नथुराम पाटीलबुवा गिते विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, होळ च्या चेअरमनपदी श्री.सिद्धार्थ गिते, तर व्हा चेअरमनपदी श्री. पंकज निलाखे

0

बारामती तालुक्यातील सगळ्यात मोठ्या असलेल्या विकास सोसायट्यांपैकी एक असलेली होळ गावातील नथुराम पाटीलबुवा गिते विकास सोसायटीची निवडणूक पार पडली. विशेष म्हणजे ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. सोसायटीच्या चेअरमनपदी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे १४ वर्ष संचालक राहिलेले व माजी व्हाईस चेअरमन आणि सहकारातील तगडे अभ्यासक असलेलं व्यक्तिमत्त्व श्री. सिद्धार्थ (भाऊ) उदयकुमार गिते यांची निवड झाली आहे. तर श्री. पंकज निलाखे यांची व्हा. चेअरमनपदी वर्णी लागली आहे. पंकज निलाखे गेल्या 2 टर्म देखील सोसायटीच्या संचालक मंडळात होते.

 

श्री.एकनाथ सोपान होळकर, मनोज दत्तात्रय होळकर, सागर तानाजी वायाळ, सुधाकर शिवाजी कांबळे, सिंधू मारुती होळकर, स्नेहा सिद्धार्थ गिते, राजेंद्र नारायण कदम, हिंदुराम शिवराम शिंदे, महेश नारायण कारंडे, प्रमोदकुमार नथुराम गिते, तानाजी तात्याबा वायाळ यांची सोसायटीच्या संचालक पदी बिनविरोध वर्णी लागली आहे. यावेळी नथुराम पाटीलबुवा गिते विकास सोसायटीचे सर्व आजी माजी संचालक, होळचे तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय उर्फ बाबा होळकर , प्रेरणा युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष नवनाथ होळकर, माजी ग्रामपंचायत सदस्य बच्चन आटोळे , सोसायटीचे सचिव सोनबा होळकर , व्यवस्थापक मनोहर कारंडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

नथुराम पाटीलबुवा गिते विकास सोसायटीची स्थापना सन 1967 साली कै .नथुराम गिते यांनी त्यांचे मित्र कै.यशवंतराव चव्हाण साहेब मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नावाने यशवंत वि.का.से. सह सोसायटीच्या नावाने स्थापन केली होती. कालांतराने सन २०१३ कै .नथुराम आण्णा गिते यांच्या निधनानंतर सोसायटीचे नामकरण सर्व सभासदांच्या मागणीमुळे नथुराम पाटीलबुवा गिते विकास सोसायटी असे देण्यात आले. ही सोसायटी बारामती तालुक्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या सोसायट्यांपैकी एक आहे. पुर्वीपासून स्वभांडवलातून सभासदांना कर्जवाटप करणारी ही एकमेव संस्था होती. नंतर नथूराम गिते सोसायटीचे संस्थापक चेअरमन श्री.शांताराम दादा होळकर हे जिल्हा बँकेत संचालक झाल्यानंतर पुणे जिल्हा बँकेचे कर्ज घोण्यास सुरवात झाली. जवळपास एक हजारच्या आसपास सोसायटीचे सभासद आहेत. सोसायटी जवळपास 8 कोटींच्या आसपास सभासदांना कर्जवाटप करते. होळ, सदोबाचीवाडी, सस्तेवाडी हे सोसायटीचे कार्यक्षेत्र आहे.

 

नथुराम पाटीलबुवा गिते विकास सोसायटीच्या इतिहासात डोकावले तर कै. नथुआण्णा गिते आणि श्री.शांताराम दादा होळकर यांचे या सोसायटीमध्ये फार मोठे योगदान आहे. या दोन सहकारातील महामेरुंनी या सोसायटीसाठी खूप मेहनत घेतली आहे. आण्णांनी आमच्या दारात वसुलीची गाडीच कधी येऊ दिली नाही. स्वतःच्या खिशातून पैसे टाकून अण्णांनी आमचे कर्ज भरले आहे असे स्थानिक सभासद व शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आज ही विकास सोसायटी प्रगतीपथावर आहे. सोसायटीचे चेअरमन श्री.सिद्धार्थ (भाऊ) उदयकुमार गीते हे देखील कै. नथू आण्णा गीते यांचा वारसा उत्तमपणे चालवत असल्याचे सोसायटीच्या सभासदांनी सांगितले.

बारामती तालुक्यातील घडामोडी मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा. 

https://chat.whatsapp.com/Fvto2o9kLop4aZHN4yowqU

हेही वाचा: Ration Card: आता या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय   

Viral video: मृत्यूच्या जाळ्यातून आईने वाचवलं लेकरू; मन सुन्न करणारा हा व्हिडिओ एकदा पहाच.. 

MahaGenco Recruitment: महाराष्ट्र राज्याच्या विद्युत कंपनीत मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स आणि करा असा अर्ज.. 

Viral video: अटक कराय गेले अन् आरोपींसोबतच मटन खाऊन आले; खाकी वर्दीला काळिमा फासणारी घटना..

Viral video: स्टोअर रुममध्ये सेक्स करताना मुख्याध्यापक आणि शिक्षिकेला गावकऱ्यांनी पकडले रंगेहाथ; तो व्हिडिओही झाला व्हायरल.. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.