Kapil Sharma: ‘या’ कारणामुळे ‘कपिल शर्मा’ने आत्महत्याचा प्रयत्न केलता, वेळेत पोहचून बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याने वाचवले होते प्राण

0

सोनी टेलिव्हिजन वाहिनीवर दर शनिवारी आणि रविवारी प्रसारित होणारा प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ प्रचंड पॉप्युलर आहे. ‘द कपिल शर्मा शो’ पाहण्यासाठी जगभरातून चाहते येत असल्याचे आपण पाहतो. फक्त चाहतेच नाही तर या ‘शो’ची अनेक बड्या कलाकारांना देखील भुरळ पडली असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. बडे कलाकार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशन साठी ‘द कपिल शर्मा’शो’ ला हजेरी लावतातच लावतात.

‘द कपिल शर्मा शो’ हा सुरुवातीला कलर्स वाहिनीवर ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या नावाने प्रसारित होत होता. कलर्स वाहिनीवर प्रसारित होणारा हा ‘रियालिटी शो’ प्रचंड पॉप्युलर देखील होता. परंतु काही कारणांमुळे कपिल शर्माच्या या ‘शो’चे नामकरण होऊन, सोनी वाहिनीवर हा कार्यक्रम दर शनिवारी आणि रविवारी प्रसारित होऊ लागला. ‘द कपिल शर्मा शो’ नावाने प्रसारित झालेल्या या ‘रियालिटी शो’ला प्रचंड प्रतिसादही मिळू लागला. अल्पावधीतच हा ‘शो’ जगभरात पोहोचला. ‘द कपिल शर्मा ‘शो’ चे चित्रीकरण जगभरात अनेक ठिकाणी झाले आहे. हे आपल्याला माहीत असेलच.

पंजाब मधील एका मध्यमवर्गीय कुटुंबातला एक व्यक्ती आपल्या मेहनतीच्या जोरावर ‘द कपिल शर्मा शो’ च्या माध्यमातून जगभरात पॉप्युलर झाला, आणि पुढे ‘कपिल शर्मा’ नावाने ओळखू लागला. आज कपिल शर्माचे बॉलिवूडच्या अनेक बड्या कलाकारांपेक्षाही जास्त चाहते निर्माण झाले आहेत. मात्र प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या आयुष्यात असाही एक बॅड पॅच आला होता. ज्यामुळे तो ‘आत्महत्या’ देखील करायला निघाला होता. हे आपल्याला माहिती आहे का? आज आपण याच याविषयी बोलणार आहोत.

WhatsApp चे हे नवीन फीचर तुमच्या आहे खूप फायद्याचे, यामुळे तुमचे काम होणार सोपं

‘द कपिल शर्मा शो’ चे चित्रीकरण एकदा ऑस्ट्रेलियामध्ये झालं होतं. या शोचं चित्रीकरण संपल्यानंतर ऑस्ट्रेलियातून भारतामध्ये येताना काही कलाकारांसोबत कपिल शर्माचं भांडण झाल्याचं बोललं गेलं. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रचंड पॉप्युलर असणारा सुनील ग्रोवर याच्याशी कपिल शर्माचं भांडण झाल्याच्या चर्चा या काळात चांगल्याच रंगल्या होत्या. नंतर ‘द कपिल शर्मा शो’कडे सुनील ग्रोवर अली अजगर, या बड्या कलाकारांनी पाठ फिरवली. या दोघांनी हा शो सोडल्यानंतर ‘द कपिल शर्मा शो’कडे प्रेक्षकांनी देखील पाठ फिरवल्याचे दिसून आले.

प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी मिळू लागल्याने त्याचबरोबर काही कारणांमुळे कपिल शर्मा डिप्रेशनमध्ये गेल्याचे पहिला मिळालं. त्यानंतर कपिल शर्मा ड्रिंक देखील मोठ्या प्रमाणात करू लागला. या काळात तो एकटा एकटा राहत असे. कॉमेडियन कपिल शर्माची ही अवस्था बघून त्याच्या मित्राने आपल्या घरी राहण्याचा सल्ला दिला. कपिल शर्मा देखील आपल्या मित्राच्या घरी राहायला गेला. मित्राच्या घरातून त्याला समुद्र दिसत होता. समोर समुद्र पाहून अनेक वेळा त्याच्या मनात समुद्रात उडी टाकून आत्महत्या करायचा विचार आला होता.

मात्र या वाईट काळात त्याच्या आयुष्यात बॉलिवूडचा किंग खान ‘शाहरुख खान’ देवदूत बनून आला. आणि कपिल शर्माला वाईट काळातून सुखरूप बाहेर काढलं. हा किस्सा स्वतः कपिल शर्माने एका मुलाखतीत सांगितला आहे. या मुलाखतीत कपिल शर्माने आपल्या वाईट काळाचा उलगडा करत. अनेक धक्कादायक खुलासे देखील केले आहेत. या काळात मी अल्कोहोलच्या आहारी गेलो. ‘शो’ करण्यासाठी मला कॉन्फिडन्स देखील राहिला नव्हता. स्टेजवर जाण्याची भीती वाटायची. मात्र शाहरुख खानने मला व्यवस्थितरीत्या बाहेर काढलं,असा खुलासा कपिल शर्माने एका मुलाखतीत केला आहे.

हेही वाचा: धक्कादायक..! मोहित कंम्बोजच मास्टरमाईंड वानखेडेंना खंडणी गोळा करून देणाऱ्या टोळीचाही पर्दाफाश 

Amol Kolhe| अमोल कोल्हे यांच्या पोस्टमुळे उडाली खळबळ, आता घेतायत राजकारणापासून संन्यास 

WhatsApp चे हे नवीन फीचर तुमच्या आहे खूप फायद्याचे, यामुळे तुमचे काम होणार सोपं 

T20 World Cup: एकीकडे अफगाणिस्तान पराभूत झाला, तर दुसरीकडे भारतीय खेळाडूंनी बॅगा भरल्या; अखेर जडेजाच्या तोंडाला यश आलेच.. 

The story of a helpless woman: जेव्हा एखाद्या स्त्रीला दारुड्या नवऱ्यामुळे एसटीमधून बाहेर काढलं जातं तेव्हा, तिची झालेली केविलवाणी अवस्था.. 

Raj Thackeray New Home:असं आहे राज ठाकरे यांचे नवीन घर, आता राज ठाकरे गेले आपल्या नवीन घरी; घर पाहून लोक झाले चकित

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.