MTNL Plan: Airtel, Jio चा उठला बाजार! केवळ २२५ रुपयांमध्ये लाइफटाइम incoming outgoing देतेय ही कंपनी..
MTNL Plan: दिवसेंदिवस अनेक टेलिकॉम कंपन्या (telecom company) आपला रिचार्ज (recharge plan) वाढवत चालल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या काळात इन्कमिंग कॉलसाठी कोणत्याही टेलिकॉम कंपन्यांकडून कोणताही चार्ज आकारला जात नव्हता. मात्र हळूहळू प्रत्येकाने आपला चार्ज आकारायला सुरुवात केली. अनेक टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन प्रचंड महाग केल्यानंतर, जिओने (Jio) या क्षेत्रात आपलं पाऊल ठेवलं, आणि अनेकांचा बाजार उठला. जीओने सुरुवातीचा एक वर्ष अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग (unlimited voice calling) आणि अनलिमिटेड डाटा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रोव्हाइड केला. मात्र त्यानंतर Jio ने देखील आपले डाटा प्लान हळूहळू महाग करायला सुरुवात केली.
यापूर्वी अनेक जण फक्त इन्कमिंग कॉलसाठी मोबाईल फोनचा वापर करताना पाहायला मिळत होते. इनकमिंग कॉलसाठी कोणत्याही प्रकारचा चार्ज घेतला जात नसल्याने, अनेकजण याकडे आकर्षित झाले. मात्र आता इनकमिंग सुरू ठेवायचं असेल, तरीदेखील तुम्हाला चार्ज द्यावा लागतो. अनेक जण यामुळे प्रचंड वैतागल्याचं देखील पाहायला मिळतं. तुम्ही देखील या प्लॅनला वैतागला असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. कारण MTNL टेलिकॉम कंपनी आता केवळ २२५ रुपयांमध्ये लाईफटाईम इंकमिंग कॉलचा प्लॅन देत आहे. जाणून घेऊया सविस्तर.
MTNL Lifetime Validity Plan मुळे आता अनेक टेलिफोन कंपनीचे धाबे दणाणले आहेत. MTNL टेलिकॉम कंपनी ग्राहकांसाठी आता एकाहून एक भन्नाट प्लान सादर करत आहे. MTNL टेलिकॉम कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्लॅन उतरवले आहेत. मात्र या सगळ्या प्लॅनमध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेणार एक प्लॅन आहे. तो म्हणजे २२५ रुपयाचा लाईफ टाईम व्हॅलिडीटी प्लॅन. जर तुम्ही या प्लॅनने रिचार्ज केला, तर तुम्हाला लाईफ टाईम व्हॅलिडीटी प्लॅन बरोबरच इतरही अनेक बेनिफिट्स कंपनी देत आहे आपण त्याविषयी देखील जाणून घेऊया सविस्तर.
MTNL Rs 225 Plan:
MTNL टेलिकॉम कंपनीने आपले अनेक रिचार्ज प्लॅन उतरवले आहेत. जे इतर कोणत्याही टेलिकॉम कंपनीपेक्षा खूप कमी किंमतीत ग्राहकांना मिळणार आहेत. मात्र या सगळ्यात ग्राहकांबरोबरच इतर टेलिकॉम कंपनीचे देखील लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात MTNL टेलिकॉम कंपनीला यश आले आहे. 225 रुपयाच्या रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना तब्बल 100 व्हॉईस कॉलिंग देते. महत्वाचे म्हणजे यासोबतच MTNL टेलिकॉम कंपनी ग्राहकांना सिमकार्डची व्हॅलिडीटी आणि इनकमिंग आयुष्भरासाठी देते.
२२५ च्या रिचार्ज प्लॅनमध्ये आयुष्भर इनकमिंगबरोबरच १०० मिनिटे देखील देते. व्हाइस कॉलिंगसाठी याचा चार्ज हा २ पैसे प्रति सेकंद असणार आहे. त्याचबरोबर व्हिडिओ कॉलसाठी ६० पैसे प्रति मिनिट चार्ज आकारला जाणार आहे. तर एसएमएस करिता पन्नास पैसे चार्ज आकारला जाणार आहे. डाटा प्लॅनचा विचार करायचा झाल्यास एका MB साठी तीन पैसे चार्ज लागणार आहे. हे चार्ज तुम्हाला थोडेसे महाग वाटू शकतात. मात्र लाइफ टाईम इन्कॉमिंगसाठी हा प्लॅन खूप उपयुक्त ठरणार आहे.
MTNL टेलिकॉम कंपनीने बाजारात उतरवलेल्या 225 रुपयांच्या प्लॅनला टक्कर देणारा दुसरा कोणताही प्लॅन अनेक नामांकित टेलिकॉम कंपन्यांकडे उपलब्ध नाही. साहजिकच यामुळे अनेकांचं लक्ष या टेलिकॉम कंपनीने आपल्याकडे वेधून घेतलं आहे. Airtel, Jio, Vi त्याचबरोबर सरकारी कंपनी असणारी BSNL अशा सर्व टेलिकॉम कंपन्यांचा MTNL ने बाजार उठवला आहे. लाइफटाइमच्या वैधतेसह येणार हा प्लान कोणाकडेही नाही. याचा कॉलिंग आणि डाटा प्लॅन महाग असला, तरी तुम्ही या सिम कार्डचा सेकंडरी सिम कार्ड म्हणून वापर करून मोठी बचत करू शकता.
हे देखील वाचा Jio Plans: Jio च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये आता ग्राहकांना पाहता येणार मोफत Netflix, Amazon Prime, Disney + Hotstar
खोकला उपाय: खोकल्यासाठी हे पाच घरगुती उपाय आहेत रामबाण औषध..
Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..
Hairstyle: हेअर स्टाईल वरून समजते मुलींचे व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव..
Government Scheme: या शेतकऱ्यांना सरकारकडून दिले जातेय ५० हजारांचे अनुदान; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.