HPCL Recruitment 2022: ‘या’ विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना केली जाणार निवड..

0

HPCL Recruitment 2022: बेरोजगारी (unemployment) आणि महागाई (Inflation) दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने, अनेकांना नोकरीची (job)आवश्यकता आहे. मात्र अनेक क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध नसल्याने, अनेकांना उच्च शिक्षण घेऊन देखील बेरोजगारच राहावं लागत असल्याचे चित्र सगळीकडेच पाहायला मिळत आहे. मात्र आता हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अनेकांसाठी ही मोठी सुवर्णसंधी असून इच्छुकांनी २२ जूलै पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.

उच्च शिक्षण घेऊन देखील अनेक तरुण बेरोजगार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेकजण कुठेतरी चार पैशाची नोकरी कशी मिळेल? जो तो याचाच विचार सातत्याने करताना पाहायला मिळतोय. मात्र अनेकांना जॉब मिळत नसल्याने बेरोजगार म्हणूनच, राहावं लागत आहे. काही क्षेत्रात नोकरीच्या अधिसूचना निघत असून देखील अनेकांना याविषयी माहिती नसल्याचे पाहायला मिळत आहे. आणि म्हणून महाराष्ट्र लोकशाही नेहमी तरुणांसाठी नोकरी संदर्भात माहिती घेऊन येते.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Hindustan Petroleum Corporation Limited, HPCL) या कंपनीने विविध पदांसाठी भरती घेण्याचा निर्णय घेतला असून, या संदर्भात अधिसूचना देखील काढली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत ऑफिसर, इंजिनीअरिंग, या महत्वाच्या पदांबरोबरच अनेक पदे भरण्यात येणार असल्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही भरती प्रक्रिया संगणकाच्या आधारे चाचणी घेऊन राबवण्यात येणार आहे. संगणक चाचणी, ग्रुप टास्क, आणि मुलाखतीतून पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Hindustan Petroleum Corporation Limited, HPCL) मध्ये नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांना आपला रेझ्युमे द्यावा लागणार आहे. याबरोबच दहावी, बारावी प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला देखील उमेदवारांना अर्जासोबत जोडावी लागणार आहे. याबरोबरच कॅटेगरी मधून अर्ज करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांनी जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे. ओळखपत्र म्हणून, उमेदवारांना आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो जोडणे आवश्यक आहे.

अर्ज शुक्ल आणि वयोमर्यादा 

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Hindustan Petroleum Corporation Limited, HPCL) या कंपनीत नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांच्या वयाचा विचार करायचा झाल्यास, मॅनेजर या पदासाठी उमेदवाराचे वय ३४ ठेवण्यात आले आहे. तर एचआर या पदासाठी वयाची मर्यादा २७ वर्ष ठेवण्यात आली आहे. तर कायदा ऑफिसर या पदाकरीता वयाची मर्यादा २६ वर्ष ठेवली आहे. सिनियर मॅनेजर आणि मॅनेजर या पदासाठी अनुक्रमे ३७ आणि ३४ वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Hindustan Petroleum Corporation Limited, HPCL) या कंपनीत नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी अर्जाची फी ११८० रुपये ठेवण्यात आली आहे. ही फी ओपन कॅटेगरी उमेदवारांना लागू होणार आहे. मात्र SC, ST तसेच PWD च्या उमेदवारांना यामधून सवलत दिली गेली आहे. शुल्काबरोबरच वयाची मर्यादा देखील सरकारी नियमानुसार देण्यात आली आहे. अधिसूचना पाहण्यासाठी तुम्ही यावर क्लिक करा.

असा करा अर्ज

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Hindustan Petroleum Corporation Limited, HPCL) मध्ये सरकारी नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील क्रोमवरून https://www.hindustanpetroleum.com/job-openings असं सर्च करायचं आहे. हे सर्च केल्यानंतर तुमच्या समोर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची अधिकृत वेबसाईट ओपन झालेली असेल.

यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर, तुम्हाला ज्या विभागात नोकरी करायची आहे आणि ज्या विभासाठी तुम्ही पात्र आहे, तो विभाग निवडायचा आहे. तुम्ही तुम्हाला हवा असणारा विभाग तुम्ही निवडल्यानंतर, ‘अप्लाय’ या नावाचा आणखी एक पर्याय पाहायला मिळेल, तुम्ही बरोबर त्यावर क्लिक करायचं आहे. ‘अप्लाय’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्ही सविस्तर माहिती भरून फ्रॉम डाऊनलोड करू शकता. अर्ज करण्याची मुदत २३ जून ते २२ जुलै ठेवण्यात आली आहे. यावर क्लिक करून अर्ज करू शकता..

हे देखील वाचा India Post Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांना भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी..

Today Steel Rate: घर बांधणाऱ्यांसाठी गोड बातमी, स्टील सिमेंट झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे दर..

Vastu Tips: चुकूनही घराजवळ लावू नका ही चार झाडे, अन्यथा होईल सत्यानाश..

Viral video: वाघाच्या तीन बछड्यांना माकडाने दूध पाजून सांभाळलं, पण बछड्यांनी..

Edible Oil Price: गोड बातमी! खाद्यतेल अजून एवढ्या रुपयांनी झाले स्वस्त, आहे कारण..

Amazon Prime Day Sale 2022: अमेझॉनवर मान्सून ऑफरचा धुमधडाका! स्मार्टफोनसह या वस्तूंवर तब्बल ५५ टक्क्यांपर्यंत सूट..

UPI Pin Change: या सोप्या पद्धतीने बदला UPI पिन, आणि भविष्यातील धोक्यापासून स्वतःला वाचवा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.