Supriya Sule:माझ्यासारखी वाईट बाई कोणी नाही,घरात घुसून ठोकून काढेन; यशवंतरावांचे विचार वेशीला टांगत सुप्रिया सुळेंचं वादग्रस्त विधान

0

शरद पवार वगळता राष्ट्रवादीचे असे काही नेते आहेत, जे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेक वेळा अडचणीत देखील आले आहेत. यात सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर नाव उभा राहतं ते अजित पवारांचं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या वादग्रस्त विधानामुळे अनेक वेळा अडचणीत आल्याचे, आपण अनेकदा पाहिलं असेल. मात्र सुप्रिया सुळे यांनी देखील एकदा आपला संयम सोडत, धक्कादायक विधान केलं होतं. आज आपण त्याच विषयीच बोलणार आहोत.

असं म्हटलं जातं, राजकारणात संयम फार महत्वाचा असतो. विरोधकांवर टीका करताना देखील शब्दांची योग्य निवड करणं गरजेचं असतं. तरच जनता तुम्हाला गांभीर्याने घेते. असं बोललं जातं. कोणतेही आरोप झाले, विरोधकांनी कितीही टीका केली, तरी देखील यावर प्रतिक्रिया देताना, खुप जपुन बोलावं लागतं. खासकरून सत्ताधाऱ्यांना या गोष्टींचं भान ठेवावं लागतं. आणि राजकारणात सत्ताधारी मंडळीकडून अनेक वेळा याचं पालन देखील होताना आपण अनेक वेळा पाहिलंही असेल.

मात्र प्रत्येक पक्षात अशी काही नेते मंडळी सापडतीलच सापडतील. जे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेक वेळा अडचणीतही आले आहेत. कधी विरोधकांवर टीका करताना संयम सुटल्याचे आपण पाहिले असेल. तर कधी जनतेला देखील बोलताना आपली जीभ घसरल्याची विधाने आपल्याला अनेकदा पाहायला मिळाली असतील. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेकांवर टीका करताना वैचारिक पातळी पाळली जाते, असं म्हटलं जातं. मात्र अलीकडच्या काळात महाराष्ट्रात देखील राजकारणाचा स्तर घसरल्याचे चित्र पाहायला मिळते.

हेही वाचा: WhatsApp चे हे नवीन फीचर तुमच्या आहे खूप फायद्याचे, यामुळे तुमचे काम होणार सोपं

पन्नास वर्षाहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असून देखील शरद पवार यांनी अजूनही टीका करताना कधी पातळी सोडली नाही. राजकारणात शरद पवार यांच्याकडून रसुसंस्कृतपणाचे विरोधकांनी देखील धडे घेतल्याचे आपण ऐकत आलोय. मात्र शरद पवार वगळता राष्ट्रवादीत असे अनेक नेते आहेत, जे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कधीकाळी अडचणीत देखील आले होते. या मंडळींची नावे देखील आपल्याला माहिती असतील.

मात्र खुद्द शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी देखील 2019 लोकसभा निवडणुकीदरम्यान आपला संयम गमावला होता. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मधून भाजपमध्ये गेल्यानंतर राहुल शेवाळे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यामधील आॉडिओ क्लिप वायरल झाल्याने प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले होते. या फोन कॉलमध्ये सुप्रिया सुळे यांनी राहुल शेवाळे यांना चक्क घरात घुसून ठोकून काढेन, अशी भाषा वापरल्याने, एकच खळबळ उडाली होती.

 

आपल्या पीएच्या मोबाईलवरून राहुल शेवाळे यांना सुप्रिया सुळे, यांनी फोन करत सज्जड दम दिल्याचं राहुल शेवाळे यांनी अनेक माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. सुप्रिया सुळे यांनी राहुल शेवाळे यांना दम दिल्याची ऑडिओ क्लिप देखील वायरल झाली होती. माझ्यासारखी वाईट बाई नाही, मी खरी बाई आहे. घरात येऊन ठोकून काढेन,लक्षात ठेवा. या पद्धतीची भाषा वापरल्याने सुप्रिया सुळे चांगल्याच अडचणीत आल्या होत्या.

मात्र या ‘ऑडिओ क्लिप’ संदर्भात सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना ही क्लिप माझी नसल्याचे सांगितले. शिवाय माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी असं बोलेन असं तुम्हाला वाटतं का? माझी बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे. चार दिवसांवर लोकसभा निवडणुकीचे मतदान असल्यामुळे अशाप्रकारची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं होतं. मी त्यांना दम दिला होता तर, त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जायला पाहिजे होतं. मिडियात ते का दाखवत आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.

हेही वाचा: धक्कादायक..! मोहित कंम्बोजच मास्टरमाईंड वानखेडेंना खंडणी गोळा करून देणाऱ्या टोळीचाही पर्दाफाश 

Amol Kolhe| अमोल कोल्हे यांच्या पोस्टमुळे उडाली खळबळ, आता घेतायत राजकारणापासून संन्यास 

WhatsApp चे हे नवीन फीचर तुमच्या आहे खूप फायद्याचे, यामुळे तुमचे काम होणार सोपं 

T20 World Cup: एकीकडे अफगाणिस्तान पराभूत झाला, तर दुसरीकडे भारतीय खेळाडूंनी बॅगा भरल्या; अखेर जडेजाच्या तोंडाला यश आलेच.. 

The story of a helpless woman: जेव्हा एखाद्या स्त्रीला दारुड्या नवऱ्यामुळे एसटीमधून बाहेर काढलं जातं तेव्हा, तिची झालेली केविलवाणी अवस्था.. 

Raj Thackeray New Home:असं आहे राज ठाकरे यांचे नवीन घर, आता राज ठाकरे गेले आपल्या नवीन घरी; घर पाहून लोक झाले चकित

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.