sleeping direction: अविवाहितांनी कधीच या दिशेला पाय करून झोपू नये; जाणून घ्या या मागचं शास्त्र आणि झोपण्याची योग्य पद्धत..

0

sleeping direction:आरोग्य निरोगी (Healthy health) ठेवायचं असेल, तर झोप ही माणसाच्या जीवनातली खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुमची नियमितपणे झोप पूर्ण होत असेल, तर तुम्ही अनेक आजारांपासून दोन हात लांब राहता. अलीकडच्या काळात पुरेशी झोप घेणे, हे अनेकांसमोरील आव्हान आहे. हे तुमच्यापैकी अनेकांना मान्य असेल. माणसाचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल, तर किती तास झोप घेणे आवश्यक आहे, हे अनेकांना माहिती देखील असेल. अनेक जण या नियमाचा पालन देखील करत असतात. परंतु अनेकांना झोपण्याच्या दिशा मात्र माहित नसल्याचे पहायला मिळते. दररोज सात ते आठ तास व्यवस्थित झोप घेणं, हे आरोग्यासाठी ज्याप्रमाणे फायदेशीर आहे, त्याच प्रमाणे झोपण्याच्या योग्य दिशेला देखील महत्त्व आहे. (Sleep and Vastu)

स्मार्टफोनच्या (smartphone) या जमान्यात अनेकजण आपल्या आयुष्यातील (life) अमूल्य वेळ सोशल मीडियावर (Social media) घालवतो. अनेक वाईट व्यसनांपैकी सोशल मीडिया हे देखील एक वाईट व्यसनच आहे. स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या या जमान्यात अनेकांची लाईफस्टाईल पूर्णतः बदलून गेली आहे. अनेकांचे आपल्या आरोग्याकडे लक्ष नसल्याचे पाहायला मिळते. पुरेशी झोप न होत असल्याने आपण अनेक आजारांना निमंत्रण देतो. जितकं महत्त्वाचं पुरेसे झोप घेणं आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, तितकीच झोपण्याची दिशा देखील महत्त्वाची आहे. आज आपण याचविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. 

या दिशेला कधीच करू नका पाय

अनेक जणांचा आपल्या कर्मावर विश्वास असतो. मात्र वास्तुशास्त्रानुसार देखील आपले आयुष्य जगणाऱ्यांची संख्या अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळतं. वास्तुशास्त्रानुसार झोपण्याच्या काही पद्धती निश्चित करण्यात आल्या आहेत. जर तुम्ही दक्षिण दिशेला पाय करून झोपला असाल, तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला पाय करून कधीही झोपू नये, असं स्पष्ट सांगण्यात आले आहे. आता अनेकांना यावर विश्वास बसणार नाही. मात्र दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा असते. अनेकांना यमराजाची दिशा ही दक्षिण आहे, हे माहित देखील असेल. याच कारणामुळे दक्षिण दिशेला पाय करून झोपल्यावर त्याचा आरोग्यावर देखील नकारात्मक परिणाम होत असल्याचं वास्तुशास्त्रात नमूद करण्यात आलं आहे.

दक्षिण दिशेला पाय करून झोपल्यावर अनेकांना याचा खूप मोठा फटका बसतो. मात्र या सगळ्यात घरातील आजारी आणि जेष्ठ मंडळींना याचा सगळ्यात जास्त फटका बसतो. जर तुमच्या घरात काही ज्येष्ठ मंडळी किंवा आजारी लोक असतील, तर तुम्ही त्यांच्या झोपण्याच्या व्यवस्थेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. झोपेच्या वेळी त्यांना त्यांचं डोकं हे दक्षिण दिशेला असावं या पद्धतीने झोपण्याची व्यवस्था केली, तर तुम्हाला अनेक अडचणी पासून स्वतःला दूर ठेवता येऊ शकतं. असे देखील वास्तुशास्त्रात नमूद करण्यात आलं आहे. अविवाहित मुलींना देखील वास्तुशास्त्रात झोपण्याच्या पद्धतीवर भाष्य करण्यात आलं आहे, आपण त्याविषयी देखील सविस्तर जाणून घेऊ.

अविवाहित मुलींनी कसे झोपावे. 

अविवाहित (unmarried) मुलींच्या झोपण्याच्या दिशेवर देखील वास्तुशास्त्रात भाष्य करण्यात आलं आहे. जर तुमच्या घरात अविवाहित मुलगी असेल, तर तिच्या झोपण्याची पद्धत देखील तुम्ही निश्चित करणे आवश्यक आहे. घरातील अविवाहित मुलींनी नेहमी पश्चिम त्याच बरोबर दक्षिण दिशेला देखील पाय करून झोपू नये, असं वास्तुशास्त्र सांगण्यात आलं आहे. मुलींच्या झोपण्याचा दिशे विषयी सविस्तर सांगायचं झाल्यास, अविवाहित मुलींनी नेहमी उत्तरेकडे पाय त्याचबरोबर दक्षिणेकडे डोकं करून झोपणे आवश्यक आहे. विवाहित महिलांसाठी देखील वास्तुशास्त्रात झोपण्याची दिशा निश्चित करण्यात आली आहे, आपण तेही पाहू.

विवाहित महिलांनी कसे झोपावे

शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल, तर नियमित आठ तास झोप घेणे आवश्यक आहे. नियमितपणे जर तुम्ही नियमानुसार व्यवस्थित झोप घेतली, तर तुम्ही अनेक आजारांपासून लांब राहता. त्याचप्रमाणे तुमच्या झोपण्याची दिशा देखील योग्य असेल, तर तुमच्यावर कधीच वाईट विचारांचा प्रभाव पडत नाही. विवाहित महिलांसाठी देखील ज्योतिष शास्त्रात काही झोपण्याच्या दिशा आणि नियम ठरवून देण्यात आले आहेत. विवाहित (married) महिलांनी घरातील वायव्य भागात कधीच झोपू नये, असे देखील म्हटले आहे. घरातील वायव्य भागात झोपल्यामुळे विवाहित महिलांचे शारीरिक त्याचबरोबर मानसिक आरोग्य देखील धोक्यात येत असल्याचं वास्तुशास्त्रात नमूद करण्यात आलं आहे.

हे देखील वाचा Bollywood News: दोन लग्नं, स्वत:च्याच मुलीसोबतच असे संबंध! दिग्दर्शक महेश भट्ट यांचा थक्क करणारा प्रवास वाचून जाल चक्रावून..

Kareena Kapoor: शालेय जिवनातच या व्यक्तीकडून करीना कपूर झाली होती प्रेग्नंट; प्रकरण वाचून बसेल धक्का..

LGBTQ: होय तृतीयपंथीयांचा आशिर्वाद असतो शुभ; जाणून घ्या तृतीयपंथी आणि देवाचे कनेक्शन..

Amazon flipkart Sale: flipkart आणि Amozon वर सुरू आहे offer’s चा धुमाकुळ; स्मार्टफोनसह या वस्तू मिळतायत निम्म्या किमतीत..

Electric Scooter: अमेझॉनवर मिळतेय जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर फक्त इतक्या हजारात..

Agricultural exports: तुमचा शेतमाल निर्यात करायचाय? आता सरकार उचलणार निर्यातीचा खर्च; जाणून घ्या प्रक्रिया..

SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..

Viral Video:धावत्या ट्रेन मधून चोरी करायला गेला अन् खिडकीत अडकला; मग प्रवाशांनीही शिकवला चांगलाच धडा..

Ration card: कोणत्या महिन्यात काय दराने किती रेशन तुम्ही घेऊन गेला आहात? जाणून घ्या सविस्तर माहिती सोप्या भाषेत..

Smartphone Earning: घरबसल्या मोबाइलवरून कमवा दररोज एक हजार रुपये; विश्वास नाही बसत? जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.