Mystery: आमदार, खासदार मंत्री यांच्यासाठी एक जून आहे खूपच खास; ‘हे’ आहे यामागचं रहस्य..
Mystery: एक जून म्हटलं की नवीन ऋतू चालू झाला. उन्हाळ्याच्या तावडीतून सुटुन लोक पावसाची वाट बघत असतात. शेतकरी राजा देखील पावसाची आतुरतेने वाट पहात असतो. जून महिन्यामध्ये बऱ्यापैकी लोकांना विशेषता दुष्काळग्रस्त किंवा ज्या ठिकाणी पाऊस खूप कमी प्रमाणात पडतो, त्या ठिकाणच्या लोकांना पावसाची आतुरतेने वाट पहावी लागते. कारण बऱ्याच भागामध्ये मार्च, एप्रिल आणि मे या काळात पाण्यासाठी वणवण करावी लागते. तसेच पाऊस पडल्यामुळे शेतीची कामे मार्गी लागत असतात. त्यासह माळरानावरील लोकांना हिरवळ पाहायला मिळते. त्यामुळे किमान ग्रामीण भागातील लोकांना थोडासा आधार मिळतो. चला तर आपण आपल्या मूळ विषयाकडे जाऊया.
खरे पाहता पूर्वीच्या काळामध्ये जर आपण डोकावून पाहिले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. बऱ्याच लोकांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. बऱ्याच लोकांना लिहिण्या वाचण्या पुरते देखील शिक्षण घेता आले नाही. बर्याच लोकांची परिस्थिती शिक्षण घेण्याची होती, परंतु घरच्यांनी शेतातली कामे कोण करणार म्हणून आपल्या मुलांना शाळा शिकण्यासाठी मज्जाव घातल्याचे देखील आज ज्येष्ठ मंडळी सांगत असतात. त्या मानाने आज साक्षरतेचे प्रमाण बऱ्याच अंशाने सुधारलेले आहे. शासन देखील या बाबतीत गांभीर्याने काम करत आहे. प्रत्येक मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.
एक जून पासून पावसाळ्याला सुरुवात होते. खरतर एक जून हा दिवस अनेक लोकांसाठी महत्त्वाचा आहे. यामध्ये अनेक शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासह राजकीय नेते आमदार खासदार यांचा देखील यामध्ये समावेश होतो. कधीकधी गमतीने एक जूनला राष्ट्रीय जन्मदिवस दिन असेदेखील बोलले जाते. 15 जून ला दरवर्षी शाळा भरत असते. त्याच पार्श्वभूमीवर बऱ्याच लोकांना आपल्या मुलांच्या जन्मतारखा माहिती नव्हत्या. ज्यावेळी 15 जून ला शाळेमध्ये आपल्या मुलाचा पहिली मध्ये प्रवेश करताना पालकांना जन्मतारीख सांगता येत नसल्याने मग शाळा गुरुजी एक जून ची जन्मतारीख टाकून देत मुलाचा प्रवेश करत असत.
आज हीच गोरगरिबांची मुले काही अधिकारी असतील, तर काही राजकारणामधील नेते मंडळी असतील, आमदार, खासदार यांच्या देखील जन्मतारखा त्यांच्या कुटुंबियांना माहिती नसल्यामुळे 1 जून ते 10 जून पर्यंत च्या बऱ्याच तारखा पहिल्या शाळा मास्तरांनी अंदाजे लिहिलेल्या आहेत. बऱ्याच लोकांचे या दिवशी वाढदिवस असतात. जर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत असाल. फेसबुकचा जर तुम्ही वापर करत असाल तर तुमच्या फेसबुक मित्रांच्या वाढदिवसाच्या सूचना तुम्हाला येत असतात. यामध्ये आपण जर पाहिले तर तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल की, बऱ्याच लोकांचा वाढदिवस एक जूनला आहे.
हे देखील वाचा Viral video: तीन सिंह मगरीची शिकार करण्यासाठी तलावात घुसले, पण एकटी मगर पडली सगळ्यांवर भारी; काय झालं शेवटी? पहा हा व्हिडिओ..
Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..
Lifestyle: पुरुषांच्या या चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम