउंट; ऑफर फक्त तीन दिवस..

0

Flipkart Big Dussehra Sale 2022: फ्लिपकार्ट (Flipkart) आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमी वेगवेगळ्या सेलचे (sel) आयोजन करत असते. ग्राहकांच्या मनात कमालीची विश्वासार्हता निर्माण करणाऱ्या या ई-कॉमस वेबसाईटवरून (e commerce website) ग्राहक देखील खूप मोठ्या प्रमाणात आहेत. इलेक्ट्रॉनिक (electronic) वस्तूंची खरेदी करताना पाहायला मिळतात. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल (Flipkart big billion days sale) संपताच Flipkart ने ग्राहकांसाठी पुन्हा एकदा फ्लिपकार्ट बिग दशेरा सेलच आयोजन केलं आहे. या सेलमध्ये ग्राहकांना तब्बल 80% पर्यंत स्मार्टफोन्स आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट मिळणार असल्याने, हा सेल ऐतिहासिक होणार असल्याचं बोललं जात आहे.

सणासुदीला अनेक वस्तूंची ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करताना पाहायला मिळतात. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या ई कॉमर्स वेबसाईटवर ही खरेदी करावी, असा Flipkart e commerce website चा उद्देश असून, दसऱ्याच्या मुहूर्तावर या सेलचे आयोजन केले केले आहे. दुर्गा पूजेचा मुहूर्त साधून फ्लिपकार्टने या दसऱ्याला तब्बल 80 टक्क्यांहून अधिक डिस्काउंट देण्याचा निर्णय घेतला आहे. फ्लिपकार्ट बिग दसरा सेल 5 ऑक्टोंबर पासून ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या सेलमधून सोनं लुटण्यासाठी ग्राहकांना फक्त तीन दिवसाचाच अवधी मिळणार आहे. कारण या सेलची मुदत केवळ तीन दिवस असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या ऑफर्स विषयी सविस्तर.

दुर्गा पूजेचा मुहूर्त साधून Flipkart ने फ्लिपकार्ट बिग दसरा सेलचे आयोजन केलं आहे. हा दसरा पाच ऑक्टोबर पासून आठ ऑक्टोबर पर्यंत तीन दिवस ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. या सेलमधून ग्राहकांना स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. विशेष म्हणजे ग्राहकांनी जर एचडीएफसी बँकच्या माध्यमातून पेमेंट केल्यास १० टक्के अतिरिक्त डिस्काउंट मिळणार आहे. महत्वाचं म्हणजे, फ्लिपकार्ट सदस्यांसाठी एक दिवस अगोदर या सेलचा लाभ घेता येणार आहे. आता आपण कोणत्या उत्पादकांवर किती टक्के डिस्काउंट आहे, याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

80% पर्यंत मिळणार सूट 

तसे पाहायला गेलं, तर Flipkart ने या सेलबद्दल फारसी माहिती दिली नाही. मात्र तरी देखील त्याबद्दल बऱ्याच उत्पादकांविषयी माहिती मिळाली आहे. फ्लिपकार्टने या सेलचे आयोजन करताना म्हंटले आहे, या सेलमध्ये ग्राहकांना सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टफोनवर खूप मोठ्या प्रमाणात सूट दिली जाणार आहे. सोबतच ग्राहकांना स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर तब्बल 80% पर्यंत सूट दिली जाणार आहे. याबाबतचा टीझरही देखील कंपनीने रिलीज केला आहे.

खासकरून या सेलमध्ये ग्राहकांना टीव्ही त्याचबरोबर गृहोपयोगी अनेक वस्तूंवर तब्बल 75% पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. या सर्व सवलती व्यतिरिक्त ग्राहकांना HDFC बँकेकडून देखील अतिरिक्त १० टक्के सवलत मिळणार आहे. एवढच नाही, तर ग्राहकांना एक्सचेंज ऑफरची देखील सुविधा मिळणार आहे.

स्मार्टफोनवर डिस्काउंटचा धमाका

कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाईटवर किती टक्के डिस्काउंट आहे, याविषयी अनेकांना उत्सुकता असते. मात्र सर्वात जास्त, या ई-कॉमर्स वेबसाईटवर कोणकोणत्या कंपनीचे स्मार्टफोन डिस्काउंटमध्ये विकले जात आहेत, याचा देखील अनेकजण विचार करत असतात. ग्राहकांची ही मागणी लक्षात घेऊन, अनेक ई-कॉमर्स वेबसाईट खास करून फ्लिपकार्ट प्रत्येक सेलमध्ये स्मार्टफोनवर खूप मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देत असते. फ्लिपकार्टने आयोजित केलेल्या फ्लिपकार्ट बिग दसरा सेलमध्ये देखील मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनला डिस्काउंट देण्यात आला आहे.

फ्लिपकार्ट बिग दसरा सेलमध्ये, ग्राहकांना Realme त्याचबरोबर Samsung, Poco तसेच Oppo, Apple, Vivo, Motorola आणि Xiaomi या स्मार्टफोन्सवर तब्बल ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात आला आहे. एवढच नाही, तर ग्राहकांना हे सर्व स्मार्टफोन सुलभ हप्त्यासह खरेदी करण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. यासोबतच ग्राहकांनी Flipkart Pay Later UPI पेमेंट केल्यास 500 रुपयापर्यंत गिफ्ट व्हाउचर देखील मिळणार आहे.

हे देखील वाचा INDvSA: बॅटिंग करत असताना के एल राहुलच्या पायातच निघाला साप; पुढे काय झालं पाहा व्हिडिओ..

INDvSA: युवराज प्रमाणे रोहितलाही आहे कॅन्सर; सामन्यांत रोहितच्या नाकातून अचानक येऊ लागले रक्त, पाहा व्हिडिओ..

Women Psychology: सेक्स करताना महिलांच्या डोक्यात सुरू असतो हा अजब विचार; जाणून उडतील होश..

Women rights: सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! महिलांना गर्भपात करण्याचा दिला पूर्ण अधिकार..

Marriage Tips: बायकोच्या सतत चिडचिडेपणामुळे त्रस्त आहात? फक्त हे काम करा बायकोचा चिडचिडेपणा होईल कायमचा बंद..

Relationship Tips: लग्नापूर्वीच्या संबंधामुळे सासूपेक्षा सासऱ्यासोबत सूनेचं जूळतं अधिक; या मागची कारणे जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.