E Shram Card: केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय! ‘ई-श्रम कार्ड’ धारकांना मिळणार दोन लाख रुपये..

E Shram Card: घरबसल्या तुमच्या मोबाईलवर 'असं' काढा 'ई-श्रम कार्ड' आणि दोन लाखांपर्यंत मदत मिळवा; काय आहेत याचे फायदे? जाणून घ्‍या संपूर्ण माहिती तुमच्या भाषेत..

0

E shram card: असंघटित क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या मजुरांचा एक राष्ट्रीय स्तरावर डेटाबेस तयार करता यावा, यासाठी भारत सरकारन एक वेबसाइट तयार केली आहे. जे कामगार या वेबसाईटवर आपली नोंदणी करणार आहेत, अशा कामगारांना मग ते कोणत्याही क्षेत्रात काम करत असो, दोन लाखाहून अधिक लाभ मिळणार असल्याचं केंद्र सरकारने म्हटले आहे. विशेष म्हणजे भारत सरकारच्या रोजगार मंत्रालयाने आत्तापर्यंत देशातून 25 कोटीहून अधिक कामगारांनी या वेबसाईटवर आपली नोंदणी केली असल्याचे देखील म्हटले आहे. मात्र जर अजूनही तुम्ही ई-श्रम कार्ड काढलं नसेल तर, ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

‘ई-श्रम’ पोर्टल म्हणजे काय? याचे काय काय फायदे आहेत? ई-श्रम या वेबसाईटवर जाऊन ई-श्रम कार्ड कसं काढायचं? याविषयीची सगळी माहिती आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण ई-श्रम कार्ड काय ते पाहू…

ई-श्रम कार्ड पोर्टल म्हणजे काय? आणि कोण अर्ज करु शकतं.

राष्ट्रीय स्तरावर एक डेटाबेस तयार करण्याकरीता भारत सरकारच्या रोजगार मंत्रालयानं ई-श्रम नावाची वेबसाईट काढली आहे. जे कामगार या वेबसाईटवर आपली नोंदणी करणार आहेत, अशांना ई श्रम कार्ड दिले जाणार आहे.
मग तुम्ही देशातल्या कुठल्याही असंघटित ठिकाणी काम करत असाल, तरी देखील तुम्हाला या कार्डसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी तुम्ही बांधकाम क्षेत्रातील कामगार असणं आवश्यक आहे. तसेच तुम्ही स्थलांतरित मजूर असाल, फेरीवाले असाल, घर कामगारही असाल, त्याच बरोबर स्थानिक रोजगार म्हणूनही काम करत असाल, तरी देखील तुम्हाला ई-श्रम कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे. आणि हो तुम्ही भूमिहीन शेतमजूर असाल तरी देखील, तुम्हाला हे कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

                         वयाची मर्यादा

जसं की आपल्याला माहिती आहे, कुठल्याही क्षेत्रात वयाचा नेहमी विचार केला जातो, हे कार्ड मिळवण्यासाठी देखील तुम्हाला वयाची अट घालण्यात आली आहे. हे कार्ड मिळवण्यासाठी तुमचं वय 16 ते 59 या दरम्यान असणं आवश्‍यक आहे. देशातल्या असंघटित कामगारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी या पोर्टलची निर्मिती करण्यात आली असल्याने, हे कार्ड मिळवण्यासाठी कुठलाही सरकारी नोकर तसेच आयकर भरणारा व्यक्ती अर्ज करू शकणार नाही, ही देखील गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. आता आपण ई-श्रम कार्ड ऑनलाईन कसं काढायचं ते पाहूया…

असं काढा ई-श्रम कार्ड ऑनलाईन

ई-श्रम कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर क्रोमवर जाऊन ‘e shram’ असं सर्च करायचं आहे. हे सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ‘e shram ही अधिकृत वेबसाइट ओपन झालेली दिसेल. वेबसाइट ओपन झाल्यानंतर, या वेबसाईटच्या उजवीकडे Register on e-shram नावाचा रकाना पाहायला मिळणार आहे. तुम्हाला बरोबर Register on e-shram यावरच क्लिक करायचं आहे.

इथपर्यंत सगळी प्रोसेस झाल्यानंतर, तुम्हाला Self Registration हा रकाना दिसेल. तुम्हाला या रकान्यामध्ये, तुमच्या आधारशी जो मोबाईल लिंक आहे, तोच मोबाईल क्रमांक तुम्ही या रकान्यात टाकायचा आहे. या रकान्यात मोबाईल नंबर टाकल्यानंतर, तुम्हाला पुढे एक कॅप्चा नावचा रकाना दिसेल. त्यात तुम्हाला आकडे किंवा अक्षर पाहायला मिळतील, ती अक्षर तुम्ही बरोबर या रकान्यात टाकायची आहेत. हे सगळं केल्यानंतर तुम्हाला, EPFO आणि ESIC यांचे सदस्य नाही म्हणायचं आहे. म्हणजेच या दोन्ही पर्यायापुढे तुम्हाला NO या पर्यायावर क्लिक करायचं आहे. नो या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मग सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

इथपर्यंत सर्व प्रोसेस व्यवस्थित झाली असेल तर, तुम्हाला मोबाईलवर ओटीपी आलेला दिसेल. मोबाईलवर आलेला ओटीपी तुम्ही समोर दिसणाऱ्या रकान्यात टाकायचा आहे. समोर दिसणाऱ्या रकान्यात मोबाईलवर आलेला ओटीपी टाकल्यानंतर, सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.
हे सगळं केल्यानंतर, तुम्हाला समोर दिसणाऱ्या रकान्यात, तुमचा आधार नंबर टाकणं आवश्यक आहे. तुम्ही तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर, कॅप्चामध्ये तुम्ही योग्य अक्षरे किंवा आकडे असतील, ती लिहून कॅप्चा पूर्ण करायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला नोंदणी संदर्भात अटी मान्य असल्यास, बरोबरची टिक करावी लागणार आहे. हे केल्यानंतर तुम्ही सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. ही सगळी प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ओटीपी आलेला दिसेल. आलेला ओटीपी तुम्ही बरोबर validate पर्यायावर टाकून क्लिक करणं आवश्यक आहे.

इथपर्यंत तुम्ही योग्य प्रोसेस केली असेल, तर तुम्हाला तुमच्या समोर असणाऱ्या स्क्रीनवर तुमच्या आधार कार्डचे डिटेल्स दिसणार आहेत. तुमच्या आधार कार्डच्या डिटेल्सच्याखाली ही माहिती बरोबर आहे, या रकान्यात तुम्हाला खूण करायची आहे. यानंतर तुम्हाला समोर दिसणार्‍या पर्यायावर म्हणजेच, continue to other details या पर्यायावर क्लिक करणं आवश्यक आहे. इथपर्यंत प्रोसेस झाल्यानंतर, तुम्हाला तुमची पर्सनल सगळी माहिती समोर दिसणाऱ्या रकान्यात भरायची आहे. यामध्ये तुम्हाला लग्न झालं आहे की नाही, वडिलांचे नाव, तसेच तुमचा प्रवर्ग, अपंग असल्यास Yes किंवा No अशी सगळी व्यवस्थित माहिती भरणे आवश्यक आहे.

इथपर्यंत सगळे प्रोसेस झाल्यानंतर, तुम्हाला आता नॉमिनीचे डिटेल्स टाकणे आवश्यक आहे. नाव, जन्मतारीख, लिंग आणि तुमच्यासोबत त्याचं काय नात आहे, ते नातं टाकून मग, तुम्हाला save and continue या पर्यायावर क्लीक करून पुढे जाणं आवश्यक आहे. यासंदर्भात तुम्हाला तुमच्या खात्याची सगळी माहिती समोर दिसणाऱ्या रकान्यामध्ये भरायची आहे. यात तुम्हाला सर्वप्रथम राज्य जिल्हा आणि तुम्ही सध्याचा राहत असणारा पत्ता, जर तुम्ही शहरी भागात असाल, तर तुम्हाला urban आणि ग्रामीण भागात असाल तर rural हा पर्याय निवडावा लागणार आहे. हि प्रोसेस झाल्यानंतर, तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, पिनकोड टाकणं आवश्यक आहे.

इथपर्यंत सगळी प्रोसेस झाल्यानंतर, तुम्हाला कोणत्या ठिकाणी किती वर्षे राहात आहे, ते तुम्हाला सांगावं लागणार आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला समोर दिसणार्‍या पर्यायांमध्ये तुमचा परमनंट पत्ता टाकावा लागणार आहे. यामध्ये देखील तुम्हाला, urban आणि rural हा पर्याय निवडावा लागणार आहे. तसेच समोर दिसणाऱ्या पर्यायांमध्ये घर क्रमांक, राज्य, जिल्हा, तालुका आणि तुमचा पिनकोड टाकणं आवश्यक आहे. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला, save and continue वर क्लिक करणं आवश्यक आहे.

क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर शैक्षणिक विषयीची माहिती असणारा रकाना ओपन झालेला दिसेल, त्यात तुम्हाला शैक्षणिक विषयाची सगळी माहिती व्यवस्थित भरायची आहे. यात तुम्हाला सर्वप्रथम तुमचं शिक्षण नंतर मग तुम्ही महिन्याला किती रुपये कमवता आकडाही समोर दिसणाऱ्या रकान्यात तुम्हाला टाकावा लागणार आहे. इथपर्यंत सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला, save and continue यावर क्लिक करणं आवश्यक आहे.

यानंतर तुम्हाला,ऑक्युपेशन तसेच स्किल हे पर्याय दिसतील. या पर्यायावर प्रायमरी ऑक्युपेशमध्ये तुम्ही आता काय व्यवसाय करताय, याची माहिती देणं आवश्यक आहे. सोबतच किती वर्षांचा अनुभव आहे, तो आकडा निवडायचा आहे. याव्यतिरिक्त काही करत असाल, तर ती माहिती देखील तुम्ही दुसऱ्या ऑक्युपेशमध्ये भरायची आहे. ही सगळी माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुम्ही save and continue या पर्यायावर क्लिक करणं आवश्यक आहे.

जर तुम्ही आत्तापर्यंत सगळी प्रोसेस व्यवस्थित केली असेल तर त्यांच्यासमोर बँक डीटेल्स हा पर्याय ओपन झालेला दिसेल. जर तुमच्यासमोर बँक डिटेल्स हा पर्याय ओपन झालेला नसेल, तर तुम्ही वरती दिलेली सर्व माहिती पुन्हा एकदा वाचणं आवश्यक आहे. बँक डिटेल्स या पर्यायात तुम्हाला, तुमचे सगळे बँक डिटेल्स व्यवस्थित टाकायचे आहेत. बँक डिटेल्समध्ये तुम्हाला तुमच्या बँकेचा खाते क्रमांक, तसेच खातेदाराचे नाव, बँकेचा आयएफएससी कोड, बँकेचं नाव सोबत शाखेचं नाव टाकायचं आहे. तुम्ही टाकलेली माहिती एकदा कन्फर्म करून घ्या. माहिती टाकल्यानंतर तुम्हाला save and continue या पर्यायावर क्लिक करावं लागणार आहे.

save and continue या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन झालेलं दिसेल. या पेजमध्ये तुम्हाला तुम्ही नोंदणी करताना जी माहिती भरली होती ती सर्व माहिती एकाच ठिकाणी दिसणार आहे. तुम्ही भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का? हे एकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे. जर तुम्ही भरलेली सर्व माहिती बरोबर असेल तर, तुम्हाला मी भरलेली माहिती बरोबर आहे. असा एक पर्याय दिसेल, या पर्यायावर टच करायचं आहे. आणि मग शेवटी तुम्हाला सबमिट पर्यायावर क्लिक करायचे आहे.

इथपर्यंत सर्व प्रोसेस व्यवस्थित झाल्यानंतर, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला तुमचं ई-श्रम कार्ड दिसणार आहे. तसेच तुमच्या स्क्रीनवर उजवीकडे Download UAN कार्ड असा अॉप्शन दिसेल, तुम्ही यावर क्लिक केल्यानंतर, तुमचं ई-श्रम कार्ड डाऊनलोड होणार आहे. तसेच, या पेजवर सर्वांत खाली असणाऱ्या Complete registration या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

आतापर्यंत आपण ई-श्रम कार्ड नोंदणी कशी करायची, आणि ते कसे डाउनलोड करायचे, याविषयीची सगळी माहिती सोप्या भाषेत पाहिली, आता आपण या कार्डचे फायदे काय हे देखील पाहू या…

                काय आहेत ई-श्रम कार्डाचे फायदे

ई-श्रम कार्ड हे आधारसोबत लिंक करण्यात आलं असून. या माध्यमातून असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना सामाजिक सुरक्षेसंदर्भाल्या योजना पोहचवणे, हा सरकारचा मुळ उद्देश असणार आहे. ई-श्रम कार्ड नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अपघात विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. जर नोंदणीकृत कामगारांचा अपघाती मृत्यू तसेच कायमचं अपंगत्व आल्यास शासन प्रत्येकी 2 आणि एक लाख रुपये देणार आहे.

हे देखील वाचा Ration card:केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! रेशन कार्ड धारकांसाठी खूशखबर; असं करा आधार कार्डशी रेशनकार्ड लिंक आणि..

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

रेशनची पावती मिळत नाही? चिंता करू नका; असा चेक करा दर महिन्याला मिळालेला माल अन् उठवा रेशन दुकानदारचा बाजार..

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! घरबसल्या मोबाईलवर असा पहा फेरफार उतारा अगदी सोप्या भाषेत..

Viral video: सेल्फी काढायला गेलेल्या सुंदर तरुणीचा चेहरामोहरा ऊंटाने टाकला बदलून; नक्की काय घडलंय? पहा व्हायरल व्हिडिओ..

Viral video: नशेत फुल्ल टल्ली होऊन तरुणी गेली विषारी सापाला पकडाय; पण काय घडलं नेमकं तुम्हीच पहा व्हिडिओ..

Amazon sale: Xiaomi ने आता आयफोनचाही उठवला बाजार; 108MP कॅमेरा,12GB रॅमचा फोन केवळ..

Flipkart;चा धमाका: Samsung redmi सह अनेक स्मार्टफोनवर ८० टक्क्यांची सूट; वाचा कधी सुरू होतोय सेल..

ओ माय गॉड! माझ्या व्यतिरिक्त इतर पुरुषांशीही संबंध ठेव, असं नवराच सांगायचा; विवाहित महिलेने सांगितली..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.