हे फक्त पवारांचा नातूच करू शकतो; रोहित पवारांच्या ‘या’ कृत्याचं देशभरातून कौतुक…

0

कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातून ऐतिहासिक विजय संपादन केलेले, रोहित पवार सोशल मीडियावर चांगलेच ॲक्टीव असतात. विविध कामांचा शुभारंभ, तसेच कार्यकर्त्यांसोबत होणाऱ्या भेटी-गाठीचा तपशील ते आपल्या ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटवरून नेहमीच मांडत असतात. मतदार संघात फिरत असताना, त्यांनी केलेल्या अशाच एका कृत्याची जोरदार चर्चा आता देशभर होताना पाहायला मिळत आहे.

भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या, कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी प्रचंड मेहनत करत, मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला. आणि ‘ज्वाईट किलर’ ठरले. मेहनत, कामात सातत्य, साधेपणा, आणि कार्यकर्त्यांशी होणाऱ्या वारंवार संवादामुळे रोहित पवार यांनी कमालीची लोकप्रियता मिळवली. विरोधकांवर देखील टीका करताना, रोहीत पवार यांची एक विशिष्ट्य शैली आहे. याची चर्चा नेहमीच होत असते.

रोहीत पवारांनी केंद्रीय मंत्री, रावसाहेब दानवे यांच्यावर केलेल्या अशाच एका टीकेची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. एवढेच नाही तर, सोशल मीडियावर रोहीत पवारांनी केलेल्या टीकेचे अनेकांकडून कौतुक देखील होताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी रावसाहेब दानवे यांनी मुंबईमध्ये एका टपरीवर आपल्या कार्यकर्त्यांसोबत ‘वडापाव’वर चांगलाच ताव मारला. आणि वडापावचे पैसे न देताच पसार झाले. याची चर्चा ताजी असतानाच आता रोहीत पवारांनी रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता शालुतून चांगलाच जोडा हाणला आहे.

रोहीत पवार आपल्या मतदार संघात फिरत असताना, त्यांना भूक लागली. भूक लागल्यानतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत माही जळगाव मधील ‘राहुल हॉटेल’वर मिसळवर चांगलाच ताव मारला. भूक लागल्यानंतर ते कुठेही नाष्टा जेवण करताना अनेकांनी पाहिलं असेल. नेहमीप्रमाणे या वेळी देखील त्यांनी राहुल नावाच्या हॉटेलमध्ये नाष्टा केला. मात्र यावेळी त्यांच्या नाष्ट्याची जोरदार चर्चा होत आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवर एक ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्यांनी म्हंटले आहे, “मतदारसंघात असताना भूक लागल्याने माही जळगावमधील राहुल हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाल्ली. एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने ‘३५’ मिसळ खाण्याच्या केवळ कल्पनेनेच कसंतरी झालं. असं रोहीत पवार म्हणाले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, त्यांनी आपण मिसळ खाल्ल्यानंतर पैसे न देताच उठून गेलो नाही, तर नेहमीप्रमाणे बिलही पेड केलं” असं म्हणत, रोहीत पवार यांनी नाव न घेता रावसाहेब दानवे यांना चांगलाच टोला लगावला आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.