Saffron Milk Side effect: मूल गोरं व्हावं म्हणून गरोदरपणात केशर युक्त दूध पिताय? जाणून घ्या याचे बाळाच्या आरोग्यावर काय गंभीर परिणाम होतात..

0

Saffron Milk Side effect: महिला गरोदर (pregnancy) असताना तिची काळजी घेणारे पुष्कळ लोक असतात. तिच्या खाण्या-पिण्यापासून ते तिच्या हाताखाली देण्यासाठी अनेक माणसे देखील नेमली जातात. गरोदरपणात महिलाचा हट्ट आनंदाने पुरवला जातो. खास करून खाण्यापिण्याची प्रत्येक गोष्ट महिलाला उपलब्ध करून दिली जाते. मात्र गरोदरपणात आपण काय खातो, यावर आपले आणि बाळाचे आरोग्य अवलंबून असते. अनेकदा या गोष्टीचा विचार न करता गरोदर महिलांचे हट्ट पुरवले जातात. मात्र यामुळे अनेक गंभीर समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते. खास करून केशरयुक्त दुधाचे सेवन गरोदरपणात केल्यामुळे गर्भाशयाला धोका देखील निर्माण होण्याचा शक्यता असल्याचे डॉक्टर सांगतात. (drinking Saffron milk during pregnancy makes baby fair)

महिला गरोदर असताना अनेक जण आपलं मूल हे गोरं व्हावं, यासाठी अनेक उपाययोजना करतात. यामध्ये केशरयुक्त दूध पिण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले असल्याचे एका सर्वेत समोर आलं आहे. अनेक उच्च शिक्षित महिलांपासून खेडेगावांमधील असुशिक्षित महिला देखील आपलं मूल गोरं आणि गोंडस व्हाव यासाठी केशव युक्त दुधाचे सेवन करतात. केशव युक्त दुधाचे सेवन केल्याने मूल गोरं होतं, असा अनेकांचा समज आहे. मात्र याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती नाही. असं देखील या विषयाचे तज्ञ सांगतात. गरोदरपणात केशरीयुक्त दुधाचा सेवन केल्याने मूल गोरं आणि गोंडस होतं, याविषयी कोणत्याही सर्वेत माहिती नसताना महिला केशव युक्त दुधाचे सेवन का करतात?

आपण कितीही नाकारलं, तरी देखील समाजात अजूनही काळा आणि गोरा असा भेदभाव केला जातो. घरातील सर्वच मंडळींना आपल्या घरामध्ये नवीन येणारं मुल गोरं व्हावं असं वाटत असतं. मग ती मुलगा असो किंवा मुलगी याने काहीही फरक पडत नाही. मात्र मूल गोरं असावं, अशी अनेकांची इच्छा असते. घरातील सर्व मंडळींबरोबरच आईला देखील आपलं मूल्य निरोगी आणि सुंदर, गोरं असावं असं वाटत असतं. साहजिकच या सगळ्या गोष्टींमुळे मुल निरोगी राहण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे? सोबतच गोरं होण्यासाठी देखील कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत? याचा विचार केला जातो. अजूनही आपल्या समाजामध्ये अशा अनेक समजुती आहेत, ज्याचा शास्त्राशी काहीही संबंध नसतो. केशरयुक्त दुधाने मूल गोरं होतं, याचा देखील शास्त्राशी काहीही संबंध नसल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे.

कशामुळे मूल काळं आणि गोरं जन्मते

केसरयुक्त दुधाचे सेवन केल्याने मूल गोरं जन्मतं हा निव्वळ गैरसमज असून, याविषयी अधिकृत अशी कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही. असं तज्ञांचे मत आहे. मेलॅनिनच्या (Melanin) पातळीवर आपले लेकरू काळे होणार आहे की, गोरं (fair) हे अवलंबून असते. शरीरामधील मेलेनिनची पातळी जर वर असेल तर मुलाची त्वचा ही काळी होत असते. त्याचबरोबर मेलेनिनची पातळी संतुलित असल्यावर मुलाची त्वचा गोरी होते. मुल गोरं आणि काळं जन्मण्याला ही एक गोष्ट जबाबदार असते, किंवा कारणीभूत असते. केशरयुक्त दूध पिल्याने आपलं लेकरू गोरं जन्मतं हा निव्वळ गैरसमज आहे. असे देखील या विषयाच्या तज्ञांचे म्हणणे आहे.

केशव रक्त दुधाचे सेवन केल्याने काय परिणाम होतात?

केशरीयुक्त दुधाचे गरोदरपणात सेवन केल्याने त्याच्या आरोग्यास काही फायदे देखील होतात. तसं पाहायला गेलं, तर केशर हे आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी देखील आहे. गरोदरपणात केशरच सेवन केल्यामुळे महिलांचा असणारा तणाव बऱ्यापैकी कमी होत असल्याचं समोर आलं आहे. गर्भवती महिलांनी जर नियमितपणे केशर युक्त दुधाचे सेवन केल्यास, महिलांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. प्रसूती होत असताना केशरमुळे महिलांचा त्रास कमी होत असल्याचं देखील समोर आलं आहे.

एकीकडे केशर खाण्याचे हे काही फायदे सांगण्यात आले असले तरी, दुसरीकडे केसरच्या अति सेवनाने महिलांचा गर्भपात होण्याची देखील शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती समोर आली आहे. गरोदरच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये केसरच सेवन न केलेलं योग्य असल्याचं, या विषयाचे तज्ञ सांगतात‌. या सगळ्या गोष्टींचा विचार करता, तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केसरच सेवन करणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

Urine Colour Chart: लघवीच्या रंगावरुन समजते आजाराचे स्वरूप; जाणून घ्या लघवीच्या विविध रंगांविषयी..

Steel and Cement Rate: घर बांधण्याचे स्वप्न आता उतरणार सत्यात; स्टील आणि सिमेंटच्या दारात पुन्हा विक्रमी घसरण..

Chanakya niti: नैराश्यात आहात, चिंताग्रस्त आहात? काळजी करू नका; चाणाक्य नितीमधील या 3 गोष्टी बदलून टाकतील तुमचे आयुष्य..

Goat milk benefits: म्हशीचे नाही शेळीचे दूध आहे सर्वोत्तम! शेळीच्या दुधाचे हे 6 जबरदस्त फायदे पाहून तुम्हीही जाल चक्रावून..

Dangers Of Using GB WhatsApp: GB WhatsApp वापरण्याचे फायदे कदाचित तुम्हाला माहितही असतील, पण हे खतरनाक धोके जाणून तुम्हीही कराल त्वरीत बंद..

RBI Rule On Torn Note: जळालेल्या फाटलेल्या नोटा आता कुठल्याही बँकेत मिळणार बदलून; जाणून घ्या RBI चा नवा नियम..

Social media side effects: सोशल मीडियाचा वापरामुळे होतायत हे गंभीर शारीरिक आणि मानसिक आजार..

Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

Marriage Tips: या ६ पदार्थांचा आहारात करा समाविष्ट; लैंगिक क्षमता वाढून मिळेल भरपूर आनंद..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.