मोठी बातमी! १०० कोटींसाठी अण्णा हजारेंनी १३ दिवस उपोषण केल्याचं उघड; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण..

0

इंडिया अगेस्ट करप्शन नावाखाली संपूर्ण देश एकवटला आणि ‘जनलोकपाल बिल’ संसदेत पारित व्हावे, यासाठी ‘अण्णा आंदोलन’ अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली रामलीला मैदानावर सुरू झालं. संपूर्ण देशभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत असल्याचे त्यावेळी पाहायला मिळालं होतं. एकीकडे या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत होता, मात्र आता हे राजकीय प्रेरित होतं असं उघड झालं आहे.

एकीकडे संपूर्ण देश अण्णा यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत होता, तर दुसरीकडे देशात अशी काही ठराविक लोकं होती,जी हे आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचे म्हणत होती. त्यात प्रसिद्ध लेखक राजू परुळेकर यांचाही समावेश होता. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच या आंदोलनाची ‘स्क्रिप्ट्’ अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांनी लिहिली होती. असा खुलासा आता नुकताच राजू परुळेकर यांनी केला आहे.

अण्णा हजारेंनी उपोषण सोडल्यानंतर काही दिवसांनी किरण बेदींच्या घरी अरविंद केजरीवाल, किरण बेदी, प्रशांत भूषण, मनीष सिसोदिया, यांना अण्णा हजारे यांनी फंडात जमा झालेले १०० कोटी माझे असल्याचे म्हंटले. मात्र अन्नाचे हे वाक्य या लोकांनी बरोबर रेकॉर्ड करून घेतलं. आणि अन्नाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. पैशावरून अण्णा टीममध्ये वाद झाल्याच्या बातम्या देखील त्या वेळी आल्या होत्या. हेच प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

दोन दिवसांपूर्वी ट्विटरवर राजू परुळेकर यांनी जवळपास दीड तासाचा संवाद साधला. यात त्यांनी इंडीया अगेस्ट करप्शन हे किती फेक होतं, यावर चर्चा केली. अण्णा हजारेंचं हे आंदोलन भाजप प्रेरित होतं. आंदोलन सुरू करण्यापूर्वीच अरविंद केजरीवाल, किरण बेदी, आणि अण्णा हजारे यांनी भारतीय जनता पार्टीच्या अनेक बड्या नेत्यांची भेट घेतली होती. असाही खूलासा राजू परूळेकर यांनी केला. नंतर या बैठकीचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.

अण्णा आंदोलनमुळे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रतिमा मलिन झाली. आणि काँग्रेस सरकार कोसळले. एकीकडे या आंदोलनाची आंदोलनापूर्वीच
स्क्रिप्ट लिहिलेल्या किरण बेदी, आणि अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचता आलं. तर भारतीय जनता पार्टी देखील या आंदोलनामुळे सत्तेत आली. मात्र या आंदोलनाचा प्रचंड मोठा फटका अण्णा हजारे यांना बसल्याचं पहिला मिळालं. या आंदोलनामुळे अण्णा हजारे यांची प्रतिमा प्रचंड मलीन झाली. एवढंच नाही तर, अण्णा हजारे यांनी भाजपच्या सांगण्यावरूनच हे आंदोलन केलं होतं, हे देखील आता उघड झालं आहे. शिवाय अण्णा हजारेंनी हे आंदोलन पैसे मिळवण्याच्या उद्देशानेच केले होते, असाही आरोप आता होऊ लागला आहे.

हे वाचलं का ‘या’ कारणामुळे अण्णा हजारेंना केजरीवालने मारण्याचा कट रचला होता; कोणी वाचवलं अण्णांना..

या’ कारणामुळे महाराष्ट्रातला कांदा दर्जेदार असूनही भाव नाही; केंद्र सरकारच्या..

हे फक्त पवारांचा नातूच करू शकतो; रोहित पवारांच्या ‘या’ कृत्याचं देशभरातून कौतुक…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.