ब्रेकिंग न्यूज! देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच नवाब मालिक यांना अटक झाल्याचं उघड; शरद पवार म्हणाले…

0

गेल्या काही महिन्यांपूर्वी नवाब मलिक यांनी भारतीय जनता पार्टीवर खास करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे, भविष्यात नवाब यांच्या अडचणी वाढणार असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. आज नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईने हे सिद्ध देखील झाल्याचं बोललं जात आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना भल्या पहाटे अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेलं आहे.

नवाब मलिक यांची चौकशीही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित एका मनी लाँण्ड्रिंग प्रकरणात असल्याचं बोलले जात असून, जाणीवपूर्वक त्यांना अडकवण्यात आले आहे. असं देखल आता राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून बोलण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि म्हणून, जाणून-बुजून भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलणाऱ्या मंडळींना टार्गेट करत कारवाई करण्याचा धडाका सुरू असल्याचं, बोललं जात आहे.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात नवाब मलिक यांनी भारतीय जनता पार्टीच्या अनेक बड्या नेत्यांवर अनेक गंभीर आरोप केले होते. एकीकडे दररोज पत्रकार परिषद घेत नवाब मलिक आर्यन खान ड्रग्स प्रकरण किती फेक आहे, हे सांगत होते. तर दुसरीकडे, समीर वानखेडे आणि भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांचे थेट संबंध असल्याचा खुलासा करत होते. एवढंच नाही तर, देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक जवळच्या लोकांनीच हे प्रकरण घडवून आणल्याचा धक्कादायक आरोप देखील नवाब मलिक यांनी केला होता.

एकीकडे नवाब मलिक रोज पत्रकार परिषद घेत भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत असताना दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी देखील नवाब मलिक आता सुतळी बॉम्ब फोडत आहेत, मी मोठा धमाका करणार असल्याचं म्हटलं होतं. नवाब मलिकांनी त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केल्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी आता सूडबुद्धीने नवाब मलिक यांच्यावर एका जून्या मालमत्ता व्यवहार प्रकरणात. अंमलबजावणी संचालनालयाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे.

ईडीने केलेली ही कारवाई नियमानुसार झाली नसल्याचे, देखील बोलले जात आहे. कोणतीही नोटीस न काढता, अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी भल्यापहाटे नवाब मलिक यांच्या घरी धाड टाकली. आणि नवाब मलिक यांना कार्यालयात घेऊन गेले. नवाब मलिक यांच्या एका जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली जात असल्याची माहिती मिळत आहे. आज सकाळी सात वाजले पासून नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर, शरद पवार यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, नवाब मलिक यांच्यावर कारवाई यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही. नवाब मलिक ज्या उघडपणे बोलत होते, त्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई होणार होती याची आम्हाला कल्पना होती. असं पवार साहेबांनी म्हटलं असून, याविषयी फारसं काही बोलण्याची गरज नाही. असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर, शरद पवार म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना पंचवीस वर्षांपूर्वी देखील असाच आरोप करण्यात आला होता.

हेही वाचा- नवरा असतानाही बाहेर चाळं करणाऱ्या बायकांना हायकोर्टाने फटकारलं; काय म्हणालं हायकोर्ट

आपली रॅली सोडून भाजपचे हजारो कार्यकर्ते प्रियंका गांधींच्या रॅलीत; भर रस्त्यात असं काय घडलं

सोशल मीडियावर अमृता फडणवीसांचा धुमाकूळ; डोक्यावर जटा,हातात त्रिशूळ! काय आहे प्रकरण

मोठी बातमी! १०० कोटींसाठी अण्णा हजारेंनी १३ दिवस उपोषण केल्याचं उघड; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण..

हे फक्त पवारांचा नातूच करू शकतो; रोहित पवारांच्या ‘या’ कृत्याचं देशभरातून कौतुक..

.नारायण राणेंवर गुन्हा दाखल; केव्हाही होऊ शकते अटक, ‘हे’ आहे कारण..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.