आर्यन खान गांजाडी का झाला, हे कारण शाहरुखनेही केले मान्य; वाचून बसेल धक्का

0

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणात अटक झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला. एवढ्या मोठ्या स्टारचा मुलगा ड्रग्सच्या आहारी कसा काय जाऊ शकतो?हा प्रश्न सर्वसामान्यांपासून ते अनेक बड्या मंडळींना देखील पडला. आर्यन खान नेमका ड्रग्जच्या आहारी का गेला? या लेखाच्या माध्यमातून आपण याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंतचा शाहरुख खानचा प्रवास अनेकांना भुरळ पाडून जातो. त्यामुळेच त्याच्या अभिनयाचे भारतासह जगभरात चाहते दिवाने असल्याचे पाहायला मिळतात. खास करून तरुण आणि तरुणींमध्ये शाहरुख खानची खास क्रेझ पाहायला मिळते. अभिनयासोबतच शाहरुखचा सेन्स ऑफ ह्युमर कमालीचा असल्याचे पाहायला मिळतं.

शाहरुखच्या त्याच्या चाहत्यांशी संवाद साधण्याच्या, इंटरॅक्ट होण्याच्या पद्धतीमुळे तो चाहत्यांच्या मनावर अजूनच भुरळ पडतो. त्याच्यासोबत काम करणारे अनेक छोटे कलाकार आवर्जून सांगतात की शाहरुखसोबत काम करण्यात एक वेगळीच मजा आहे. एवढे मोठे स्टार असून कधीही तसा आविर्भाव ठेवत नाहीत. परंतु तुम्ही शाहरुखची एक वाईट सवय जाणून घेतल्यावर हैराण व्हाल.

शाहरुख अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, पब्लीक प्लेसमध्ये व सेटवर धूम्रपान करताना पाहायला मिळत होता. ९०च्या दशकातला बहुचर्चित “आप की अदालत” या रियालिटी शोमध्ये शाहरुख खान धूम्रपान करताना पाहायला मिळाला होता. त्या वेळी त्याच्या
या कृत्यामुळे तो अनेकदा ट्रोल देखील झाला होता. सर्वसामान्यांपासून अनेक बड्यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. तर काहींनी धूम्रपान करणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु सार्वजनिक ठिकाणी याची काळजी घ्यावी असा सल्ला शाहरुखला अनेकांनी दिला होता.

ज्यावेळी आपण पब्लिक फिगर असतो, त्यावेळी आपलं अनुकरण अनेक जण करत असतात हे शाहरुख कदाचित विसरला असावा आणि याचाच फटका त्याला आपल्या मुलाच्या रुपात देखील नुकताच बसल्याचे पाहायला मिळाले. आपण करत असलेल्या धूम्रपानाचे अनुकरण आपला मुलगा करेल हे त्याला कधी स्वप्नातही वाटलं नसेल.

एका कार्यक्रमात त्याची पत्नी गौरी खान आणि शाहरुख खान मुलाखत देत असताना आपल्या मुलांविषयी भाष्य करताना शाहरुख म्हणाला होता की, मला वाटतं माझ्या मुलाने ड्रग्ज घ्यावेत सिगरेट ओढावी,मुलींना पटवाव, सेक्स करावा असं बेताल वक्तव्य त्याने केलं होतं. आर्यन खानला अटक झाल्यानंतर  त्याची ही मुलाखात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही झाली होती. कदाचित त्यावेळी तो गंमत म्हणून म्हणला असेल, मात्र हे सत्यात उतरल्याने आता त्याला आपण बोलल्याचा पश्चाताप नक्कीच होत असेल.

बॉलिवूडचा सुपरस्टार असल्यामुळे त्याच्याकडे प्रचंड काम होतं, या कामातून कदाचित त्याला आपल्या कुटुंबाला वेळ देता आला नसावा. शिवाय आपल्याला ज्या सवयी होत्या, त्या आपल्या मुलांनाही लागतील, ही गोष्ट तो विसरला. जगाचा रोल मॉडेल असणारा आपला बाप, धूम्रपान करतोय या गोष्टीचं मुलांना देखील काहीही वाटलं नसावं. याउलट धूम्रपान करतना हे चांगलंच असतं असा त्यांचा समज देखील झाला असावा.  आणि म्हणून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स आणि व्यसनाच्या आहारी गेला असं, आपल्याला ठाम म्हणता येत नसले तरी मात्र ही एक शक्यता देखील नाकारता येणार नाही.

हेही वाचा-विश्वास नांगरे पाटीलांनी तपास पथक तयार करताच समीर वानखेडेंची मुंबई उच्च न्यायालयात धाव; अटकेच्या भितीने वानखेडे हादरले

या फोटोची कहाणी वाचल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही, सर्वांनी एकदा वाचा म्हणजे आपल्याला आपल्या माणसाची किंमत कळेल

आर्यन खानला जामीन मंजूर झाला आहे, याची आम्हाला माहितीच नाही, आर्यनची सुटका नाहीच 

कुठे लपून बसलाय, सॅम डिसोझा? त्याच्यावर कारवाई का होत नाही? आर्यन खानच्या २५ कोटी रुपयांच्या डिलमधील कथीत नाव गायब

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.