IRB Infra: कंपनीला मिळाली १६८३ कोटी रुपयांची ऑर्डर, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड

IRB Infrastructure Developers share Price: IRB Infra हा शेअर १९ डिसेंबरला ४१.८५ रुपयांवर बंद झाला आहे. तर दिवसभरातला उच्चांक (Day High) ४२.९५ एवढा आहे. या शेअरचा ५२ आठवड्यातील नीच्चांक (52 Week’s low) हा २२.५० रुपयांचा आहे आहे तर उच्चांक (52 Week’s High) ४२.९५ रुपये एवढा आहे. कंपनीला १६८३ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्यामुळे या शेअरमध्ये चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. हा स्टॉक सध्या बऱ्याच जणांच्या रडारवर आहे. गेल्या महिनाभराचा विचार केल्यास १६ नोव्हेंबर रोजी IRB Infra हा शेअर ३५.७० रुपयांवर बंद झाला होता. अर्थात या शेअरने महिनाभरात तब्बल १७ टक्के रिटर्न दिले आहेत.

 

ऑर्डरबाबत कंपनीने दिलेले स्पष्टीकरण:

कंपनीने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये असे म्हटले आहे कंपनीला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) १६८३ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. यामध्ये ग्वाल्हेर ते कोटी बायपास रोड टोल ऑपरेशन, देखभाल आणि IRB Infrastructure Trust कडे हस्तांतरित करण्याची ही ऑर्डर आहे. ऑर्डर १६८३ कोटीच्या आगाऊ कॉन्फिगरेशनसाठी आणि २० वर्षांच्या महसूल-संबंधित सवलतीच्या कालावधीसाठी सुरक्षित करण्यात आली आहे, असे IRB Infra कंपनीने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे. ऑपरेट ट्रान्सफर (TOT) क्षेत्रातील सुमारे ३८ टक्क्यांच्या मजबूत बाजारपेठेसह IRB Infra ची मालमत्ता 77 हजार कोटी एवढी वाढेल, असेही म्हटले आहे.

 

कंपनीचे मार्केट कॅपिटल २५२७३ .२२ कोटी रुपये एवढे आहे. जून २०२३ च्या तिमाहीत कंपनीला निव्वळ नफा ११०.०५ कोटी रुपये एवढा झाला आहे. तर सप्टेंबर २०२३ च्या तिमाहीत १२९.७४ कोटी रुपये एवढा झाला आहे. IRB Infra ने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये असे म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्गाच्या एका प्रकल्पासाठी विजेता बनून पुढे आली आहे. कंपनीने १३ TOT (Toll Operate Transfer) प्रोजेक्ट जिंकले आहे. कंपनीची आता देशातील TOT प्रकल्पांमध्ये 38 टक्के भागीदारी आहे, जी सर्व खाजगी कंपन्यांमध्ये आघाडीवर आहे.

 

IRB Infra कंपनीकडे तब्बल 15000 किमी महामार्गांचे पोर्टफोलिओ आहे, जे की देशातील सर्वात मोठे महामार्ग ऑपरेटर मानली जाते. IRB Infra या कंपनीत LIC ची 3.33 टक्के भागीदारी आहे. गेल्या 3 वर्षांत, कंपनीचे शेअर धारकांना 250 % एवढा परतावा दिला आहे. IRB Infra लवकरच LT (लार्सन And टुब्रो) सारखी आघाडीची पायाभूत सुविधा कंपनी बनण्याच्या मार्गावर वाटचाल करत असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.                          टीप: महाराष्ट्र लोकशाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. ही माहिती अभ्यासिक दृष्टीने देण्यात आली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.

Mumbai Indians: बुमराह नंतर सूर्यकुमार यादवचाही मुंबई इंडियन्सला दणका; पाहा नेमकं काय घडलं.. 

Pat Cummins Travis Head: रचिन रवींद्र, ट्रॅव्हिस हेड, डॅरिल मिशेल, पॅट कमिन्सची रेकॉर्ड ब्रेक खरेदी; पाहा कोण कुठे गेलं.. 

Rohit Sharma left MI: अखेर रोहितचं ठरलं! रोहीत शर्मासाठी या दोन संघांनी पैसे ठेवले राखून; या पद्धतीने होणार डील..

IPL 2024 captain: मुंबईसह चार संघाच्या कर्णधार पदामध्ये मोठा उलटफेर; जाणून घ्या दहाही संघाचे कर्णधार..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.