पठ्ठयाच्या वाढदिवसादिवशी तब्बल 267 जणांनी केले रक्तदान (Blood Donation), एवढंच नव्हे तर..

0

प्रेम देवकाते यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र समूहाने रक्तदान (Blood Donation Camp) शिबीर आयोजित केले होते. विजय उर्फ प्रेम संतोष देवकाते यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 267 जणांनी रक्तदान केले आहे. मित्रांनो पैसा गाडी बंगला रक्तदान देऊ शकत नाही तर रक्तदानच जीवदान देऊ शकते असे आवाहन प्रेम देवकाते यांनी केले होते. प्रेम देवकाते हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवत असतात.

रक्तदानाच्या या कार्यक्रमाला नातेपुते नगरीचे  नगरसेवक दादासाहेब उराडे, माजी सरपंच ऍड. भानुदास राऊत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. त्याच्यासोबत नातेपुते पंचक्रोशीतील तरूण उपस्थित होते.

प्रेम देवकाते यांनी कोरोना काळात उल्लेखनीय काम केले आहे. त्यांनी बसस्टँड वर राहणाऱ्या लोकांना, बऱ्याच बेघर लोकांना कित्येक दिवस अन्नदान केले होते. तसेच सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावर ते कधी मनसे स्टाईलने न तर कधी गांधीगिरी मार्गाने ते लोकांचे प्रश्न सोडवत असतात. त्यामुळेच त्यांना मानणारा तरुणवर्ग मोठा आहे.

त्याचसोबत प्रेम देवकाते यांनी नवनिर्वाचित नातेपुते नगरपंचायत निवडणूक लढवली होती. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष यांचे चिरंजीव आबासाहेब देशमुख यांच्या विरुद्ध प्रेम देवकाते यांनी कडवी झुंज दिली होती. त्यामुळे नातेपुते नगरीच्या राजकारणावर देखील त्यांची छाप तरुण वयापासूनच पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: यामुळे दाऊदची बहीण हसीना पारकर आणि नवाब मलिक यांच्या बैठका व्हायच्या; ईडीनेच केला धक्कादायक खुलासा.. 

ओ माय गॉड! नवाब मलिक वेश्याव्यवसाय चालवायचे; ईडीकडे पुरावे.. 

नवरा असतानाही बाहेर चाळं करणाऱ्या बायकांना हायकोर्टाने फटकारलं; काय म्हणालं हायकोर्ट 

सहकार महर्षी म्हणून महाराष्ट्राला ओळख करून देणारे शंकरराव मोहिते-पाटील इंदिरा गांधींनाही भिडले होते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.