सर्वात जास्त निर्यात रशियात होत असल्याने शेतकरी चिंतेत; रशिया युक्रेन युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम होणार? वाचा सविस्तर…

0

रशिया युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. कुठल्याही युद्धाचे परिणाम हे वाईटच असतात हे सगळ्यांनीच पाहिलं आहे. मात्र आता रशिया युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हा शेतकऱ्यांवर देखील होणार असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना देखील याची झळ पोहोचणार असल्याचं व्यापारी बोलताना दिसत आहेत, मात्र खरंच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे का?

 

महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादक शेतकरी आढळतात. देशातून सर्वाधिक द्राक्ष उत्पादन होते ते नाशिक मधून. नाशिक मधून द्राक्ष ही मोठ्या प्रमाणात रशियात निर्यात देखील केली जातात. महाराष्ट्रातून तब्बल तीस ते पस्तीस हजार मेट्रिक टन द्राक्षे रशियात निर्यात केली जातात. मात्र ऐन हंगामात रशिया आणि यूक्रेन यांचं युद्ध सुरू असल्याने, याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याच्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत असून, शेतकरी मोठ्या चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.

 

दरवर्षीपेक्षा या वर्षी रब्बी हंगामात शेतकरी पुरता हवालदिल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. रब्बी हंगामात यावेळी मोठ्या प्रमाणात झालेल्या अवकाळी पाऊसाने, आणि सतत वातावरणात होणाऱ्या बदलामुळे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात प्रचंड घट झाली. आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडल्याचे दिसून आले. मात्र आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना देखील रशिया आणि यूक्रेन युद्धाचा फटका बसतो की काय? असे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे. त्याचे कारण म्हणजे, युद्ध सुरू असल्याने, रशियामध्ये द्राक्षांची निर्यात होणार नसल्याच्या बातम्या व्यापारी मुद्दाम पसरवत आहेत. युद्धामुळे, निर्यात होणार नसल्याने, द्राक्षांच्या किमती पडणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत. आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

 

महाराष्ट्र राज्यातून जवळपास 30 ते 35 हजार मेट्रिक टन द्राक्षांची रशियात निर्यात केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना द्राक्ष शेतीमधून ठीकठाक उत्पन्न मिळते. अशातच आता रशिया आणि यूक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने, आणि व्यापाऱ्यांनी पसरवलेल्या अफवेमुळे शेतकरी चिंतेत आहेत. मात्र या युद्धाचा कोणताही परिणाम द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या निर्यातीवर होणार नसल्याचं, द्राक्ष बागायतदार संघाने स्पष्ट केले आहे. व्यापाऱ्यांनी आपल्या फायद्यासाठी अशाप्रकारे अफवा पसरवली असल्याचे या संघाने म्हटलं आहे.

 

रशिया आणि युक्रेनमध्ये जरी युद्ध सुरू असलं, तरी रशिया मधील दळणवळण सुरळीत सुरू आहे. आंतरराष्ट्रीय अहवालाच्या माहितीनुसार, रशियाचे जनजीवन विस्कळीत झाले नाही. रशियाने यूक्रेनवर हल्ला केल्याने, युक्रेन देशाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रशियाची बाजारपेठ आणि दळणवळण व्यवस्थित सुरू असल्याचं समोर आल्याने, याचा कोणताही परिणाम निर्यातीवर होणार नसल्याचं द्राक्ष उत्पादक संघाने ‘लोकमत’ला दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हंटले आहे.

 

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे, नाशिक विभागाचे संचालक रामनाथ शिंदे यांनी, लोकमतला दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे, रशिया आणि युक्रेनमध्ये जरी युद्ध सुरू असलं तरी, त्याचा फारसा परिणाम द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर होणार नाही. त्याचं कारण म्हणजे रशियात फक्त 10 ते 15 टक्के द्राक्ष नाशिकमधून निर्यात केली जाते. त्याचबरोबर, आंतरराष्ट्रीय अहवालानुसार, रशियाचे जनजीवन सुरळीत असल्याने, त्याचा कुठलाही परिणाम निर्यातीवर होणार नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे शेतकऱ्याने चिंता करण्याची अजिबात गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा.  समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा”; भगत सिंग कोश्यारी यांनी खाल्लं शेण; मोदी म्हणाले…

डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आले सोन्याचे दिवस; निर्यात वाढवण्यासाठी ‘हे’ विशेष प्रयत्न सुरू…

पोलिसांच्या हालचाली वाढल्या; राणे पिता पुत्रांबरोबर भाजपच्या या बड्या नेत्यालाही संध्याकाळपर्यंत होणार अटक..

पशुसंवर्धन विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शेळी पालनासाठी तब्बल एवढे अनुदान, ‘असे’ मिळवा अनुदान…

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या जखमांवर मोदी सरकारने चोळले मीठ; दर कमी करण्यासाठी घेतला हा निर्णय..

कृषी विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शेतकऱ्यांना ‘या’ योजनेतून मिळणार तब्बल ‘एवढे’ लाख अनुदान..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.