Viral Video:धावत्या ट्रेन मधून चोरी करायला गेला अन् खिडकीत अडकला; मग प्रवाशांनीही शिकवला चांगलाच धडा…

0

Viral Video:गर्दीच्या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याच्या बातम्या कायम आपल्या कानावर येत असतात. कुणाला काहीही जाणवू न देता चोर हात साफ करुन निघून जातात. बऱ्याचदा गर्दीच्या ठिकाणी असे प्रकार घडलेले आपल्याला पाहायला मिळतात कारण गर्दीचा विशेष फायदा या चोरांना होत असतो. त्यामुळेच गर्दीच्या ठिकाणी वावरत असतांना काळजी घेणे फार गरजेचे असते. विशेषत: रेल्वे स्टेशन किंवा रेल्वेतून प्रवास करतांना विशेष दक्षता घेणे जरुरी आहे. अन्यथा तुमचे पाकीट किंवा मोबाईल कधी गायब झाला, हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी विशेष काळजी घेतलीच गेली पाहिजे.

आजकाल स्मार्टफोनला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. स्मार्टफोनचा आकार छोटा आणि वजन सुद्धा कमी असल्यामुळे त्याची चोरी करणे सहज सोपे आहे. त्यामुळे चोरट्यांनी आता चोरीसाठी स्मार्टफोनला प्राधान्य दिले आहे. स्मार्टफोन चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गर्दीचा फायदा घेऊन चोर आपली कामे फत्ते करतात. परंतू चोरी करतांना तुम्हाला याची भनक सुद्धा लागु देत नाही. अनेकदा चोरी पकडली सुद्धा जाते. गर्दीच्याठिकानी चोरी करतांना चोर पकडल्या गेल्यास मात्र चोराचे अवघड होऊन जाते. लोकांकडून त्याला ल‍ाथाबुक्क्यांचा चांगलाच प्रसाद मिळतो. यासोबतच पोलिस कारवाई वेगळी होती. मात्र बिहारमध्ये चोरी करतांना पकडला गेलेल्या चोरास वेगळीच अद्दल तेथील लोकांनी घडवली आहे.

सोशल मिडीयावर याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीस लोकांनी थेट ट्रेनच्या खिडकीलाच लटवकवले. ट्रेन वेगात असल्यामुळे त्याचे हात न सोडण्याची विनंती ती व्यक्ती लोकांना करतांना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ कुठला आहे व कशामुळे त्या व्यक्तीस अशाप्रकारची वागणूक दिली जातेय, याबाबत माहिती घेतली असल्यास लोकांनी त्या व्यक्तीस चोरी केल्याची अद्दल घडवली असल्याची माहिती समोर आली आहे.

बिहारमधील बेगुसराय येथील ही घटना आहे. बेगुसराय स्टेशनवरुन एक गाडी सुटत असतांनाच एक चोरट्याने खिडकीच्या आत हात टाकला आणि आतील व्यक्तीचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला. मोबाईल तर त्या चोरट्याच्या हाती लागू शकला नाही. मात्र चोरटा चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तेथील एका प्रवाशास जाणवले आणि त्याने लगेच त्या चोरट्याचा हात धरुन घेतला. ऐवढ्यातच ट्रेन सुरु झाली. त्यामुळे त्याने हात सोडण्याची विनंती केली. परंतू हीच वेळ आहे, चोरट्याला चांगली अद्दल घडवण्याची असे तेथील लोकांनी ठरवले आणि त्या लोकांनी त्या चोरट्याचा हात सोडलाच नाही. त्याऐवजी घट्ट धरुन ठेवला. ऐवढ्यातच गाडीने वेग धरला.

गाडीने वेग धरल्यामुळे त्या माणसाला अक्षरश: खिडकीला लटकावे लागले. ट्रेनचा वेग काही क्षणांतच प्रचंड वाढल्याने आता हात सोडल्यास थेट आपल्या जिवावर बेतू शकते, हे चोरट्याच्या लक्षात आले. त्यामुळे तो हात न सोडण्याची विनंती करू लागला. परिणामी तशाच अवस्थेत १० किमीपर्यंत लोकांनी त्याला खिडकीला लटकवत ठेवले. खागरियाजवळ एक स्टेशनवर गाडी थांबताच लोकांनी त्याचा हात सोडला आणि त्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. अशाप्रकारे त्या चोरट्यास लोकांनी चांगलीच आद्दल घडवली.

रेल्वे स्थानकांवर व रेल्वेत चोरीचे प्रमाण पुष्कळ असते. अगदी सफाईदारपणे चोर आपले काम करतात. मात्र या चोरास चांगलीच अद्दल घडली आहे. त्यामुळे यापुढे चोरी करतांना त्याला घडलेला प्रसंग नक्कीच आठवेल. परंतू हा प्रकार ज्यांनी त्या चोरास अशाप्रकारची वागणुक दिली, त्यांच्या अंगलट येऊ शकतो. चोरी करणार्‍यास कायद्याने शिक्षा दिली जाते. मात्र अशी वागणुक देणे माणुसकीला काळीमा फासण्यासारखे असल्याचे मत अनेकांनी सोशल मिडीयावर व्यक्त केले आहे. थोडीशीही चुकी झाल्यास थेट चोरी करण्यार्‍याचा जिवावर बेतले असते. त्यामुळे मानवाधिकाराने याची दखल घेऊन चोरांस अशाप्रकारची हीन वागणुक देणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा सोशल मिडीयावर केली जात आहे.

परंतू असं असलं तरी देखील या व्हिडिओमुळे (Viral Video) अनेक चोरांना यातून धडा नक्कीच मिळेल. कारण बऱ्याच तरुणांनी स्वतःचा व्यवसाय, नोकरी न करता चोरीला जीवन जगण्याचे साधन बनवले आहे. ज्याची आपण चोरी करत आहोत, त्याच्या साठी ती गोष्ट किती महत्वाची आहे, असा विचार देखील या लोकांना येत नाही. बऱ्याचदा मोबाईलमध्ये लोकांच्या आठवणी साठवलेल्या असतात. या आठवणी त्यांच्यासाठी खूप महत्वाच्या असतात. बऱ्याचदा मोबाइलमध्ये कुटुंबातील मृत सदस्याचे फोटो वगैरे, व्हिडिओ असतात. ते त्या कुटुंबीयांसाठी खूप महत्वाचे असते.

हेही वाचा: पुरुषांच्या बर्बादीचं कारण ठरतात अशा गुणांच्या स्त्रिया; काय सांगते चाणाक्य निती? अशा ओळखता येतात त्या स्त्रिया..

SPM kisan योजनेच्या शेतकऱ्यांना शिंदे सरकारकडून मिळणार दिवाळी गिफ्ट; जाणून घ्या या योजनेविषयी सविस्तर.. 

 अजगराची शिकार कराय गेलेल्या बिबट्यालाच गमवावा लागला आपला जीव; थरारक व्हिडीओ पाहून फुटेल घाम..

पूरुषांच्या बर्बादीचं कारण ठरतात अशा गुणांच्या स्त्रिया; काय सांगते चाणाक्य निती? अशा ओळखता येतात त्या स्त्रिया..

शेतकऱ्यांनो फक्त ही अट पूर्ण करा; ट्रॅक्टर खरेदीवर केंद्र सरकार देईल 50 टक्के अनुदान..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.