Video: इंदुरीकर महाराज पुन्हा बरळले; “माझ्या जीवावर कोट्याधीश झाले, त्याची पोरं होणार..,” काय आहे प्रकरण पहा व्हिडिओ..

0

प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (indurikar Maharaj) पुन्हा एकदा बरले आहेत. महिलांवर सतत वादग्रस्त विधान करून चर्चेत आलेले किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी अकोला (Akola) येथे किर्तन करताना, पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे (sangram Gavde)यांनी आयोजित केलेल्या कीर्तनात त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाराज आता पुन्हा अडचणीत आले असून, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही होत आहे.

समजप्रबोधन करत असताना गेल्या काही वर्षांपासून निवृत्ती महाराजांनी अनेक वादग्रस्त विधान केल्याचं दिसून येतं खासकरून महिलांवर टीका करताना, निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी पातळी देखील सोडल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे त्यांना कोर्टाची पायरी देखील चढावी लागली. मात्र तरी देखील त्यांच्या बोलण्यात काही फरक पडला नसल्याचं दिसून येत आहे. काल राष्ट्रवादीचे अकोला जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन आयोजित केले होते. या कीर्तनात महाराजांनी YouTube वापरणाऱ्यांवर टीका करताना चक्क पातळी सोडल्याचे पाहायला मिळाले.

इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर टीका करताना म्हंटले, युट्यूब वापरणाऱ्या लोकांनी माझेच व्हिडिओ YouTube टाकून बक्कळ पैसा कमावला. आणि मलाच कोर्टात खेचले. चार हजार YouTube वापरकर्ते कोट्यधीश झाले. माझ्याच व्हिडिओच्या अनेक क्लिप्स बनवून माझ्यावरचं या लोकांनी गुन्हे दाखल केले. पण मी एक सांगतो, याचं वाटोळं होणार म्हणजे होणार. असं वादग्रस्त विधान इंदुरीकर महाराज यांनी केले. महाराज एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी या लोकांची पोरं ‘दिव्यांग’ होणार असंही वादग्रस्त विधान केले.

समाजप्रबोधन करत असताना इंदुरीकर महाराज यांनी अनेक वेळा आपलं ज्ञान पाजळल्याच पाहायला मिळालं आहे. या पूर्वीची देखील त्यांची अनेक वादग्रस्त विधानं चर्चेत असतानाच त्यांनी आता केलेल्या या नवीन विधानामुळे महाराज चांगलेच अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी इंदुरीकर महाराजांनी 2020 ला महिलांविषयी एक खूपच खालच्या पातळीचं विधान केलं होतं. इंदुरीकर महाराज म्हणाले होते, जर तुम्ही सम तिथीला ‘स्त्री’संग म्हणजेच ‘स्त्री’ संभोग केला तर, मुलगा होतो. आणि विषम तीथीला ‘स्त्री’संग केल्यास मुलगी होते. एवढेच नाही तर, त्यांनी जर तुम्ही अमावस्येला स्त्री संग केला तर, तुमची मुलं आंधळी, बेवडी होतात. असाही युक्तिवाद महाराजांनी केला होता.

इंदुरीकर महाराजांनी केलेलं हे विधान त्यांना चांगलंच भोवल होतं. या विधानामुळे त्यांना कोर्टात देखील जावं लागलं होत. नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत राहणाऱ्या इंदुरिकर महाराजांनी काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये घोटीत किर्तन करत असताना कोरणाबाबत एक वादग्रस्त विधान केलं होतं. एकीकडे संपूर्ण देश आणि यंत्रणा लसीकरण करा म्हणून, आवाहन करत असताना, इंदुरीकर महाराज म्हणाले, मी लस घेतली नाही, आणि घेणारही नाही. काही होतच नाही, तर लस घेऊन करायचं काय? को रो नाला एकच पर्याय मन खंबीर ठेवायचं. असं वादग्रस्त विधान केलं होतं.

https://youtu.be/p1yYSedZim0

याच कीर्तनात इंदुरीकर महाराज म्हणाले होते, राम १४ वर्ष वनवासाला गेला होता. पण सीतेला सोबत घेऊन गेला. आपल्याकडे राम चौदा दिवस कॉरंटाईन होता तर, सितेने त्याला डोकावूनही पाहिलं नाही. असं विधान त्यांनी केलं होतं. समाजप्रबोधन करत असताना त्यांनी अशी अनेक धक्कादायक विधान केल्याने, त्यांच्यावर अनेक वेळा टिका देखील होत असते. त्यांनी अनेक वादग्रस्त विधानं केल्यामुळे, त्यांना नोटीस देखील पाठवण्यात आली. मात्र तरीदेखील त्यांच्यात काही बदल होत नसल्याचे पाहायला मिळत असून, आता पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे इंदुरीकर महाराज अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे देखील वाचा:-   Skin Care: उन्हाळ्यात त्वचेचं संरक्षण कसं कराल?    तुळशीच्या पॅकने दिसाल ताजे तरुण; अशी करा कृती..

Maruti Suzuki: मारुती सुझुकीचा धुमाकूळ; swift WagonR सह या गाड्यांवर पन्नास हजारापर्यंत सूट! वाचा सविस्तर

Breaking news: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष ‘वोलोडिमिर झेलेन्स्कई’ यांची लष्करी कारवाईत हत्या; सोशल मीडियावर..

या’ दोन वेबसाइट्सनी फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचा  उठवला बाजार; निम्म्यापेक्षा कमी किमतीत विकतायत वस्तू

क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष होण्यासाठी ‘जय शहा’ने रचला कट; गांगुली देणार राजीनामा? वाचा सविस्तर…

सर्वात जास्त निर्यात रशियात होत असल्याने शेतकरी चिंतेत; रशिया युक्रेन युद्धाचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर परिणाम होणार? वाचा सविस्तर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.