आपल्या नवऱ्याला जी’वे ‘मा’रण्यासाठी पत्नीनेच रचला डाव, शेवटी ‘असा’ झाला उलगडा..

0

सोलापूर: आजकाल बऱ्याच ‘अ’नैतिक संबंधातून आपल्याला अडचण ठरत असल्याने पतीचा किंवा पत्नीचा ‘का’टा काढल्याच्या घटना काही नवीन नाहीत. सात फेरे मारून ज्या नवरा बायकोने पुढील सात जन्माची गाठ बांधली. तेच अशा प्रकारामुळे एकमेकांच्या मुळावर उठेलेले पाहायला मिळत आहेत. कायद्यानुसार ‘अ’नैतिक संबंध ‘गु’न्हा ठरत नाही. परंतु एकमेकांना अडसर ठरत असल्याने जीवे मारण्याचा प्रयत्न करणे हा किती मोठा ‘गु’न्हा आपण करत आहोत, हे ती व्यक्ती विसरून जात असतो.

 

असाच एक प्रकार माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर गावात घडला आहे. माळशिरस पोलिसांच्या आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या तत्परतेने चोवीस तासांच्या आत या ‘गु’न्ह्यातील ‘आ’रोपींचा छडा लावण्यात आला आहे. इस्लामपूर ता. माळशिरस येथील शेतकरी मारुती बलभीम पवार (वय ४५) आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी रात्री शेतात गेले होते. ते शेतात एकटेच होते. १३/०५/२०२२ रोजी पहाटे त्यांच्यावर अज्ञात इसमाने जबरी ‘ह’ल्ला केला. या ‘ह’ल्ल्यात मारुती बलभीम पवार गंभीर जखमी झाले. माळशिरस पोलीस ठाण्यात कलम 307 अन्वये रजिस्टर नंबर 283/2022 हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांची तपास यंत्रणा कामाला लागली. मारुती पवार यांची पत्नी रेश्मा मारुती पवार (वय ३२) हीचे वर्तन पोलिसांना ‘सं’शयास्पद आढळून आल्याने पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर तीच ह्या ‘गु’न्ह्यातील ‘आ’रोपी असल्याचे उघड झाले. पत्नी रेश्मा पवार हीनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा ‘का’टा काढण्याचा डाव आखला होता. तिचा प्रियकर विठ्ठल दत्तू हुलगे (वय २१) रा. गोरडवाडी ता. माळशिरस ह्याने रेश्मा पवारने सांगितल्याप्रमाणे १३/०५/२०२२ रोजी शेतात जाऊन मारुती पवारचा ‘का’टा काढण्याच्या उद्देशाने डोक्याला व पायावर जबरी ‘मा’रहाण केली आहे. यात मारुती पवार हे गंभीर जखमी झाले आहेत.

 

‘आ’रोपी रेश्मा मारुती पवार रा. इस्लामपूर, विठ्ठल दत्तू हुलगे रा. गोरडवाडी पवार या दोघांना ‘अ’टक करण्यात आली असून सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षका तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरत्न गायकवाड हे करीत आहेत. सदर घटनेने माळशिरस तालुका हादरला आहे. पती व पत्नीच्या पवित्र नात्याला काळीमा फासून आपल्या नवऱ्यालाच ‘जी’वे मारण्याचा प्रयत्न केल्याने विश्वास ठेवायचा तरी कोणावर? आपल्या आयुष्याचा जोडदारच आपला धोका बनला असेल तर मग काय करणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या: Driving License: सरकारचा महत्वपूर्ण निर्णय! Driving License काढण्यासाठी आता RTO ऑफिसला जाण्याची गरज नाही.. 

one nation one ration card: सरकारचा मोठा निर्णय! रेशनकार्ड धारकांनो ३० जूनपर्यंत करा हे काम अन्यथा रेशन होईल बंद.. 

Sharad Pawar: खाऊन फुकटचं घबाड, वाकडं झालं तुझं थोबाड केतकीने केलेली विकृत कविता वाचून तुमचाही होईल संताप.. 

WhatsApp : व्हाट्सअपवर चूकूनही ‘हे’ मेसेज पाठवू नका, अन्यथा खाली लागेल जेलची हवा.. 

Agriculture: केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! पीएम किसान लाभार्थ्यांना आता सहा ऐवजी अकरा हजार मिळणार.. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.