आर्यन खान प्रकरणात मी बोलू नये म्हणून,माझ्या मुलाचा ब्रेन वॉश केला गेला;आर्यन खान प्रकरणात पुन्हा नवीन ट्विस्ट

0

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर, आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचा सगळा फोकस आता समीर वानखेडेंकडे वळल्याचे पाहायला मिळत आहे.
आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचा स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईलने धक्कादायक खुलासा केल्यानंतर, एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समीर वानखेडेंवर चौकशीचे आदेश दिले. आणि समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई पोलीस आपल्याला अटक करतील, या भीतीने समीर वानखेडेंनी याच दिवशी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करताना, समीर वानखेडे यांना अटक करायची असेल तर, बहात्तर तास आधी त्यांना समज द्यावी, असे मुंबई पोलिसांना सांगितले. समीर वानखेडे आता चांगलेच अडचणीत आल्याचे दिसून येत असून, ते आता आपल्या जातप्रमाणपत्रा संदर्भात सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना देखील भेटले असल्याचे समजते.

राष्ट्रवादीचे नेते आणि समीर वानखेडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रोज काहीतरी नवीन खुलासा करत असणारे नवाब मलिक, यांनी आज पत्रकार परिषदेत पुन्हा काही धक्कादायक खुलासे केले आहेत. समीर वानखेडे विरोधात मी जे व्हा बोलत होतो, पुरावे सादर करत होतो, तेव्हा माझ्या कुटुंबावर दबाव तंत्राचा वापर होत होता. असा धक्कादायक खुलासा नवाब मलिक यांनी केला आहे.

माझा एक मुलगा वकील आहे. त्याला अनेक वकिलांच्या मार्फत ब्रेन वॉश करण्यात आले. तुम्हाला हे प्रकरण खूप महागात पडेल. तुझ्या वडिलांना शांत बसायला सांग. असा त्याला मॅसेज देण्यात आला. तो घरी येऊन त्याच्या आईला मला म्हणत होता,डॅडी अब बस हो गया! असा धक्कादायक खुलासा नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. ही कोण माणसं आहेत? त्याचा खुलासा मी हिवाळी अधिवेशनात करणार,असल्याचं देखील मलिक यांनी सांगितलं.

 

या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी माझ्या जीवाला देखील धोका असल्याचं माझ्या जवळच्या माणसांनी, काही जबाबदार माणसांनीही सांगितलं होतं. ड्रग्स प्रकरणात खूप मोठ्या पैशाची उलाढाल होत असते. गुंडांचा सहभाग असतो. यामुळे तुमच्या जीवाला धोका देखील पोहोचू शकतो. असं मला सांगण्यात आलं. मात्र जेव्हा मरायचे तेव्हा मी मरेन. ते विसरले, धमकावून कोणाचाही आवाज दाबता येत नाही. असंही नवाब मलिक यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं.

हेही वाचा- आर्यन खान ड्रग्स प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची एंट्री; समीर वानखेडे फडणवीस कनेक्शन उघड

आर्यन खान गांजाडी का झाला, हे कारण शाहरुखनेही केले मान्य; वाचून बसेल धक्का

मोठी बातमी! पाकिस्तानातील मुलींची चिनी पुरुष करत आहेत खरेदी आणि पुढे असे होत आहे, वाचून बसेल धक्का

WhatsApp तुम्हाला Whatsapp Payment च्या माध्यमातून कमावून देतय असेही पैसे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.