TATA: एलोन मस्क यांनी रतन टाटा यांना विद्वान आणि सज्जन म्हटले होते, जाणून घ्या कारण..

0

मुंबई| टाटा (TATA) उद्योग समूहाचे रतन टाटा (Ratan Tata) हे केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपतींपैकी एक आहेत. जगभरात असे अनेक उद्योगपती आहेत ज्यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे कौतुक केले आहे आणि टेस्लाचे  प्रमुख एलोन मस्क हेदेखील त्यापैकी एक आहेत. अब्जाधीश असणारे एलोन मस्क एकदा रतन टाटांना  “विद्वान आणि सज्जन” असे म्हणाले होते. एलोन मस्क यांनी नम्रपणे टाटांचे  “विद्वान आणि सज्जन” अशा शब्दांत कौतुक केले होते. (TATA: Elon Musk called Ratan Tata a scholar and a gentleman)

चार्ली रोज यांनी 2009 मध्ये घेतलेल्या मुलाखतीत, एलोन मस्क यांना चार्ली रोज यांनी टाटा नॅनो कारबद्दल विचारले तेव्हा मस्कने टाटांचे कौतुक केले होते, टाटा नॅनो तेव्हा नुकतीच रिलीज झाली होती.  “क्षणभर टाटांचे उदाहरण घेऊया रतन टाटा हे भारतात $2300 डॉलर मध्ये आपली सेडान कार विकसित करत आहेत. सध्या अशा कारचे भविष्य कुठे आहे? यावर तुमचे काय मत आहे.असा प्रश्न मुलाखतीदरम्यान रोजने एलॉन मस्कला विचारले होते.

“मी रतन टाटा यांना ओळखतो. मला वाटते की परवडणाऱ्या कार विकणे ही चांगली कल्पना आहे,”   असे एलोन मस्कने चार्ली रोज यांनी  विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले. मस्कला या प्रकल्पाविषयी काही आक्षेप असल्याचं दिसत असताना, रतन टाटा यांच्या बद्दलची त्यांची प्रशंसा स्पष्ट होती.  “अशा काही गोष्टीची समस्या – मी समस्या म्हणणार नाही, कारण रतन टाटा हे एक सज्जन आणि विद्वान आहेत – ही चांगली कल्पना आहे. असे मस्क म्हणाले.

परंतु भविष्यात जेव्हा इंधनाच्या किमती वाढत जातील तेव्हा हे आव्हानात्मक होणार आहे. ज्यावेळी इंधनाच्या किमती वाढत जातील तेव्हा कार विकत घेण्याच्या खर्चापेक्षा कार चालवण्याचा खर्च जास्त असेल,” असे एलोन मस्क म्हणाले. टाटा नॅनोची किंमत अतिशय स्पर्धात्मक असून, इंधनाच्या वाढीव किंमतींचा अर्थ असा होतो की अल्पावधीतच त्याचा खर्चाचा बराचसा फायदा नष्ट होईल.

गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत देशात तेलाच्या किमती लक्षणीय वाढल्या आहेत. देशभरातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी १०० रुपयांचा टप्पा पार केला आहे. आज पेट्रोल ११५ रुपयांच्या जवळपास पोहोचले आहे. तर डिझेलने सुध्दा शंभरी पार केली आहे. महागाईने आपला दर जवळपास कायम ठेवला आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. बऱ्याच लोकांनी आपल्या दोनचाकी, चारचाकी गाड्या चालवणे बंद केले आहे.

टाटा कंपनीची नॅनो आता भारतात उत्पादित केली जात नाही. कारण ती 2019 मध्ये बंद करण्यात आली आहे. वाढत्या इंधनाच्या किंमतीमुळे नॅनो बंद झाली नव्हती म्हणजेच इंधन दरवाढ हे नॅनो बंद करण्याचे कारण नव्हते. जेव्हा टाटा नॅनो बाजारात आली तेव्हा सुरुवातीच्या काळात कारला लगेच आग लागली. त्यामुळे लोकांचा टाटा नॅनो कारच्या उत्पादनावरील  विश्वास कमी झाला.

टाटा नॅनोच्या मार्केटिंगला “जगातील सर्वात स्वस्त कार” या टॅगचा फायदा झाला नाही आणि अनेक भारतीय, ज्यांनी स्टेटस सिम्बॉल म्हणून कार खरेदी केली, त्या टॅगमुळे ती खरेदी करण्यास त्यांना संकोच वाटला. स्वतः रतन टाटा यांनी सुध्दा नॅनोचे मार्केटिंग करत असताना जगातील सर्वात स्वस्त कार हा टॅग देऊन आपण चूक केली असे मान्य केले होते. यामुळेच नॅनोची जास्त प्रमाणात विक्री न झाल्याचे बोलले जाते.

नॅनो कारला ‘सर्वात परवडणाऱ्या’ ऐवजी सर्वात स्वस्त म्हणून ब्रँडिंग करणे ही मोठी चूक झाल्याचे स्वतः रतन टाटा यांनी सांगितले. नॅनो कारला सर्वात स्वस्त म्हणून ब्रँडिंग केल्याने बाजारात त्याचा नकारात्मक परिणाम झाला, असे 83 वर्षीय परोपकारी यांनी म्हटले आहे.  रतन टाटा म्हणाले, “एखाद्याला योग्य वाटणारा निर्णय घेतला तर यश मिळते.”नॅनोची विक्री घटू लागली आणि त्यानंतरच्या काळात उत्पादनही शून्यावर आले.

जरी टाटा नॅनो पूर्णपणे वेगळ्या कारणांमुळे अयशस्वी झाली, तरीसुध्दा एलोन मस्कचा मुद्दा तोच आहे. फक्त एलोन मस्कच रतन टाटांचे कौतुक करत नाहीत, ही भावना परस्पर आहे.  2014 मध्ये, रतन टाटा  एलोन मस्क यांच्या मालकीची असणाऱ्या टेस्लाबद्दल बोलले होते. “जेव्हा एखादी व्यक्ती टेस्ला कार विकत घेतात  तेव्हा,  त्यांना वेगवेगळे अनुभव येतात,” असे रतन टाटा म्हणाले होते.

इंटरनेटचा वापर करून कारची माहिती मिळवता येईल, जेव्हा कार गॅरेजमध्ये असते; ग्राहकाच्या गॅरेजमध्ये असते तेव्हा सॉफ्टवेअरमध्ये असणाऱ्या त्रुटी दूर केल्या जाऊ शकतात”. असे रतन टाटा म्हणाले होते. “टेस्ला कर्जदार ग्राहकांना कार घेण्याची परवानगी देते आणि जर त्यांना ते आवडले तर ते फरक भरून ते खरेदी करू शकतात. टेस्ला कंपनीने अशा बऱ्याच गोष्टी केल्या आहेत ज्या त्यांनी करायला नको होत्या.

ही फक्त दुसरी एक इलेक्ट्रिक कार असू शकते.  टेस्ला उत्पादनाच्या पलीकडे जाऊन एकूण अनुभव आणि त्यांच्या ग्राहकाला त्याच्या अपेक्षेपेक्षा अधिकच देत असतात. उत्पादनांमध्ये इतर गोष्टी देखील पाहिजेत ज्यामुळे त्यांचा अनुभव अधिकच वेगळा होत असतो,” असे रतन टाटा म्हणाले.

रतन टाटा आणि एलोन मस्क हे दोघेही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात दिग्गज आहेत कारण या दोघांनीही ऑटोमोबाईल व्यवसायामध्ये क्रांती घडवली आहे. रतन टाटा आणि एलोन मस्क या दोघांचा भारतात मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग आहे. एलोन मस्क आणि टाटा हा दोघांना एकमेकांच्या कामाचीसुध्दा फार आवड असलेली आपल्याला पाहायला मिळते. रतन टाटा आणि एलोन मस्क या दोघांची भेट नक्कीच पाहण्यासारखी असेल. अशीच नवनवीन माहिती लिहिण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन द्या. ही माहिती इतरांना पाठवा. शेअर करणे मोफत आहे.

हेही वाचा – टाटा समूहाचा इतिहास आणि भारताच्या विकासात असणारे त्याचे योगदान वाचून,तुम्ही अक्षरशः वेडे व्हाल

टाटांची आता शेतकऱ्यांसाठी खास योजना! कांदा साठवणुक करण्यासाठी आता ही संकल्पना राबवणार 

Video: माझ्या मनात आलं असतं तर शाहरुख, सलमानलादेखील घेतलं असतं, मी प्रत्येक नदी फिरले: अमृता फडणवीस 

आर्यन खान ड्रग्स प्रकरण: ड्रग्स माफिया जयदीप राणा आणि अमृता फडणवीस यांचा फोटो व्हायरल; नवाब मलिक यांनी उघड केला संबंध

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.