तुम्ही ‘हे’ करत राहिला तर भारताची देखील श्रीलंकेसारखी अवस्था; नरेंद्र मोदींना तोंडावरच अधिकाऱ्याने झापलं..

0

Narendra Modi meeting: श्रीलंकेला सध्या परकीय चलनाच्या मोठ्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. परकीय चलनाच्या तुटवड्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्याने, श्रीलंकेतील (Shri Lanka) लोक भुकेने मरतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अन्न, इंधन, वीज आणि गॅसच्या मोठ्या तुटवड्याचा सर्वसामान्यांना सामना लागत असल्याने, जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र आता ही परिस्थिती भारतात देखील निर्माण होऊ शकते, असं विधान एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या एका बैठकीत केल्याने, देशात एकच खळबळ उडाली आहे.

एकीकडे श्रीलंकेने आपल्याला मदत करण्याचे आव्हान अनेक देशांना केले आहे. श्रीलंकेवर आता एवढी वाईट वेळ आली आहे की, आर्थिक मदतीसाठी त्यांनी आपल्या मित्र देशांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. श्रीलंकेत सध्या दररोज अनेक तास वीज कपात देखील केली जात आहे. जगातील इतिहामधील सर्वात मोठ्या महागाईला श्रीलंकन नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. श्रीलंकेतील परिस्थिती आता हाताबाहेर गेलेली पाहायला मिळत असून, जीवनावश्यक वस्तू आता मिळणं अवघड झालं आहे. सर्वसामान्य आता भुकेने  मरण्याची पूरस्थिती निर्माण झाली असून, हजारो लोक रस्त्यावर उतरून निदर्शने देखील करत आहेत.

सरकारच्या विरोधात निदर्शनं करणाऱ्या जवळपास साडेसहाशे लोकांना सरकारने ताब्यात देखील घेतले. 36 तासांच्या संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारकडून ही कारवाई करण्यात आली. कर्फ्युमुळे कोलंबो शहरातील सर्व गाड्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पाहायला मिळत होत्या. रस्त्यांवर कोणीही पाहायला मिळत नव्हते. कोलंबो शहरात ठिकठिकाणी पोलीस आणि लष्कराचे जवान तैनात होते. मात्र तरीदेखील सर्वत्र निदर्शने करण्यात आली, आणि लोकांनी तोडफोड देखील केल्याचे पाहायला मिळाले.

मात्र आता अशीच परिस्थीत भारतात देखील निर्माण होऊ शकते. असं एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने म्हंटले आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी हे विधान केले आहे. हे विधान करताना त्यांनी याचे कारण देखील सांगितले आहे. जर भारत सरकारने नागरिकांना मिळत असणाऱ्या मोफत योजना बंद केल्या नाहीत, तर आपल्याला देखील अशाच महागाईचा सामना करावा लागेल, असं म्हटले आहे.

गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारने शेतकरी आणि सर्वसामान्यांना प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी मोफत योजना सुरू केल्या. पी एम किसान योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यासोबतच  प्रती माणशी पाच किलो मोफत धान्य याप्रमाणे वाटप करण्याचा निर्णय घेतला. याचा प्रत्यक्ष लाभ भारतीय जनता पार्टीला नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांत झाल्याचे देखील पाहायला मिळाले.

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधन दर वाढ होत असल्याने, देशातील सामान्य नागरिक त्रस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे इंधनाचा दर जवळपास १२० रुपयाच्या आसपास पोहचले असल्याने, सर्वसामान्य संतापल्याचे चित्र संपूर्ण देशभर आहे. महागाई, बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस ढासळत असल्याने, अनेकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत लोकांना रोजगार निर्माण करण्याऐवजी केंद्र सरकार नागरिकांना मोफत सुविधा देत असल्याने अर्थव्यवस्था आणखीन ढासळत असल्याचं बोललं जात आहे.

नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत देखील वरिष्ठ अधिकाऱ्याने या योजनांचा फटका देशाच्या काही राज्यांना बसणार आहे. साहजिकच त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसून देशात महागाई वाढू शकते. असे स्पष्ट मत नोंदवलं असल्याचं समोर आले आहे. केंद्र सरकारने या योजना वेळेतच बंद केला नाहीत, त्याच बरोबर या संदर्भात काही  ठोस उपाय योजना केल्या नाहीत, तर आपल्या देशाची अवस्था श्रीलंकेप्रमाणे होऊ शकते. अशी चिंता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केल्याची माहिती मिळत असल्याने, एकच खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा खत: तुमच्या मोबाईलवर असा चेक करा जवळच्या दुकानात खतांचा किती स्टाॅक शिल्लक आहे, आणि उठवा दुकानदाराचा बाजार..

Samsung Galaxy M33 5G: सॅमसंगने आत्तापर्यंतचा सर्वोत्तम फोन केला लॉन्च; किंमत,फिचर्स, कॅमेरा जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Viral video: दोन वर्षाच्या लहान मुलीचं आणि माकडाचं मोबाईलवरून जबरदस्त भांडण; व्हिडिओ पाहून, तुम्हीही व्हाल लोटपोट..

Viral video: झाडावरून नदीत उडी घेत, जग्वारने केली मगरीची शिकार; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल..

Viral video: पाच किलो आट्याचं पीठ मागणारं पोरगं रातोरात स्टार झालं; कहानी आणि व्हिडीओ पहा एका क्लिकवर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.