Video: माझ्या मनात आलं असतं तर शाहरुख, सलमानलादेखील घेतलं असतं, मी प्रत्येक नदी फिरले: अमृता फडणवीस
मुंबई| नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस यांचे ड्रग्ज पेडलर्सशी जवळचे संबंध आहेत असं खळबळजनक वक्तव्य केलंय. मलिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचा अमृता पडणवीस आणि जयदीप राणा यांचा फोटो शेअर केला आहे. नवाब मलिकांच्या या आरोपानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांच्या आरोपांना प्रतिउत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांनी लवंगी फटाकडा फोडला आहे. दिवाळीनंतर मोठा बॉम्ब फोडणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले सर्व आरोप अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत फेटाळले आहेत. अमृता फडणवीस म्हणल्या, “मी राजकारणी नाही, समाजसेविका आहे. जेव्हा आम्ही मुंबईला आलो तेव्हा रिव्हर मार्च ही मोहीम चालवणाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला. असे अमृता फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, सचिन गुप्ता आणि जयदीप राणा यांना आऊटसोअर्स करण्यात आलं. हे दोघे दिग्दर्शक आणि असिस्टंट होते. या अगोदर या दोघांनी सदगुरु यांच्यासाठी गाणं तयार केलं होतं. त्या गाण्यासाठी त्यांनी एकही पैसा घेतलेला नाही. माझ्या मनात आलं असतं तर शाहरुख, सलमानलासुध्दा घेतलं असतं,” असं अमृता फडणवीस नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना म्हणाल्या.
आमच्या या गाण्यात अनेक कोळी बांधव होते, डेबवाले सुध्दा होते. कोणीही आमच्याकडून पैसे घेतले नाहीत. “जेव्हा माझा संपर्क रॅली फॉर रिव्हर्स ही मोहीम राबवणारे सदगुरु यांच्याशी झाला. तेव्हा मी सदगुरु यांच्या मोठ्या कार्यक्रमामध्ये सामील झाले होते. या कार्यक्रमात मला एक वक्ता म्हणून बोलवण्यात आले होते. त्यानंतर सदगुरु यांच्यासोबत सचिन गुप्ता आणि जयदीप राणा या दोघांना आऊटसोअर्स करण्यात आलं. हे दोघे अनुक्रमे दिग्दर्शक आणि अशिष्टंट होते.सचिन आणि जयदीप यांनी सदगुरु यांच्यासाठी एक गाणं तयार केलं.
या गाण्यावर सर्व बॉलिवूडने गाणं म्हटलं. हे गाणं रिव्हर्र मार्चवाल्यांना आवडलं. याच दोघांना नंतर रिव्हर मार्चने आऊटसोअर्स केलंसचिन गुप्ता यांनी दिग्दर्शन केलं तर रॅली फॉर रिव्हर मार्चवाल्यांनी सर्व रेकॉर्डिंग फ्रीमध्ये ठेवलं. कोणीही या गाण्यासाठी पैसा घेतला नाही. या गाण्यात शाहरुख, सलमान यांना आणलं असतं पण यामध्ये कोळी बांधव,डेबवाले आहेत. मला तसेच रिव्हर मार्चच्या लोकांमध्ये राजकीय महत्वाकांक्षा नाही, असे स्पष्टीकरण अमृता फडणवीस यांनी दिले.
पुढे बोलत असताना अमृता फडणवीस म्हणाल्या नवाब मलिक यांनी माझे आणि देवेंद्र यांचे फोटो ट्विट करुन केलेले आरोप निराधार आहेत. “आम्ही जागृती केली आणि आज आम्हालाच लाथ मारली जाते. आम्हाला यामध्ये कुठलीही राजकीय महत्वाकांक्षा नाही. त्यांना तुम्ही त्रास देत आहात हे कशा प्रकारचे राजकारण आहे. तुम्हाला राजकारण करायचं आहे. तुम्हाला बिगडे नवाब व्हायचे आहे का ? तुम्ही बिगडे नवाबची एनर्जी सुधरे नवाबमध्ये कन्व्हर्ट करा. तरच महाराष्ट्र पुढे जाईल”, असा खरपूस समाचात अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांचा घेतला आहे.
आर्यन खान ड्रग्स प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची एंट्री; समीर वानखेडे फडणवीस कनेक्शन उघड
मोठी बातमी! जात प्रमाणपत्रारावरून समीर वानखेडेच्या अडचणीत होणार वाढ, धनंजय मुंडे म्हणाले..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम