आर्यन खान ड्रग्स प्रकरण: ड्रग्स माफिया ‘जयदीप राणा’ आणि अमृता फडणवीस यांचा ‘फोटो’ व्हायरल; नवाब मलिक यांनी उघड केला संबंध

0

Aryan Khan Drug case: राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) गेल्या काही दिवसांपासून दररोज समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. त्या संदर्भात अनेक पुरावे देखील ट्विटरवर सादर करताना पाहायला मिळत आहेत. मात्र आता त्यांनी आपला मोर्चा फडणवीस यांच्याकडे वळवल्याचे पाहायला मिळत आहे. नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांचे संबंध ड्रग्स माफीयांसोबत असल्याचे धक्कादायक खुलासे केले आहेत.

काल झालेल्या पत्रकार परिषदेत अनेक धक्कादायक खुलासे केल्यानंतर नवाब मलिक यांनी आज सका-सकाळी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ड्रग्स प्रकरणात अटक असणारा ‘जयदीप चंदूलाल राणा’ यांचा फोटो शेअर केला आहे. जयदीप राणा सोबत देवेंद्र फडणवीस(Devendra fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta fadanvis) या देखील असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आर्यन खान प्रकरण Aryan Khan Drug case)  हे फर्जिवडा असल्याचा आणि ही कारवाई करणारा माणूस समीर वानखडे (Sameer wankhede) हा देखील फेक असल्याचा आरोप नवाब मलिक सातत्याने करत आहेत. एवढेच नाही तर ही नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी खोट्या जात प्रमाणपत्राचा वापर केला. आणि एका मागासवर्गीय व्यक्तीला त्याचा अधिकारापासून वंचित ठेवल्याचा घणाघात देखील त्यांनी या पूर्वीच केला आहे.  सध्या आर्यन खान Aryan Khan) ड्रग्स प्रकरण हे कमालीचं गाजत असून, या प्रकरणात आणखी किती ट्विस्ट बाकी आहे, याची उत्सुकता अनेकांना पडली आहे.

नवाब मलिक आर्यन खान ड्रग्स प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे करत असून, या प्रकरणात भाजपचं मोठं कनेक्शन असल्याचे ते वारंवार सांगण्याचा प्रयत्नही करत आहेत. काल त्यांनी एका पत्रकार परिषदेत माझ्यावर चौकशी करा म्हणून सांगणारा माणूस, ‘निरज गुंडे’ (Niraj gunde) हा चोर आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि निरज गुंडे यांचे कनेक्शन असल्याचा धक्कादायक खुलासा नवाब मलिक यांनी केला होता. एवढेच नाही तर तो कोणाच्या तरी सांगण्यावरून समीर वानखेडे यांना सातत्याने भेटत आहे. नवाब मलिक यांच्या सांगण्याचा निशाणा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता. मात्र त्यांनी फडणवीस यांचं नाव घेणं टाळले.

आज पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ड्रग्स प्रकरणात अटक असणारा ‘जयदीप चंदूलाल राणा’ (Jaydeep chandulal Rana)यांचा फोटो शेअर केला आहे. राजकीय विश्लेषक ‘निशांत वर्मा’ यांच्या म्हणण्यानुसार जयदीप राणा हा ड्रग्स पेडलर असून, त्याला एनसीबीने जून २०२१ मध्ये अटक केली आहे. जयदीप राणा यांचा अमृता फडणवीस यांच्या सोबतचा फोटो नवाब मलिक यांनी ट्विटरवर पोस्ट केला असल्याने आता एकच खळबळ उडाली आहे.

नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर करत, नेहमी प्रमाणे आपल्या अनोख्या अंदाजात त्याला कॅप्शनही दिलं आहे. नवाब मलिक हा फोटो शेअर करताना म्हणाले आहेत, “चलो आज BJP और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है” चला आज बीजेपी आणि ट्रग्ज पेडलर यांचा काय नातेसंबंध आहे? यावर चर्चा करूया, असे नवाब मलिक यांनी म्हटलं असल्याने, दिवसभर हे ट्विट आता चर्चेत राहणार असल्याचे बोलले जात आहे.

 

नवाब मलिक यांनी ट्विटरवरून अमृता फडणवीस आणि जयदीप राणा यांचा फोटो शेअर केल्याने, जयदीप राणा आणि भाजपाचा ड्रग्स प्रकरण आणि जयदीप राणा यांच्याशी काहीतरी संबंध असल्याचे बोलले जात आहे? राजकीय विश्लेषक निशांत वर्मा यांनी देखील ड्रग्स प्रकरणात भाजपाचे काय कनेक्शन आहे? असा सवाल उपस्थित केला असून, आता देवेंद्र फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. जयदीप राणा या ड्रग्ज पेडलरशी यांचा कसा काय संबंध? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

 

नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर अमृता फडणवीस आणि जयदीप राणा यांचा फोटो ट्विट केल्याने एकच खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि जयदीप यांच्या शेअर केलेल्या फोटोवर आता केंद्र फडणवीस आणि भाजपची मंडळी काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नवाब मलिक यांनी शेअर केलेल्या फोटोमुळे आता नवा वाद होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

हेही वाचा-आर्यन खान ड्रग्स प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची एंट्री; समीर वानखेडे फडणवीस कनेक्शन उघड 

आर्यन खान प्रकरणात मी बोलू नये म्हणून,माझ्या मुलाचा ब्रेन वॉश केला गेला;आर्यन खान प्रकरणात पुन्हा नवीन ट्विस्ट 

मोठी बातमी! जात प्रमाणपत्रारावरून समीर वानखेडेच्या अडचणीत होणार वाढ, धनंजय मुंडे म्हणाले..

तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थात वापरतात कपडे धुण्याची पावडर, होतात असे परीणाम..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.